Homeनागपूर न्यूजनागपूर मॉडेल मिल चाळ कामगारांना लवकरच मिळणार घर: अर्चना डेहनकर

नागपूर मॉडेल मिल चाळ कामगारांना लवकरच मिळणार घर: अर्चना डेहनकर

३२० कामगार कुटूंबियांच्या पुर्नवसनाचा मार्ग मोकळा

मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांचे मानले आभार

नागपूर,ता.६ जून २०२३: अनेक वर्षांपासून रखडलेले मॉडेल मिल चाळीचे पुनर्वसन आता लवकरच होणार आहे.१९९७ पासून मॉडेल मिल कामगारांचे पुनर्वसन व्हावे याकरता (एनटीसी ) नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशन यांच्याकडे पाठपुरावा केला असता, बी एफ आर यांच्या आदेशाने निविदा काढून, नागपूर नगर भूमापन क्रमांक १६१ मॉडेल मील लेबर चाळ नागपूर,ही जागा कामगार चाळीच्या पुनर्विकास व पुनर्वसाहत करण्याकरता करारनामा पत्र मिळाले असल्याचे माजी महापौर अर्चना डेहनकर यांनी पत्रकाद्वारे सांगितले.

या पत्राद्वारे दिनांक २६ डिसेंबर २००९ रोजी पी अँड पी असोसिएट यांना मिळाली त्यानंतर जागेचे विक्री पत्र एनटीसी ने २०११ रोजी केले आणि त्यामध्ये ३२० कामगारांच्या पुनर्वसन करण्याच्या अटी शर्तीवर विक्री पत्र देण्यात आले.

शासन निर्णय क्रमांक टीपीएस २४ ०५/२७- सीआर ११५ युडी ९,दिनांक ५ डिसेंबर २००६ नुसार निविदा देण्यात आल्या होत्या .

तदनंतर शासन निर्णय टीपीएस २४ १५ १९६१ १/२०१६ नवीन ९ दिनांक २५ ११ १६ मधील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ३७२ नुसार बेसिक एफएसआय जो होता त्याच्यामध्ये बाधा निर्माण झाली.

त्यामुळे पुनर्वसन रखडले. परंतु नंतर अनेक वर्ष पाठपुरावा केल्यानंतर अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकार्य केले. महानगरपालिका नागपूर व उपसंचालक नगर रचना विभाग नगररचना संचालनालय पुणे यांच्या अहवालानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व फडणवीस यांनी अर्जदार यांनी अपेक्षलेल्या मुद्द्यानुसार कमी झालेला एफएसआय शासन निर्णय २४ ० ५ / २७ २० सी आर ११५/० ६ ११५ यूडी/९ दिनांक ५ डिसेंबर २००६ नुसार २.५ चटईक्षेत्र कायम ठेवण्यास मंजुरी दिली असल्याचे डेहनकर यांनी सांगितले.

नागपुरातच नव्हे तर विदर्भातील अशा प्रकारची मॉडेल मील कामगारांची वसाहत ही एकमेव असल्यामुळे या चाळीमध्ये ३२० कुटूंबियांना निशुल्क घर उपलब्ध होत असल्यामुळे याला विशेष प्राधान्य देऊन कामगारांना न्याय देण्याचं काम शिंदे फडणवीस सरकारने केले त्याबद्दल डेहनकर यांनी फडणवीस सरकारचे विशेष आभार व्यक्त केले.

तसेच मॉडेल मिल कामगार किरायदार संघटनेचे अध्यक्ष पृथ्वीराज चिमणकर, मोहन बानाईत, सुरेश रामटेके, दीपक बनाईत, फुलचंद शंभरकर, विजय गुप्ता, अनिस शेख, दीपक ढोके, गुलाब बनकर ,केशव श्रोते, अशोक मानकर, सतीश श्रीवास्तव, जगन श्रीवास्त, नगराळे यांच्यासह मॉडेल मिल चाळ कामगार गणेश पेठ येथील सर्व रहिवाशांच्या वतीने आभार मानले.

Latest बातम्या