Homeनागपूर न्यूजप्रवीण शर्मा यांची शिवसेना शहर कक्ष प्रमुख पदी नियुक्ती

प्रवीण शर्मा यांची शिवसेना शहर कक्ष प्रमुख पदी नियुक्ती

Advertisements
Advertisements

डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या समन्वयक पदाचीही जबाबदारी

नागपूर : दि. ९ ऑगस्ट २०२२: हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघेंच्या आशीर्वादाने राज्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मुंबईकडून प्रवीण बालमुकुंद शर्मा यांची नागपूर शहर कक्ष प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.यासोबतच त्यांच्यावर डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या समन्वयक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष प्रमुख ओ. एस.डी. मनोज चिवटे, राम राऊत महाराष्ट्र राज्य कक्ष प्रमुख माऊली धुडे, महाराष्ट्र राज्य सह कक्ष प्रमुख अरविंद मांडवकर, वैद्यकीय प्रमुख स्वरुप काकडे, प्रसाद सुर्यराव, राहुल भालेराव, ऋषिकेश देशमुख नितीन हिनाळ, रविंद्र ननावरे, दिपाली चव्हाण, गजानन नारलावर महाराष्ट्र राज्य सहाय्यक कक्ष प्रमुख उपस्थितीत होते.

प्रवीण शर्मा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष प्रमुख ओ.एस.डी.मनोज चिवटे यांचे आभार मानले तसेच एकनिष्ठ होऊन नागपूरमध्ये प्रत्येक वार्डात, वैद्यकीय कक्ष उघडण्याचा संकल्प ही त्यांनी घेतला.

Latest बातम्या