Homeनागपूर न्यूजनागपूरमधल्या नेत्याला मुंबई प्रिय:संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

नागपूरमधल्या नेत्याला मुंबई प्रिय:संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

Advertisements
Advertisements

शिवसंपर्क अभियानासाठी राऊत नागपूरात

नागपूर,ता. २१ मार्च २०२२: शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेप्रमाणे शिवसेनेचे खासदार हे विदर्भातील जिल्ह्यांच्या दौ-यावर असून खासदार संजय राऊत यांचे आज नागपूरात आगमन झाले.विमानतळावर माध्यम प्रतिनिधींसोबत बोलताना आम्हा मुंबईकरांना नागपूर प्रिय आहे मात्र नागपूरच्या नेत्याला मुंबई प्रिय असल्याचा टोला संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या सूचनेनुसार विदर्भ व मराठवाड्यात शिवसंपर्क अभियान सुरु करण्यात आले असून नागपूर हे उपराजधानीचे व मुख्य स्थळ असल्याने मी येथेच थांबणार व संपूर्ण जिल्ह्यांवर लक्ष ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.विदर्भ आणि मराठवाड्यात शिवसेनेचे संघटन आणखी वाढवण्यासाठी हा शिवसंपर्क अभियान उद्यापासून सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले.येणारी लोकसभा,विधानसभा आणि महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या उद्देशातून हा जनसंपर्क राबविला जात असल्याचे त्यांनी सांगितले.यासाठी शिवसेनेच्या विदर्भातील सर्व खासदारांसोबत मुंबई,ठाणे येथील वीस-वीस कार्यकर्ते देखील सोबत असणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फक्त दोन तास झाेपेविषयी छेडले असता,चांगलं आहे मोदी इतक्या तास काम करतात, ते अठरा-अठरा तास काम करतात मात्र आता महाराष्ट्राच्या नेत्याने त्यांना दोन तास ही झोपू द्यायचे नाही असं ठरवलेलं दिसतं,तसं ही शिवसेनेमुळे महाराष्ट्राच्या नेत्यांची झोप उडाली असल्याची कोटी त्यांनी केली.मोदी फक्त दोन तास झोपतात हे महाराष्ट्राचे नेता सांगत असतात,असं मोदी सांगत नाहीत,मी दिल्लीतही राहत असतो,खासदार कृपाल तुमाने हे देखील दिल्लीत राहातात त्यांना ही माहिती आहे मात्र महाराष्ट्राचा नेता मोदींना थोडं जास्तच वर चढवत असल्याचा टोला त्यांनी हाणला.

संपूर्ण देश सोडून महाराष्ट्र व पश्‍चिम बंगालात केंद्रिय तपास यंत्रणांचा केंद्र सरकार दूरुपयोग करीत असल्याचा आरोप देखील एका प्रश्‍नाच्या उत्तरात त्यांनी केला.उद्या सकाळी सव्वा अकरा वाजता संजय राऊत हे प्रेस क्लब येथे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.

Latest बातम्या