
नागपूर,ता.१२ ऑक्टोबर: २०१९ च्या विधान सभेच्या निवडणूक प्रकरणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून झालेले अपराधिक कृत्य याबाबत Misc. Cri. Application No. २८१७ /२०२० यात आज मा. JMFC कोर्ट क्र. ६ नागपूर न्यायमूर्ती. सचिन मेहता यांच्या समक्ष सुनावणी पूर्ण झाली. न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणावर पुढील सुनावणी आता दि. ११ नोव्हेंबर २०२० रोजी होणार आहे.
आज ता. १२ ऑक्टोबर २०२० रोजी झालेल्या सुनावणीत तक्रारकर्ता अँड. सतीश उके यांनी संपूर्ण कागदोपत्री पुरावे मा. न्यायालयासमक्ष मांडले. या तक्रारीत देवेंद्र फडणवीस यांच्यासह महापाैर संदीप जोशी , निवडणूक निर्णय अधिकारी शेखर घाडगे , पोलीस उपायुक्त परी. क्र. २ नागपूरच्या विनिता साहू यांनाही सहआरोपी बनविण्यात आले आहे.
तक्रारी प्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी अपूर्ण/ खोटे माहितीचे प्रतिज्ञापत्र नामांकन अर्जासोबत दिले असून त्यांनी U/ S Section 199 & 200 of I.P.C. and U/S 125-A of The Representation of People Act, 1951 प्रमाणे दंडनीय कृत्य केले . याचबरोबर त्यांनी बनावट नोटरी प्रतीज्ञापत्रावर करून सादर केले, असे प्रतीज्ञापत्र निवडणूक अधिकारी यांनी अपराधिक षड्यंत्र करून स्वीकारले, भा.द.वी.चे कलम १२०-ब ,३४ प्रमाणे कृत्य केले .
विद्यमान महापौर संदीप जोशी यांनी गैरकायदेशीरपणे नामांकन पत्राची सुनावणी दरम्यान अन्य बनावट/काल्पनिक नावाचे नोटरी यांचे कागदपत्र सादर केले आणि निवडणूक अधिकारी शेखर घाडगे यांनी ते सुनावणीतील कागदपत्रांसोबत षड्यंत्र करून स्वीकारले आणि नामांकनपत्राच्या कागदपत्रात अलगद लपवले,याप्रमाणे संदीप जोशी आणि देवेंद्र फडणवीस यांनी सोबत मिळून U/S 417, 467, 468,471,120-B, (171-F R/w 511), 34 of I.P.C प्रमाणे दंडनीय कृत्य केले .
याशिवाय फडणवीस यांच्या विरोधातील कायदेशीर आक्षेप जसे त्यांनी नागपूर येथील त्यांच्या त्यावेळी वापरात होते त्या रामगिरी बंगल्याचे वीज,पाणी, दुरध्वनी याचे बकाया नसलेले प्रमाणपत्र प्रतिज्ञाप्रत्रासोबत सादर केले नाही व त्यांचा प्रतीज्ञापत्रात उल्लेखही केला नाही तसेच बनावट नोटरी तयार करून ते प्रतीज्ञापत्र वापरले.
हे आक्षेप फेटाळन्या करिता बनावट कागदपत्रांचा उपयोग केला आणि कलम १२९ लोकप्रतिनिधी कायदा प्रमाणे दंडनीय कृत्य केले. यानंतर नामांकन अर्ज स्वीकार करतांना बनावट कागतपत्रांचा केलेला उपयोग लपविण्याकरिता दुसऱ्या दिवशी मोबाईल वरून मिळणाऱ्या सूचनेप्रमाणे जुन्या तारखेचे आदेश काढले आणि कार्यालयीन अभिलेखात इतर अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मदतीने हेरफेर केली .
या सर्व कृत्याची CC Tv रेकॉर्डिंग उपलब्ध आहे. निवडणूक अधिकारी शेखर घाडगे यांनी काही व्हिडीओ रेकॉर्डिंग मधील तारीख आणि वेळ मिटवून पुरावा नष्ट केला. याप्रमाणे U/S 129 of Representation of Peoples Act 1951 and 166, 167, 217, 218, 219, 417, 467, 468, 471, 120-B, 34 of I.P.C.प्रमाणे दंडनीय कृत्य केले .
पोलीस उपायुक्त परी. क्र. २ नागपूरच्या विनिता साहू यांनी नामांकन अर्ज छाननीच्या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी फडणवीस यांच्या बाजूने निर्णय देण्याकरिता अपराधिक षड्यंत्रात मदत केली आणि त्यानंतर पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन सदर नागपूर यांना, कारवाई न करण्याचे निर्देश दिले . U/S 129 of The R.P. Act, 1951 and Section 120-B of IPC and Section 217 & 218 of IPC प्रमाणे कृत्य केले .
या तक्रारीत तक्रारकर्ता यांनी या तक्रारीचा मा. न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रातील अन्य पोलीस स्टेशन मार्फत तपास करण्याचे आणि पुरावा गोळा करण्याचे आदेश देण्यात यावे अशी विनंती मा. न्यायालयास केली आहे.
या प्रकणावर पुढील सुनावणी आता ११ नोव्हेंबर रोजी होईल.

आमचे चॅनल subscribe करा