Homeनागपूर न्यूजनागपूरात करोनाचे चार बाधित!

नागपूरात करोनाचे चार बाधित!

नागपूर: नागपुरात करोना विषाणूची लागण झालेल्या एकूण १८ संशयितांची चाचणी शनिवार दिनांक १४ मार्च रोजी करण्यात आली यातील ४ संशयितांच्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे,नागपूरात आता एकूण करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ४ झाली असून यातील ३ मेडीकल तर १ मेयौ रुग्णालयातील रुग्ण आहे.

विदर्भात शनिवारपर्यंत एकूण १०२ करोना संशयित रुग्णाची तपासणी करण्यात आली यातील २१ रुग्ण मेयो तर मेडिकल मधील २९ रुग्णांची चाचणी करण्यात आली. मेयो येथील १ तर मेडिकल मधील ३ रुग्णांना करोनाची बाधा झाल्याचे अहवालात निष्पन्न झाले,नागपुरात एकूण ४ करोना बधितांची संख्या झाल्याचे खात्रीलायक सूत्राकडून कळले.

याशिवाय यवतमाळ येथील ९ पैकी २ रुग्णांचा अहवाल पॉझीटीव्ह आला असून अमरावती-१,वर्धा-२,सेवाग्राम-१,अकोला-१,गोंदिया-१, नागपूर महानगरपालिका रुग्णालय-८, चंद्रपूर-२,छत्तीसगढ-२०,मध्यप्रदेश-७ संशयित रुग्णांचे अहवाल अद्याप यायचे आहे,असे सूत्रा कडून कळले. जगभरात थैमान घातलेला करोना आता विदर्भातही धडकला आहे.

 चीन, इराण, इटली, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या सात देशांमधून प्रवास केलेल्यांना विलग करण्यात यावे, अशी सूचना केंद्र सरकारकडून करण्यात आली होती. या सूचनेनुसार, या सात देशांतून आलेल्या व येणाऱ्या प्रवाशांचे १०० टक्के विलगीकरण करण्यात येत आहे. या देशातून १५ फेब्रुवारीनंतर ज्यांनी प्रवास केला आहे आणि ते देशात परतले आहेत, त्यांना सक्तीने १४ दिवस घरीच स्वतंत्र राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळे असलेल्या शहरांमध्ये विलगीकरणाची सुविधा तातडीने निर्माण करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. या सूचनेनुसार नागपुरात आमदार निवास येथील विंग-२ येथे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Latest बातम्या