Homeनागपूर न्यूज‘पेटती मशाल’ घेऊन शिवसैनिकांचा संकल्प सोहळा

‘पेटती मशाल’ घेऊन शिवसैनिकांचा संकल्प सोहळा

शिवसेनेला निवडणूक आयोगाकडून ‘पेटती मशाल ’ निवडणूक चिन्ह प्रदान

नागपूर,ता. १० ऑक्टोबर २०२२: आज निवडणूक आयोगाकडून शिवसेनेला ‘ शिवसेनाउद्धव बाळासाहेब ठाकरे’हे नाव पक्षासाठी देण्यात आले असून ‘पेटती मशाल’ हे निवडणूक चिन्ह प्रदान करण्यात आले,या पार्श्वभूमीवर नागपूरात दिघोरी येथे संपर्क प्रमुख दुष्यंत चतुर्वेदी यांच्या मार्गदर्शनात,शहर प्रमुख नितीन तिवारी यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत उभे राहण्याचा संकल्प ‘पेटती मशाल’घेऊन साजरा केला.

तिवारी यांनी सांगितले की निवडणूक चिन्ह कोणतेही असो,राज्यातील जनतेच्या मनात उद्धव ठाकरे हे कुटूंब प्रमुख म्हणून राज्य करीत राहतील.या पेटत्या मशालीप्रमाणे प्रत्येक शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासाठी पुरुषार्थाच्या अग्नित जळेल व गद्दार तसेच त्यांच्या मागील महाशक्तीच्या विनाशासाठीचा प्रण आज शिवसैनिकांनी केला असल्याचे ते म्हणाले.

याप्रसंगी शहर प्रमुख दीपक कपसे , वाहतूक सेना ज़िलाध्यक्ष नितिन नायक , मुन्ना तिवारी ,विभाग प्रमुख विशाल कोरके, अभीशेक धुर्वे, नीलिमा शास्त्री, श्रीकांत खंडाडे, गौरव मोहोड़,रमेश काकड़े आदी शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

Latest बातम्या