Homeब्रेकिंग न्यूजनागपूरात राज्य महिला आयोगाच्या नावाने खोटी नोटीस!

नागपूरात राज्य महिला आयोगाच्या नावाने खोटी नोटीस!

Advertisements
कौटूंबिक हिंसाचार प्रकरणात धक्कादायक वास्तव आले समोर

माजी महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकरांकडूनही दूर्लक्ष
आयोगाकडून फक्त पत्रव्यवहाराची खानापूर्ती
नागपूर,ता.२८ मे २०२६: एका कुटूंबातील कौटूंबिक हिंसाचाराचे भांडण चक्क राज्य महिला आयोगाच्या खोट्या नोटीस पाठवण्यापर्यंत पोहोचले,ही बाब महिला आयोगाच्या  माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यापर्यंत पोहोचली,मात्र,नोटीसवरील पोलिस निरीक्षक निशा घई नावाची कोणतीही पोलिस अधिकारी महिला आयोगात कार्यरत नसल्याने कारवाई कोणावर करु?असे उत्तर पिडीतेला मिळाल्याची धक्कादायक बाब राज्याच्या उपराजधानीत घडली.
लक्ष्मी अंकित खंडाईत नावाच्या अतिशय गरीब घरातील महिलेला आयोगाच्या लेटरहेडवर निशा घईची स्वाक्षरी असलेले पत्र सप्टेंबर २०२२ मध्ये मिळाले.हे पत्र लक्ष्मी यांच्या माहेरी आले.ते व्हॉट्स ॲपवर त्यांच्या आईने नागपूरात राहत असलेल्या लक्ष्मी यांच्या पतीला पाठवले.पत्र वाचून लक्ष्मी यांना मानसिक धक्का बसला,कारण लक्ष्मी त्यावेळी आठ महिन्यांच्या गरोदर होत्या व पत्रानुसार त्यांना चौकशीसाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या बांद्रे पूर्व,मुंबई येथील कार्यालयात तातडीने बोलावण्यात आले होते!

कोराडी येथील रहीवासी रजनी शिंदे-खंडाळे नामक महिलेने लक्ष्मी यांच्या विरोधात मारहाण व शिविगाळ इत्यादी घटनेविषयी तक्रार नमूद केल्याचे महिला आयोगाने पाठवलेल्या पत्रात उल्लेखित आहे.हे पत्र मिळाल्यावर अतिशय अल्पवेतनावर पूर्वी शेत मजूरी व नंतर १५०० रुपये वेतनावर खासगी कंपनीत कार्यरत असलेल्या पतीलाही मानसिक धक्का बसला.त्या पतीसोबत काेराडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यास गेल्या असता,रजनी शिंदे यांचा भाऊ प्रदीप शिंदे तसेच त्यांची आई प्रेमलता शिंदे यांनी लक्ष्मी यांना तक्रार देण्यापासून अडवले व आपण ही तक्रार महिला आयोगास मागे घेण्यास सांगू,अशी मखलाशी केली!मूळात महिला आयोगाकडून प्राप्त ही नोटीस खोटी आहे,हे त्या दोघांनाही माहिती होते,असा आरोप लक्ष्मी यांनी खास ‘सत्ताधीश’सोबत बोलताना केला.
सावनेर येथे राहणा-या लक्ष्मी यांनी नागपूरचे पोलिस आयुक्त यांना दिलेल्या तक्रारीनुसार त्या आपल्या पतीसोबत प्रेमलता शिंदे यांच्या विद्या नगर कोराडी येथील घरी २८ जुलै २०२२ पासून भाड्याने राहत होत्या.त्यावेळी प्रेमलता शिंदे यांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया झाली असल्याने,लक्ष्मी यांनी स्वत:च्या घरुन चहा-नाश्‍ता व जेवण पुरवले.याशिवाय त्यांच्या घरी घरकाम देखील केले.त्यावेळी लक्ष्मी या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या.परिणामी,नंतर त्यांना प्रेमलता यांच्या घरचे काम झेपावले नाही व त्यांनी ते काम सोडून दिले.यानंतर त्यांच्यात वाद झाला,इतकंच नव्हे तर प्रेमलता यांनी अपशब्द वापरुन स्वत:च्या मुलासोबत लक्ष्मी यांचे संबंध जोडले!याची तक्रार लक्ष्मी यांनी प्रदीप शिंदे यांच्याकडे केली.त्यांनी आईची मानसिक स्थिती बरोबर नसल्याने लक्ष देऊ नकोस,असे सांगून या वादाकडे दूर्लक्ष केले.
मात्र,प्रदीप यांची बहीण रजनी शिंदे(खंडाळे)यांनी लक्ष्मी यांना धमकी दिली व लवकरच लक्ष्मीला तुरुंगात डांबणार असल्याचा इशारा दिला.माझा पती असिसटेंट कमिश्‍नर असल्याचे रजनी यांनी लक्ष्मी यांना सांगितले.यानंतर तब्बल महिनाभर फोनवरुनही लक्ष्मी यांना रजनी यांनी धमकावले असल्याचे पोलिस आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत लक्ष्मी यांनी नमूद केले.यानंतर लक्ष्मी यांना चक्क महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची तातडीने चौकशीसाठी मुंबईला येण्याची नोटीसच मिळाली!
लक्ष्मी यांनी प्रेमलता यांनी सून मोनिका शिंदे-गेडाम यांना ही नोटीस दाखवली.यावर मोनिका यांनी ही नोटीस बोगस असू शकते असे सांगून, या विरोधात कोराडी पोलिस ठाणे व  राज्य महिला आयोगाकडे रितसर तक्रार नोंदवण्याचा सल्ला लक्ष्मी यांना दिला. मात्र,प्रदीप शिंदे व प्रेमलता शिंदे यांनी लक्ष्मी व तिच्या पतीला कोराडी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यापासून रोखले.
यानंतरही लक्ष्मी यांनी महिला आयोगाकडे याची लेखी तक्रार केली.जानेवरी २०२३ मध्ये लक्ष्मी यांना पहीले मूल झाले.यानंतर १५ नोव्हेंबर २०२३ तसेच १८ एप्रिल २०२३ रोजी वनामती येथे महिला मेळाव्यात लक्ष्मी व मोनिका गेडाम यांनी तत्कालीन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना या खोट्या नोटीसबाबत प्रत्यक्ष भेटून अवगत केले.चाकणकर यांनी याची गंभीर दखल न घेता,ही खोटी नोटीस असल्याचे सांगत, फाडून फेकून देण्याचा सल्ला लक्ष्मी यांना दिला व पोलिसांकडे तक्रार करण्यास सांगितले!

