Homeदेश-विदेशनागपूरचा बहूमान:मेडीकलला ४९ व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

नागपूरचा बहूमान:मेडीकलला ४९ व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

आयएपीएसएम आणि आयपीएचएतर्पे ३ मार्चपासून राष्ट्रीय परिषद

नागपूर,दि.२४ फेब्रुवारी: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला (मेडिकल) ७५ वर्षे पूर्ण होत असून या अनुषंगाने आयएपीएसएम आणि आयपीएचएच्या संयुक्त विद्यमाने येत्या ३ ते ५ मार्चपर्यंत ऑनलाईन पद्धतीने ४९ व्या वार्षिक राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती परिषदेचे आयोजक अध्यक्ष डॉ. उदय नारलावार यांनी गुरूवारी पत्रपरिषदेत दिली. या परिषदेचा बहुमान नागपूरच्या मेडिकल कॉलेजच्या जनऔषध वैद्यक शास्त्र विभागाला मिळाल्याचे ते म्हणाले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) व इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील जनऔषध शास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद घेतली जाणार आहे. परिषदेत चार राष्ट्रीय तसेच सात राज्यस्तरीय पारितोषिक उत्कृष्ट प्रबंध सादर करणा-यांना देण्यात येईल. परिषदेत १५०० ते २०० प्रतिनिधी सहभागी होतील.

परिषदेच्या आधी दोन दिवसीय सीएमई आणि दोन दिवसीय कार्यशाळा होतील. शिवाय परिषदेनंतर दोन सीएमईचेही आयोजन करण्यात आले आहे. परिषदेचे ‘बीयोंड दी पॅनडेमिक : टाईम टू मुव्ह‘ हे ब्रिद असल्याचे डॉ. नारलावार यांनी सांगितले. कोविड-१९ चा सामना करीत असताना खूप अनुभव आलेत. या अनुभवातून शिकत आता आपल्याला नैसर्गिक आणि सामान्य जीवन जगायचे आहे. कोरोना विषाणुमुळे बरेच बदल झालेत. मात्र आता पुन्हा यातून सावरण्यासाठी सामाजिक, आर्थिक परिस्थिती सुधारण्याची गरज आहे. परिषदेत आरोग्यासंदर्भातील कोणत्या योजना असाव्या, याबाबत सांगोपांग चर्चा करण्यात येईल. परिषदेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील वक्त्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यात अर्ली चाईल्ड डेव्हलपमेंट, न्युट्रीशन, मॅटरनल अ‍ॅण्ड चाईल्ड हेल्थ, आपत्ती व्यवस्थापन, टीबी, मेंटल हेल्थ यावर चर्चा होईल. परिषदेला राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे व उच्च शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सदिच्छा प्रदान केल्या असल्याचीी माहिती डॉ.नारलावार यांनी दिली.

सुरवातीच्या काळात कोविड-१९ हा शब्दच संपूर्ण जगासाठी अनोळखी होता तसाच तो भारतीय वैद्यकीय शास्त्रासाठी देखील अपरिचित होता मात्र त्या ही काळात नागपूर मेडीकलमध्ये आमच्या विभागातर्फे कोविड स्क्रीमिंग ओपीडी चालवणे,कम्यूनिटी विभागातर्फे आदर्श लसीकरण केंद्र चालवणे,कॉन्टेक्ट ट्रेसिंग आमच्या पीएसए विभागाने सांभाळला,रिर्पोटींगसाठी आमच्या पदव्यूत्तरच्या विद्यार्थ्यांचे योगदान तसेच सिरो सर्व्हिलेंसचे काम शासकीय मेडीकल महाविद्यालयात पीएसएम विभागाने सर्वात चांगल्यारितीने केल्याचे परिषदेचे आयोजक उपाध्यक्ष डॉ.अविनाश गावंडे यांनी सांगितले.दोन्ही महाविद्यालयातील पदव्यूत्तर विद्यार्थी या परिषदेचा प्रमुख कणा असल्याचे ते म्हणाले.परिषदेची संपूर्ण तयारी झाली असून कोविडमुळे ही परिषद ऑन लाईन घेतली जात आहे.आम्ही नोव्हेंबर २०२१ रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे ही आंतरराष्ट्रीय परिषद ऑफ लाईन घेता येईल का?याबाबत चाचपणी केली मात्र करोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर असल्याने त्यांनी ,आताच मी मार्चमधील परिस्थिीती नेमकी काय असेल,हे सांगू शकत नसल्याचे म्हणाल्या.यानंतर ऑमिक्रोनची तिसरी लाट सुरु झाली ती जरी सौम्य वाटत असली तरी त्याचा प्रादुर्भाव बघता व आंतरराष्ट्रीय परिषद असल्याने तसेही फक्त ५० लोकांच्या मर्यादेत एवढी महत्वपूर्ण व ज्ञानवर्धक परिषद पार पाडणे शक्य नव्हते,त्यामुळे मार्च महिन्यातील नियोजित परिषद आम्ही ऑन-लाईन घेण्याचाच निर्णय घेतल्याचा डॉ.गावंडे यांनी सांगितले.

