Homeनागपूर न्यूजनिर्बंध असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा आणि वस्तूंचा बेधडक वापर!

निर्बंध असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा आणि वस्तूंचा बेधडक वापर!

नागपूर महानगरपालिका झोपेत !

एनसीपी अर्बन सेलने जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने दिले निवेदन

नागपूर,ता. ५ जून २०२३: शासनाने प्लास्टिक वापरावर बंदी आणली असली तरी, नागपूर शहरात खुलेआम कॅरीबॅगचा वापर होताना दिसून येत आहे. ठिक -ठिकाणी करवाई करून संबधित दुकान चालकांकडून दंडही वसूल करण्यात आले. मात्र, सध्या मोहीम थंडावल्याने सर्रासपणे प्लास्टिकचा वापर सुरू असल्याचे दिसून येत असून, शहरात प्लास्टिक बंदीचे चिन्ह कुठे दिसून येत नाही असा आरोप एनसीपी अर्बन सेलचे शहराध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांनी केला आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टिक, थार्माकॉल, अविघनशिल वस्तूंचे उत्पादन, वापर व विक्री, वाहतूक करणाऱ्या विरुद्ध बंदी आणलेली आहे. महानगरपालिकेकडून सक्तीची कारवाई होणे अपेक्षित आहे तरी सद्यस्थितीत ही मोहीम थंडावली आहे. त्यामुळे बाजारात सर्रासपणे कॅरीबॅगचा वापर सुरू असल्याचे चित्र आहे.

काही तुरळक दुकानावर मात्र कॅरीबॅग ऐवजी कागदी पिशव्या दिल्या जात असल्याचे निदर्शनास येत आहे.एकदा निर्माण झालेले प्लास्टिक हे कधीच नष्ट होत नाही. प्लास्टिकचे तुकडे इतरत्र जमीनमध्ये तसेच नदी व नाल्यात मिसळतात. प्लास्टिकची पिशवी प्राण्यांच्या पोटात गेल्याने अनेक मुक्या जनावरांचे प्राण जातात.त्यामुळे प्लास्टिक वापर टाळणे काळाची गरज आहे.
या संदर्भात एनसीपी अर्बन सेल कडून सक्करदरा चौक येथे आंदोलन करत महानगरपालिकेला निवेदनाद्वारे त्वरित उपाय योजना व्हावी यासाठी-

१. मोहीम तीव्र करून प्लास्टिक वापरावर आळा घालण्यासाठी प्रयत्न करणे.
२.योग्य कचरा व्यवस्थापन पद्धती, महानगरपालिका शहरांमधील कचरा व्यवस्थापन पद्धती सुधारण्यासाठी पायाभूत सुविधा आणि शिक्षण कार्यक्रम राबिविण्यात यावे. ४. लोकांना पुन्हा वापरता येण्याजोग्या उत्पादनांचा वापर करण्यास प्रोत्साहित करणे, जसे की कापडी पिशव्या, पाण्याच्या बाटल्या आणि अन्न कंटेनर.
५. विविधमाध्यमांद्वारे सार्वजनिक प्लास्टिकच्या प्रभावाविषयी जनजागृती मोहीम राबवणे.
६. स्वयंसेवी संस्था आणि, जनप्रतिनिधी, जागरूक नागरिकांचा या मोहिमेत सहभाग वाढवून त्यांना पर्यावरण मित्र म्हणून जबाबदारी देत त्यांच्याकडून मदत घ्यावी.

या सर्व बाबींची पूर्तता लवकर न झाल्यास एनसीपी अर्बन सेल तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
आज एनसीपी अर्बन असेल तर्फे ५० मायक्रोनच्या प्लास्टिक पिशव्या आणि इतर वस्तूंचा निषेध करत आंदोलन करण्यात आले. तसेच नागपूर महानगरपालिका यांच्या कुचकामी कार्यासाठी निषेध करत विरोधात नारे लावण्यात आले .

याप्रसंगी अर्बनसेलचे निरीक्षक अरविंद जी भाजीपाले, अध्यक्ष श्रीकांत शिवनकर , अर्बन सेलचे अँड. फाजील चौधरी, संदीप खंगार, एकनाथ फलके, महबुब पठाण,शेख मोहसीन, निसार अली,मो. आसिफ खान,अनिकेत गोये,घनश्याम शाहु, राहुल,सोनू पंवार आकाश सहारे, सचिन पाटील आणि पदाधिकारी उपस्थित होते.

………………………..

Latest बातम्या