Advertisements

ट्रॅफिक पोलिस कर्मचाऱ्याकडून कॅफे संचालकाला मारहाण:अश्लील शिविगाळ
Advertisements

पिडीताची पत्रकार परिषद: सीसीटीव्ही फूटेज व्हायरल
निष्पक्ष चौकशी करून दोषीवर कारवाईची मागणी :
नागपूर, दि. ६ जुलै : नागपूर शहराचे आमदार,राज्याचे मुख्यमंत्री व पोलिस विभाग ज्या मंत्रालया अंतर्गत काम करतो तो गृहविभागच देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारितीत असल्यावर देखील,नागपूरात एखादा वाहतूक विभागातील पोलिसच एखाद्या क्षुल्लक मुद्दावरुन एखाद्या कॅफे चालकाला जाहीरातीचे फलक लावण्यावरुन आई-बहीणीवरुन अतिशय अश्लील शिवीगाळ करीत मारहाण करीत असेल तर या राज्यात व मुख्यमंत्र्यांच्याच शहरात कायदा-सुव्यवस्थेची काय स्थिती आहे,याचा अंदाज येतो,
वाना डोंगरी- हिंगणा रोड येथील पायल कॅफेचे संचालक मनीष लहू गिरी यांनी वाहतूक पोलिस कर्मचारी मनीष भोसले यांच्याकडून मारहाण, शिवीगाळ व धमकी दिल्याचा गंभीर आरोप करत पत्रपरिषदेत निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर कठोर कायदेशीर व विभागीय कारवाई करण्यात यावी, तसेच आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी केली.
मनीष गिरी यांनी सांगितले की, १३ जून रोजी त्यांच्या कॅफेसमोर केबी बीअर अँड वाईन शॉपचा फलक लावण्याच्या वादातून संबंधित ट्रॅफिक पोलिस कर्मचाऱ्याने त्यांना अश्लील शिविगाळ करीत मारहाण केली.या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज देखील त्यांनी माध्यमकर्मींला दिले.
या घटनेत त्यांच्या दोन्ही कानांना गंभीर दुखापत झाली असून, वैद्यकीय तपासणीत ऐकण्याची क्षमता कमी झाल्याचे तसेच टिटॅनसचा त्रास सुरू झाल्याचे अहवालात नमूद असल्याचा दावा त्यांनी केला.
एमआयडीसी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११७ (२) व ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली. प्रशासनाकडे त्यांनी घटनास्थळा वरील सीसीटीव्ही फुटेज जप्त करून फॉरेन्सिक तपासणी करावी, वैद्यकीय अहवाल व इतर पुराव्यांच्या आधारे निष्पक्ष चौकशी करावी, दोषी आढळल्यास संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करावी तसेच स्वतःला व कुटुंबाला संरक्षण द्यावे, अशा प्रमुख मागण्या गिरी यांनी पत्रकार परिषदेत केल्या.
यावेळी मनीष गिरी म्हणाले, कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे. सामान्य नागरिक असो किंवा पोलिस कर्मचारी, दोषी कोणीही असला तरी त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. मला न्याय मिळावा आणि गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी, हीच माझी मागणी आहे.अंगावरील वर्दी ही कोणत्याही पोलिसकर्मीला अमर्याद अधिकार देत नाही.देशाचा संविधान हा सर्वांसाठी समान आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागपूरचे नवनियुक्त पोलिस आयुक्त विश्वास नांगरे- पाटील यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन मला न्याय मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पोलीस कर्मचा-याने मनीष गिरीच्या कानावर फटाफट झापडा मारून त्यांच्या कानाला गंभीरर इजा पोहोचवली, जिवनभर त्यांचा कान खराब झाला ,याला कौन जबाबदार आहे?
याशिवाय संविधानाची शपथ घेऊन प्रशासकीय व्यवस्थेचा भाग झालेला पोलिसकर्मीच सर्वसामान्य जनतेला आई-बहीणीची अश्लील शिवीगाळ करीत असेल तर पदावर राहण्याचा त्या पोलिसकर्मीला संवैधानिक पदावर राहण्याचा अधिकार आहे का?याचे देखील उत्तर पिडीत गिरी यांना मुख्यमंत्री व पोलिस आयुक्तांकडून हवे आहे.
……………………………….