लक्ष्मी यांनी यामुळे संपूर्ण कागदपत्रांसह २०२३ मध्ये रजनी शिंदे- खंडारे विरोधात पोलिस आयुक्तांकडे लेखी तक्रार दिली आहे मात्र,अद्याप यावर कोणतीही कारवाई झाली नाही.

‘सत्ताधीश’सोबत बोलताना लक्ष्मी यांनी सांगितले की,रजनी यांनी अनेक महिने त्यांचा पती ‘असिसटेंट कमिश्‍नर’ असल्याचे सांगून त्यांना गरोदार असताना भीती दाखवली.मात्र,त्यांचे पती पोलिस खात्यात नसून रोजगार कार्यालयात त्या पदावर आहेत,याची माहिती त्यांना नंतर मिळाली.
महिला आयोगाच्या पत्रावर पोलिस निरीक्षक निशा घईचे नाव व स्वाक्षरी असल्याने महिला आयोग निशा नावाच्या महिलेचा शोध घेऊन कशी कारवाई करणार?असा देखील प्रश्‍न चाकणकर यांनी उपस्थित केला! नागपूर येथील तत्कालीन महिला आयोगाच्या सदस्य आभा पांडे यांच्याकडे देखील हा विषय नेण्यात आला.त्यांनी हा विषय गंभीर असल्याचे मान्य केले व यावर कारवाई झाली पाहिजे,असे सांगितले.महिला आयोगाच्या लेटरहेडवर कधीही कोणत्याही पोलिस विभागाच्या अधिका-यांच्या स्वाक्ष-या नसतात,हे एका अतिशय गरीब घरातील सात महिन्यांच्या गरोदार स्त्रीला कसे कळणार होते?
माेनिका गेडाम यांच्यावर सासू प्रेमलता,पती प्रदीप तसेच नणद रजनी शिंदे यांच्याकडून सातत्याने होणारा कौटूंबिक छळ या विरोधात लक्ष्मी या जरी भाडेकरु म्हणून त्याच इमारतीत राहत असल्या तरी त्या मोनिका यांची बाजू घेत असल्याने,क्षुल्लक कारणांवरुन व विचित्र संशयांवरुन प्रेमलता व रजनी शिंदे यांनी त्यांच्या कौटूंबिक वादात लक्ष्मी यांना देखील भरडले.
थोडक्यात,कौटूंबिक वादात चक्क महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या नावाने खोट्या लेटरहेडवर एखाद्या गरीब व गरोदर स्त्रीला नोटीस पाठवून ,मुंबईत चौकशीला बोलावण्यात आले,या मागे सरकारी खात्यातील कोणत्या अधिका-याचा हात होता?ही नोटीस कोणी,कुठे व कशी तयार केली?याचा पाठपुरावा करुन दोषींना शिक्षा करण्याची मागणी लक्ष्मी यांनी केली.
…………………………………….
Advertisements
Advertisements

Latest बातम्या