Homeनागपूर न्यूजप्रसार माध्यमांत पोहचला कोरोना!

प्रसार माध्यमांत पोहचला कोरोना!

नागपूर, ता. ८: ५ ऑगस्ट रोजी नागपूरात रात्री कोसळलेल्या पावसात अनेक माध्यमकर्मी भिजलेत आणि निमित्त झाले करोनाचे. खूप वेळ अंगावर ओले वस्त्र तसेच राहील्याने प्रकृतीने देखील आपली प्रकृतीनेच वागली आणि जे माध्यमकर्मी या पावसात भिजलेत त्यांना सर्दी,खोकला, खसा खवखवणे,अंगात कणकण सारखी लक्ष् णे उमळली. मनपाच्या करोना तपासणी केंद्रात त्यांनी आपली चाचणी केली आणि….५ माध्यमकर्मींचे रिपोर्ट आले...कोरोना पॉझिटीव्ह!

या पाचही माध्यमकर्मींना घरीच विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला असून ते घरीच उपचार घेत आहेत.याशिवाय त्यांच्या कार्यालय व स्टूडियोचे मनपातर्फे सेनिटायझेन करण्यात आले.मात्र या माध्यमकर्मींचा अहवाल करोना पॉझिटीव्ह आल्याने इतरांच्या मनात मात्र धडकी भरली. या कोरोनाबाधित आढळून आलेले प्रतिनिधीं इतर माध्यमांच्या प्रतिनिधींच्या सपंर्कात आले असतील, हे मात्र अद्याप कळू शकले नाही. यांच्या संपर्कातील प्रतिनिधींचा शोध घेऊन त्यांची चाचणी करण्याची गरज असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

कोरोनाच्या या संकटकाळात नागपुरातील अनेक माध्यमांचे प्रतिनिधी कोरोनाच्या वार्तांकनासाठी मेडिकल, मेयोसह शहरतील अनेक भागात फिरत असतात. शहरात दररोज वाढत जाणा-या बाधितांच्या आकड्यात आता या पाच माध्यमकर्मींची देखील भर पडल्यामुळे अनेकांची चिंता वाढली आहे.

दिवसभर आज शहरात या लोकल वाहिनीच्या माध्यमकर्मींचीच चर्चा माध्यमकर्मींमध्ये सुरु होती,हे विशेष!

आरोग्य समिती सभापती कोरोनाबाधित
महापालिकेचे आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी आज कोरोना चाचणी करून घेतली. यात ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांनाही डॉक्टरांनी घरीच विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला असून घरीच उपचार सुरू केले. मागील सात दिवसांत संपर्कात आलेल्यांनी स्वतःची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांंनी केले आहे.

करोनाने आणखी अाज २३ मृत्यू:नागपूरतील मृत्यू ३००च्या उंबरठ्यावर

एकाच दिवशी ६५९ बाधित: मेयो,मेडिकलसह एम्स, सेंटरमध्ये २ हजार ७७६ रुग्ण

आज शनिवार दि. ८ ऑगस्ट रोजी कोरोनाने एक नवा रेकार्ड स्थापन करुन आज एकाच दिवसात ६५९ कोरोनाबाधितांचा आकडा पार केला तर कोरोनाने आज २३ बळी घेतले आहेत. यामुळे कोरोनाच्या मृत्यूचा आकडा तिनशेच्या उंबरठ्यावर आला आहे. तर कोरोनाबाधितांची संख्या ८ हजार ४०६ वर पोहचली आहे. कोरोना नियंत्रणासाठी मेडिकलच्या वॉर्डात कर्तव्य बजावणारे डॉक्टर कोरोनाबाधित होत आहेत. मेडिकलमध्ये एक विभागप्रमुख कोरोनाच्या विखळ्यात अडकले आहेत.

आज मृत्यूंच्या आकड्यात काहीसी घट दिसून आली असली तरी बाधितांच्या आकडा मात्र वाढला आहे. मेयो रुग्णालयात ११ मृत्यू झाले आहेत. यात ८ पुरुष तर ३ महिलांचा समावेश आहे. मृतकांमध्ये केवळ एक व्यक्ती पस्तीशीतील वगळता उर्वरित सर्व पन्नाशी ओलांडलेले आहेत. दमा, मधुमेह, रक्तदाब असे विविध आजार त्यांना होते. फुफ्फुसावर आघात झाल्याने यातून ते बरे होऊ शकले नाही. अखेर त्यांनी जीव गमवावा लागला.

मेडिकलमध्येही शनिवरी १२ जण कोरोनाने दगावले असून यात चार महिलांची तर ८ पुरुषांची संख्या आहे. मेडिकलमधील काही रुग्णांना यकृताचा तसेच काही जणांना न्युमोनियाचा त्रास होता. तर महिलांना रक्तदाब असल्याचे आढळून आले. त्यात कोरोनाची बाधा झाली. विशेष असे की, कोरोनाची लागण झाल्यानंतर अवघ्या एक किंवा दोन दिवसात रुग्णांचा मृत्यू होत असल्याने प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे.

पाच एप्रिल ते आतापर्यंत मेयो रुग्णालयात १४१ कोरोनाबाधित व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तर मेडिकलमध्ये १३० जणांचे मृत्यू झाले आहेत.मेयो आणि मेडिकलमध्ये सहा महिन्यातील मृत्यूच्या तुलनेत खासगीत २२ जणांचे मृत्यू झाले आहेत. खासगी रुग्णालयात उपचाराची परवानगी देण्याला महिना झाला नाही. मात्र महिना होण्यापुर्वीच २२ जणांचा मृत्यू झाला आहे.

आता पर्यंत एक लाखापेक्ष्ा अधिक चाचण्या करण्यात आल्याची माहीती आहे.जेवढ्या अधिक चाचण्या तेवढे अधिक बाधित हा गणितीय नियम लक्ष्ात घेतला असता,हा आकडा असाच दररोज वाढत जाणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी संागतात.

Latest बातम्या