Homeनागपूर न्यूजबलात्काराच्या गुन्ह्याचे दोषरोपपत्र रद्द करण्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

बलात्काराच्या गुन्ह्याचे दोषरोपपत्र रद्द करण्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

Advertisements

खोटा निकाहनामा न्यायालयात सादर करुन मिळवला होता जामीन

नागपूर,ता.२६ फेब्रुवरी: शेख आरिफ शेख इक्बाल( रा. सदर, नागपूर) याने त्याच्या विरुद्ध पोलीस ठाणे कुही, नागपूर ग्रामीण येथे दाखल बलात्काराचा गुन्हा आणि त्याआधारे सत्र न्यायालयात दाखल दोषारोपपत्र रद्द करण्यासंबधीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केली होती मात्र फिर्यादीच्या वकीलाने आरोपीने खोटा निकाहनामा न्यायालयात सादर केला असल्याचे न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिले,न्यायालयीची आरोपीने पोलीसांच्या संगमतीने दिशीभूल केली असल्याचे फियार्दीचे वकील ॲड.सतीश उके यांनी न्यायालयाला सांगितले.न्यायालयाने आज आरोपीच्या गुन्ह्याचे दोषरोपपत्र रद्द करण्याची याचिका उच्च फेटाळून लावली.

आरोपीने शाररीक संबधास विरोध केला असतांनाही फिर्यादी २४ वर्षीय मुलीवर बलात्कार केला आणि मग लग्न करण्याचे आश्वासन देवून पीडीतेस शांत केले.पीडीताला लग्नाचे खोटे आमिष दाखवत बरेच वर्ष आरोपीने पीडीतेचे शाररीक शोषण केले असा आरोप पीडीतेने केला आहे.
मात्र या दरम्यान आरोपीने मुस्लिम समाजातील इतर मुलींशी लग्न करण्याचा प्रयत्न केला आणि एकीशी लग्न केले. फिर्यादी मुलगी हरिजन समाजातली आहे, म्हणून यासाठी आरोपीने वारंवार “मेहतर” बोलून तिची बेअब्रूसुद्धा केली.

सदर नागपूर येथील पोलिस ठाण्यात फिर्यादीने तक्रार केली असता ती येथील पोलिस ठाणे कुही येथे पाठविली गेली व एससी-एसटी जाती अत्याचाराचे व बलत्कार आणि अनैसर्गिक संबंध याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला मात्र यानंतर कुही पोलिसांनी आरोपीला मदत केल्याचा अारोप फिर्यादीच्या वकीलाने न्यायालयात केला.

आरोपीने बनावट निकाहनामा बनवून कुही पोलीसांना आणून दिला,परिणामी त्या निकाहनामाची सत्यप्रत याची खातरजमा न करता कुही पोलिसांनी मोटरसायकलसोबतच निकाहनामा जप्त केल्याचे न्यायालयात दाखवले.या कागदपत्रांवरुन अारोपीला आधी सत्र व त्यानंतर उच्च न्यायालयातून जामीन ही मिळाला.

मात्र याच खोट्या निकाहनाम्याचा उपयोग करून आरोपी शेख आरिफ शेख इक्बाल याने उच्च न्यायालयात या गुन्ह्यातील दोषारोपपत्र रद्द करण्याची याचिका दाखल केली होती.

या निकाहनामाप्रमाणे आरोपीने फिर्यादी मुलीस पत्नी दर्शविण्यासाठी आणि बलत्काराचे आरोप कलम ३७५ भा. दं.वी. चे अपवाद यात हे प्रकरण खोट्या पद्धतीने आणन्याकरीता हे कृत्य केले आणि मूळ निकाहनामा कुठेही सादर केला नसल्याचे ॲड.उके यांनी न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिले. उलट या खोट्या निकाहनाम्याची छायाप्रत न्यायालयासमोर न्यायालयाची दिशाभूल करण्यासाठी वापरली अशी बाजू फिर्यादीचे वकील अॅड. सतीश उके यांनी उच्च न्यायालयासमक्ष मांडली.

फिर्यादीचे वकील अॅड. सतीश उके यांनी न्यायालयाला सांगीलते, की दि.२१.९.२०१६ रोजी कुही पोलिसांनी वेळ १५ ते १५.४० पर्यंत निकाहनामा आणि मोटारसायकल हे आरोपीकडून प्राप्त करून जप्तीपंचनामा लिहून तयार केला. हा निकाहनामा सत्र न्यायालयासमक्ष सादर न करता कुही पोलिस, तपास अधिकारी, श्रीमती पोर्णिमा एस. तावरे, उपविभागीय पोलिस अधिकारी उमरेड, नागपूर (ग्रा) सध्या पुणे शहर एसीपी आहेत त्यांनी नंतर खोटा जप्तीपंचनामा केवळ मोटारसायकल जप्तीबाबत तयार करून सत्र न्यायालयात आरोपीस फायदा पोहचविण्याकरिता दोषारोपसह दाखल केला.

यावर उच्च न्यायालयाने मूळ दोषारोपपत्र सत्र न्यायालयाकडून मागवून घेतले आणि आरोपीस तसेच तपास अधिकारी यांना मुळ निकाहनामा कुठे आहे याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले होते.

आरोपी आणि पोलीस यांनी प्रतिज्ञापत्र परस्परविरोधी दाखल केले. आरोपीचे वकील देवेंद्र चव्हाण यांनी अनेकदा मुळ निकाहनामा कुठे आहे हे माहित नाही हे उच्च न्यायालयाला सांगितले . सरकारी वकील टी . ए. मिर्झा व फिर्यादीचे वकील यांनी आरोपीचे बलत्काराचे कृत्य हे भा. द.वी.चे कलम ९० प्रमाणे पिडीतेच्या संमतीच्या कक्षेत येत नाही आणि सर्वोच्च न्यायालय यांचे ‘अनुराग सोनी विरुद्ध छत्तीसगढ राज्य ’ या प्रकरणात आणि नागपूर उच्च न्यायालयाच्याच एका प्रकरणाच्या न्यायनिवाडाचा दाखला यात दिला .

आज दि. २६.२.२०२१ रोजी उच्च न्यायालयात न्यायमूर्ती झेड. ए. हक आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या समक्ष या प्रकरणावर प्रदीर्घ काळ सुनावणी झाली. न्यायालयाने आरोपीचा गुन्हा रद्द करण्याचा अर्ज फेटाळण्याचा आदेश दिला . आरोपीचे वकील यांनी उच्च न्यायालयात जमा केलेले १० लाख रु. परत घेण्याची परवानगी मागितली असता फिर्यादी आणि तिची या संबंधातून जन्म घेतलेल्या लहान मुलीचे हित लक्षात घेता परवानगी नाकारली.

Latest बातम्या