Homeनागपूर न्यूजपदवीधर निवडणूक: जोशी,वंजारींसह ३१ उमेदवार रिंगणात

पदवीधर निवडणूक: जोशी,वंजारींसह ३१ उमेदवार रिंगणात

नागपूर,ता.१२ नोव्हेंबर:हापौर संदीप जोशींसह काँग्रेसचे ॲड.अभिजित वंजारी,विदर्भवादी नितीन रोंघे,बसपाचे प्रशांत डेकाटे यांच्यासह एकूण ३१ उमेदवारांनी पदवीधर निवडणूकीसाठी आपली उमेदवारी दाखल केली आहे. १७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.यातून किती अर्ज मागे घेण्यात येईल यावर पुढील चित्र रंगणार आहे.

अभिजित वंजारी यांच्यासोबत उमेदवारी दाखल करताना बहूप्रतिक्ष्ि त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष् बाळासाहेब थोरात,उर्जा व पालकमंत्री नितीन राऊत,पशुसंवर्धन व क्रिडा मंत्री सुनील केदार,मदत व पुर्नवसन,ओबीसी खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार,रामटेकचे खासदार कृपाल तुमाने,राष्ट्रवादीचे नेते रमेश बंग,माजी आमदार मोहन जोशी,अाशिष दुवा, काँग्रेसचे शहराध्यक्ष् विकास ठाकरे आदी नेते यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.महाआघाडीतील सर्व पक्ष्ीय नेत्यांनी याप्रसंगी उपस्थित राहून एकीचा संदेश दिला.

महापौर संदीप जोशी यांच्यासोबत माज़ी मंत्री सुधीर मुनगंटीवार,माजी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावणकुळे,खासदार विकास महात्मे,खासदार अशोक नेते,शहराध्यक्ष् प्रवीण दटके, ग्रामीणचे अध्यक्ष् राजीव पोतदार,आ.कृष्णा खोपडे,माजी आमदार सुधाकर देशमुख,अनिल सोले,माज मंत्री सुलेखा कुंभारे,माजी आ.डॉ.मिलिंद माने,अर्चना डेहनकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी भाजपच्या नेतेमंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहूल शक्तीप्रदर्शन केले.

विदर्भाच्या मुद्दावर अनुशेषाचे अभ्यासक नितीन रोंघे यांच्यासह शिवाजी सोनसरे,अमित मेश्राम,सी.ए.भुतडा,नितेश कराळे,सुनीता पाटील,संजय नासरे,गोककुलदास पांडे,रामराव चव्हाण,प्रशांत डेकाटे,राहूल वानखेडे,धर्मेश फुसाटे, अविनाश तुपकर,अतुलकुमार खोब्रागडे,विनोद राऊत,प्रकाश रामटेके,वीरेंद्र जयस्वाल,किशोर वरंभे,शरद जीवतोडे,प्रशांत डबले,संगीता बढे,राजेंद्रकुमार फुले,अजय तायवाडे,संदीप रमेश जोशी,सच्चिदानंद फुलेकर,ॲड.मोहम्मद शाकीर,अभिजित रवींद्र वंजारी,धर्मेद्र मंडलिक अश्‍या एकूण ३१ उमेदवारांनी यांनी आपली दावेदारी दाखल केली आहे.
:

Latest बातम्या