Homeनागपूर न्यूजप्रसार नंतर प्रचार माध्यमातही करोनाचा शिरकाव!

प्रसार नंतर प्रचार माध्यमातही करोनाचा शिरकाव!

एकाच वृत्तपत्रातील ८ जण करोना पॉझिटीव्ह

नागपूर,ता. १२ ऑगस्ट: नागपूरात सध्या करोना बाधितांची संख्या ११ हजार पार झाली आहे. शहरातील असा एक ही प्रभाग किवा वॉर्ड नाही जिथे करोनाचा शिरकाव झाला नाही. यात आता प्रचार व प्रसार माध्यमांचीही भर पडली आहे. शहरातील एक लोकप्रिय वृत्तपत्रातील ८ जणांना करोनाची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे!

शहरात करोनाच्या प्रार्दुभावाला पाच महिन्यांचा काळ लोटत आहे मात्र यापासून प्रचार-प्रसार माध्यमे ही दूरच होती.आता मात्र ’गेहूं के साथ धून भी पिसता है’हिंदीतील या म्हणीप्रमाणे वृत्तांकन करण्यासाठी बाहेर पडणे पत्रकारांना अत्यावश्‍यक असल्याने आणि कितीही काळजी घेतली तरी कुठे ना कुठे, कोणत्या ना कोणत्या ’एक्टीव स्प्रेडर’च्या संपर्कात ते येत असून लागण करुन घेत आहे,असेच आता म्हणावे लागेल.

आज एकाच दिवशी आठ जणांना करोनाची बाधा होणे,वृत्तपत्र जगतात चिंता निर्माण करणारी बाब आहे.यांच्या संपर्कात इतर वृत्तपत्रातील पत्रकार मित्र हे देखील बातम्यांच्या संदर्भात येणे अपरिहार्य असल्यामुळे आता इतरांचे देखील धाबे दणाणले आहेत.

सध्या शहरात पावसाने देखील चांगलाच जोर धरला आहे.अशात वार्तांकन करण्यासाठी बाहेर पडल्यास व पावसात भिजल्याने निसर्ग ऋतूप्रमाणे सर्दी,खोकला,कणकण,अंगात ताप अशी लक्ष् णे उद् भवने हे स्वाभाविक आहे. मात्र या वेळी,या वर्षी,अशी लक्ष् णे म्हणजे चक्क करोनाच्याच लक्ष् णांशी साम्य असल्याने जास्तीत जास्त संख्येने नागरिक हे करोनाचीच चाचणी करुन घेत आहेत.अशात त्यांचा अहवाल जेव्हा निगेटीव्ह ऐवजी पॉझिटीव्ह येतो तेव्हा मनाची काय अवस्था होते हे ‘जावे ज्याचा गावा’त्यांनाच कळतं.

वैयक्तिकरित्याच नव्हे तर संपूर्ण कुटुंबियांनाच अश्‍यावेळी करोनाची चाचणी,विलगीकरण, उपचार या सर्व प्रक्रियेतून जाणे अपरिहार्य ठरतं. वृत्तपत्रातील या आठ लोकांचे अहवाल करोना पॉझिटीव्ह आल्याने आता त्यांच्या कुटुंबियांना,बाल-बच्चे,अबाळ-वृद्ध सर्वांनाच या चाचणीच्या दिव्यातून पार पडावे लागणार आहे.

जी प्रचार व प्रसार माध्यमे करोनाविषयी सातत्याने जनजागृती करतेय,त्याच माध्यमातील माणसे ही कितीही काळजी घेतली तरी आता बाधित होत असल्याने सर्वांनाच धडकी भरली आहे.आज दिवसभर शहरातील माध्यम जगतात फक्त याचीच चर्चा होती.

जिवावर उदार होऊन कर्तव्य बजावणारी ही पत्रकार मंडळी तरीही कौतुकास पात्र ठरते. ‘सत्ताधीश’त्यांच्या लवकर स्वास्थप्राप्तीची कामना करतो.

Latest बातम्या