Homeनागपूर न्यूजनागपूरात कोरोनाची लाट कायम: आज १३ बाधित:बाधितांची संख्या ३३१ वर

नागपूरात कोरोनाची लाट कायम: आज १३ बाधित:बाधितांची संख्या ३३१ वर

५३ बाधितांनी केली काेरोनावर मात

नागपूर,१५ मे: नागपूरात कोरोना बाधित होण्याची लाट ही अद्यापही कायम असून आज शुक्रवार दि.१५ मे रोजी आणखी १३ संशयितांचे अहवाल हे पॉझिटीव्ह आले आहेत.शहरात आज बाधितांची संख्या ही ३३१ वर पोहोचली आहे. हे सर्व संशयित विलगीकरणातील आहेत. सिम्बॉयसिस तसेच इतर विलगीकरण केंद्रातून यांना आज मेडीकलमध्ये आणण्यात आले.

शहरातील टिमकी भानखेडा परिसरातील १२ तर गड्डीगोदाम,खलाशीनगर येथील १ अश्‍या १३ संशयितांचे अहवाल आज पॉझिटीव्ह आलेत. काल गुरुवार दि. १४ मे रोजी शहरात ३ रुग्णांचे अहवाल हे पॉझिटीव्ह आले होते. त्या पैकी दोन रुग्ण हे सारीचे रुग्ण होते. मेडीकलच्या सारी वार्डात त्यांच्यावर उपचार सुरु होते.या तिन्ही रुग्णांचा अहवाल हा गुरुवारी पॉझिटीव्ह आला. यात व्हीएनआयटी विलगीकरणातील २८ वर्षीय तरुणासह सारी संसर्गितांमध्ये २० आणि ६५ वर्षीय रुग्णाचा समोवश आहे.सारीचा संसर्ग झाल्याने आणखी दोघांना काल मेडीकलमध्ये भरती करण्यात आले होते.रामेश्‍वरीतील १७ वर्षीय मुलगी आणि मनीषनगरातील ८६ वर्षीय रुग्णाचा यात समावेश आहे.

मेयाे रुग्णालयात आज शुक्रवारी एकूण २४१ चाचण्या घेण्यात आल्या त्यातील १२ चाचणींचा अहवाल हा पॉझिटीव्ह आल्याची माहिती मेयोचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलिया यांनी दिली. मेयोच्या ओपीडीमध्ये तपासणीसाठी आलेल्या एका रुग्णाचा अहवाल देखील हा पॉझिटीव्ह आला.ओपीडीमध्ये आलेल्या २५ रुग्णांना आज भरती करण्यात आले तर १३ रुग्णांना तपासणीनंतर घरी पाठवण्यात आले.

मेडीकलमध्ये भरती असणा-या ६५ वर्षीय इसमाचा मृत्यू कोरोनामुळे झाला अशी बातमी आज सकाळपासूनच विविध माध्यमांवर प्रसिद्ध झाली. मृतक पांढराबोडीतील रहीवाशी असून ६ मे रोजी मेडीकलमध्ये भरती झाल्याचे सांगण्यात आले होते. मेडीकलच्या काेव्हिड वार्डात मृतकावर उपचार सुरु असल्याचे सांगितले जात होते.

कोरोनामुळे मृत्यू नाही- डॉ.अविनाश गावंडे
कोरोनामुळे आज मेडीकल रुग्णालयात कोणाचाही मृत्यू झाला नाही. ज्या रुग्णाचा मृत्यू झाला त्याच्या कोरोना चाचणीचा अहवाल हा निगेटीव्ह आला आहे. या रुग्णाला किडनी व मधूमेहचा त्रास होता.

आज ५३ रुग्णांनी केली कोरोनावर मात-

मेयो रुग्णालयातून आज शुक्रवारी एकूण ५३ रुग्णांना सुटी देण्यात आली.एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण घरी जाण्याची ही पहीलीच वेळ असल्याचे म्हटले जात आहे. नागपूरात आता काेरोनावर मात करणा-यांची संख्या ही १९३ झाली आहे.विशेष म्हणजे काेरोनावर मात करणा-यांमध्ये गर्भवती माता,तीन वर्षाचे,चार वर्षाचे चिमूरडे यांच्या सह वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. परिणामी कोराेनाचा संसर्ग झाला तरी योग्य वेळी योग्य तो उपचार घेतल्यास रुग्ण हा पूर्णपणे बरा होऊन घरी सुखरुप परततो,याचे आदर्शवत उदाहरण कोरोनावर मात करणा-या या १९३ रुग्णांनी घालून दिले आहे.

शासनाच्या नव्या निर्देशाप्रमाणे रुग्णांना ९,१० व ११ व्या दिवशी कोराेनाची लक्ष् णे न दिसल्यास व पहील्या दोन चाचण्यांचा अहवाल हा निगेटीव्ह आल्यास त्यांना सुटी देण्यात यावी. कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या ,मात्र लक्ष् णे नसलेल्या रुग्णांच्या उपचारासंबधी आयसीएमआरने नव्याने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यामुळे अशा रुग्णांना ूफार काळ रुग्णालयात न ठेवता घरी वा संस्थात्मक विलगीकरणातून त्यांच्यावर उपचारासंबधी सूचना जारी केल्या होत्या. मेयाेमधील आज सुटी होणारे हे ५३ रुग्ण यांच्या दूसराही अहवाल निगेटीव्ह आला व यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्ष् णे आढळतली नसल्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने रुग्णांना सुटी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. काल गुरुवारी ३९ रुग्ण हे घरी परतले होते.

Latest बातम्या