या परिषदेत जागतिक आरोग्य संघटना(डब्ल्यूएचओ)युनिसेफ,पाथ,सीटीडी,ॲक्सेस हेल्थ इंटरनॅशनल,जेएचपीआयईजीओ,आरोग्य मंत्रालय इत्यादीसारख्या नामवंत संस्था व संघटनांची सहभाग राहणार आहे.

या परिषदेचे यशस्वी आयोजन मुख्य आयोजक अध्यक्ष डॉ.उदय नारलावार,आयोजक सचिव डॉ.अशोक जाधव,उपाध्यक्ष डॉ.सुषमा ठाकरे,डॉ.अविनाश गावंडे,उपसचिव डॉ.सोनाली पाटील,डॉ.सरीता वाधव,डॉ.समीर गोलावार,काेषाध्यक्ष डॉ.प्रशांत बागडे,सह कोषाध्यक्ष सुरेश मोरे हे आयोजन करीत असून या परिषदेसाठी मुख्य आयोजक डॉ.सुधीर गुप्ता,मुख्य सल्लागार डॉ.संजय झोडापे मोलाची मदत करीत असल्याची माहीती त्यांनी दिली.या परिषदेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकित वर्कृत्वशैलीचे धनी तज्ज्ञ विविध विषयांवर मोलाचे मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

.कोविड-१९ सारख्या विषाणूचा सामना कसा करायचा?पुढील काळात आपली भूमिका कशी राहील?यावर देखील परिषदेत चर्चा होणार असून इंडियन असोसिएशन ऑफ प्रिव्हेंटिंव्ह ॲण्ड सोशल मेडिसीन(आयएपीएसएम) तसेच इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशन(आयपीएचए)यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद होणार आहे.या संघटनेत सुमारे ५७०० पेक्षा जास्त वैद्यकीय शिक्षक,संशोधक,तज्ज्ञ मंडळी आजीवन सदस्य म्हणून कार्यरत आहेत.दरवर्षी या परिषदेत सुमारे १५०० ते २००० प्रतिनिधी सहभागी होत असतात,यंदाच्या परिषदेत १७०० प्रतिनिधींची नोंद झाली असून मार्चपर्यंत ही संख्या यापेक्षा अधिक राहण्याची शक्यत आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील जन औषधीशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद पार पडणार असल्याची माहिती डॉ.उदय नारलवार यांनी याप्रसंगी दिली.

चर्चेत डॉ. जेम्स लानचार्ड, डॉ. आशा प्रतिनिधी,, डॉ. गजानन वेल्लाळ,डॉ.प्रदीप आवटे,डॉ. बी.एस.गर्ग,डॉ.सुभाष ठाकरे,डॉ.कादरी जे तज्ज्ञ म्हणून सहभाग घेतील.

परिषदेसाठी डॉ. ज्योत्सना देशमुख, डॉ. शिल्पा लांजेवार, डॉ. संदीप भेलकर, डॉ. उज्ज्वला उके, डॉ. मंजुषा ढोबळे, डॉ. पवन मेश्राम, डॉ. प्रगती राठोड, डॉ. प्रिया ढेंगरे, संजय अग्रवाल, डॉ. पवन मेश्राम, डॉ. अभय चव्हाण, डॉ. महेश जाजलवार, डॉ. ऋषाली लिल्हारे, डॉ. भाग्यश्री गावंडे, डॉ. निशा अग्रवाल, डॉ. आरसीया शेख इत्यादी परिश्रम घेत आहेत.

Latest बातम्या