Homeक्राइमप्रतिबंधित मोमिनपुरा परिसरातील पिता खरबीत! पिता-पुत्रावर गुन्हा दाखल

प्रतिबंधित मोमिनपुरा परिसरातील पिता खरबीत! पिता-पुत्रावर गुन्हा दाखल

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

९ मे रोजीच  मोटरसायकलने आणून सोडले

नागपूर: करोना साथीच्या वाढत्या उद्रेकामुळे अनेकांना आपल्या घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची चिंता सतावते आहे. अशा परिस्थितीत वडिलांना प्रतिबंधित क्षेत्रातून सामान्य क्षेत्रात हलविणाऱ्या मुलावर तसेच त्याच्यासोबत जाणाऱ्या त्याच्या वडिलांवरसुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या हेतुने प्रतिबंधित क्षेत्रातील  व्यक्तींवर शासनाने अनेक निर्बंध घातले आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्याने या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खरबी परिसरात घडली. मोहम्मद अतिक अंसारी मोहम्मद जलील असे मुलाचे तर मोहम्मद जलील मोहम्मद हुसेन असे वडिलांचे नाव आहे. अतिक यांना जलील याने प्रकृतीच्या चिंतेपोटी मोमीनपुऱ्यातून हलविले की अन्य काही कारणांसाठी हलविले याची नेमकी माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. मात्र करोनाच्या उद्रेका दरम्यान प्रतिबंधित क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात वास्तव्यास जाऊन संसर्गाचा धोका निर्माण केल्याच्या आरोपाखाली या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हे दोघेही मुळात मोमिनपुरा परिसरातील रहिवासी आहेत. नागपूर शहरात सतरंजीपुऱ्यानंतर सर्वाधिक रुग्ण हे मोमिनपुरा परिसरातून आढळून आल्याने आता हा परिसरसुद्धा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत जलीलने आपल्या वडिलांना मोमिनपुरा परिसरातून खरबी परिसरातील जुन्या घरी आणून सोडले.

वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलिस उपनिरीक्षक रमेश झिटुजी नन्नावरे यांना ही माहिती प्राप्त झाली. मिळालेल्या माहितीच्या आधारावर त्यांनी खरबी परिसरातील जलील यांच्या घरी भेट दिली. यावेळी आपल्या मुलाने आपल्याला ९ मे रोजी मोटरसायकलने येथे आणून सोडल्याची माहिती जलील यांनी पोलिसांना दिली. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिक असूनसुद्धा दुसऱ्या ठिकाणी वास्तव्यास आल्याने त्यांनी संसर्गाचा धोका वाढविला. तसेच शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केले या आरोपांखाली वाठोडा पोलिसांनी या दोघांवर भादंवि आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाच्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

Advertisements

Latest बातम्या