
मनपा प्रशासनाची भूमिका ही निषेधार्ह्य
नागपूर,ता. १४ जुलै : म्हाळगी नगर येथील गजानन महाराज मंदिरापासून तर नरसाळा रोडपर्यंतचा सिमेंट रस्ता केवळ एका प्लाट धारकामुळे रखडला असल्याची माहिती नगरसेविका स्वाती अाखतकर यांना मिळताच त्यांनी नगररचना विभागाचे सहायक संचालक प्रमोद गावंडे यांना साईटवर येण्याची विनंती केली,मात्र त्यांनी मी लहान-लहान साईटवर स्वत: येत नाही,माझ्या अधीन असणा-या अधिका-यांना पाठवतो,असे उत्तर दिले,यानंतर स्वाती यांनी आमदार व माजी महापौर प्रवीण दटके यांना या रस्त्यांच्या कामातील दिरंगाई, या रस्त्याची नागरिकांना असणारी अत्यधिक आवश्यकता, प्रशासकीय अधिका-याने दिलेले उत्तर इ.बाबत माहिती देऊन त्यांनाच गावंडे यांच्याशी बोलण्यास सांगितले असता,गावंडे यांनी दटके यांच्याशी देखील,मी आयुक्तांची बैठक असल्याकारणारने येऊ शकत नाही,दुस-या कोणाला तरी पाठवतो,याच भाषेत उत्तर दिल्याने कालचे संपूर्ण महानाट्य घडले,यात प्रशासनाची भूमिका ही अत्यंत निषेधार्ह्य असून,ज्या प्लाट धारकाला २००४ साली रसत्याच्या मधोमध येणा-या प्लाटची परवानगी देण्यात आली, त्या परवागनी देणा-या अधिका-याची देखील सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी आज मंगळवार दि. १४ जुलै रोजी स्थायी समितीचे अध्यक्ष् पिंटू झलके यांनी पत्र-परिषदेत केली.
याप्रसंगी बोलताना झलके हे म्हणाले,की नियमाप्रमाणे १८ मिटरचा रस्ता संमत झाला असताना एकमेव प्लाट धारकाच्या आडमुठे धोरणामुळे तो १२ मिटरचा कसा करण्यात येऊ शकतो?प्लाट धारक अजय डोरलीकर यांचा दावा आहे की २००४ साली त्यांना नगर रचना विभागाची मंजुरी त्यांच्या प्लाट क्र.१५८ ला प्राप्त आहे.या मंजुरीची संपूर्ण चौकशी करुन त्यांचा दावा हा चुकीचा असेल तर रिवप केले पाहीजे अन्यथा त्यांचा दावा खरा असल्यास त्यांना मोबदला देण्यात यावा.विशेष म्हणजे कालच्या संपूर्ण नाट््यमय घडामोडीनंतर देखील अद्याप एक ही प्रशासकीय अधिकारी त्या स्थळावर गेलाच नाही.या प्लाटचे कोणतेही अधिकृत दस्तावेज अद्याप तरी आम्हाला प्राप्त झाले नाही.

या ठिकाणी प्लाट धारकांना जी काही मान्यता देण्यात आली,त्यात गौडबंगाल असल्याचा आमचा आरोप आहे.१९२/ए या प्लाटवर तर ट्रंप लाईन होती.सीवर नेटवर्क असणा-या प्लाट क्र.७ ला ही नगर विकास विभागाने अशीच परवानगी दिल्याने त्यावर आता मोठमोठ्या फ्लॅट स्किम उभ्या आहेत. असाच गौडबंगाल या प्लाट क्र १५८ मध्ये झाला असल्याची शक्यता लक्ष्ात घेऊन, नगरसेविका स्वाती अाखतकर यांनी गावंडे यांना एकदा या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष् पाहणी करुन जाण्याची विनंती केली होती. मूळात जनप्रतिनिधींची भूमिका काय?या ठिकाणी रस्ता रुंदीकरणाचे काम अडले असल्यामुळे या भागातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे ते येथील नगरसेवकांवर रोष व्यक्त करतात. अनेक वृत्तपत्रांनी या ठिकाणच्या अपूर्ण सिमेंट रोडमुळे साचलेले पाणी, नागरिकांची होरपळ इ.बाबत वृत्त प्रसारित केले आहे.
अश्यात केवळ एखादा प्लाट धारकाचा प्लाट मध्येच येत असेल तर नगरसेविका या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नगररचना विभागाच्या अधिका-यांनाच फोन करणार ना? दटके यांनी देखील त्या ठिकाणी जाऊन एकदा पाहणी करुन येण्याचीच मागणी केली होती.मात्र अर्वाच्य शिवीगाळ केल्याचा खोटा आरोप करुन काल ‘बोलविता धनी’चे एेकून प्रशासकीय अधिका-यांची चक्क काम बंद आंदोलन केले,ही बाब निषेधार्ह्य असल्याचे ते म्हणाले.
आज पिंटू झलके यांनी या प्रभागाच्या सर्व नगरसेवकांसोबत या ठिकाणचा पाहणी दौरा ही केला.
साईट ही छोटी-मोठी असते का?स्वाती अाखतकर यांचा सवाल
मला शनिवारी सकाळी कळले की १८ मीटर सिमेंट रस्त्याच्या मध्ये एक प्लॉट येत असल्यामुळे काम रखडलेले आहे.त्यामुळे मी त्या दिवशी दुपारी नगर रचना विभागाचे सहायक संचालक गावंडे यांना फोन करुन कृपया साईट बघायला या म्हणून कळवले. मात्र त्यांनी शनिवार-रविवार सुटी अल्याने साेमवारी बघतो,असे टोळूवन दिले.मी पुन्हा सोमवारी सकाळी त्यांना फोन केला असता, मी येऊ शकत नाही,खालचे अधिकारी पाठवतो, तसेही मी छोटया साईटवर येत नसल्याचे सांगितले. एवढा महत्वाचा रस्ता हा त्यांच्यासाठी छोटी साईट कसा असू शकतो?
प्रशासकीय अधिकारी असे कसे ठरवू शकतात,ही छोटी साईट,ती मोठी साईट!शिस्तप्रिय आयुक्तांनी त्यांच्या प्रशासकीय अधिका-यांचा हा दृष्टिकोण तपासून बघावा. मी गेल्या आठ वर्षांपासून सदनाची नगरसेविका आहे.आजपर्यंत अनेक अडचणीच्या समस्यांवर मोठे भाऊ असणारे माजी महापौर प्रवीण दटके यांची मदत घेतली.याहीवेळी त्यांनाच विनंती केली,गावंडे यांच्याशी बोलता का? मला माझ्या प्रभागातील रस्त्याचा प्रश्न मार्गी लावायचा होता,नागरिकांच्या समस्याची सोडवणूक करायची होती, मात्र गावंडे यांनी त्यांच्याशी देखील अश्याच शब्दांत संभाषण केले,परिणामी ते चिडले मात्र कोणत्याही अपशब्दाचा वापर केला नाही. कारण मी एक महिला असल्याने मी देखील कॉन्फरेन्स कॉलवर होती आणि दटके यांच्या संस्कारात निश्चितच ही बाब बसत नाही की एक महिला कॉन्फरेन्स कॉल वर असताना अर्वाच्य शिव्या देतील.त्यांनी कोणत्याही अपशब्दाचा वापर केला नाही.

आमचे चॅनल subscribe करा