

गडकरी व बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती : २८ मे पर्यंत शहरातील ४० मैदानांत चालणार क्रीडा महोत्सवाचा रणसंग्राम
नागपूर, ता. १३ : नागपूर शहरातील खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा संघटक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी बहुप्रतीक्षित ठरलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या रणसंग्रामला उद्या शुक्रवारी (१३ मे) सुरूवात होत आहे. शुक्रवारी सायंकाळी ५्.३० वाजता मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार पद्मश्री धनराज पिल्ले यांच्या हस्ते खासदार क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन होईल.
ज्यांच्या संकल्पनेतून खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून हजारो खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळाले असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व माजी पालकमंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे हे उद्घाटन कार्यक्रमाचे मुख्य अतिथी राहतील. विशेष अतिथी म्हणून खासदार डॉ. विकास महात्मे, माजी खासदार अजय संचेती, माजी मंत्री सुलेखाताई कुंभारे, आमदार प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, नागो गाणार, समीर मेघे, टेकचंद सावरकर, परिणय फुके, रामदास आंबटकर, माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी आमदार सर्वश्री सुधाकर देशमुख, प्रा. अनिल सोले, गिरीश व्यास, नाना शामकुळे, सुधाकर कोहळे, डॉ. मिलींद माने आदी उपस्थित राहतील.
खासदार क्रीडा महोत्सवाच्या अंतर्गत २८ मे पर्यंत १६ दिवस ३४ खेळांच्या स्पर्धा एकाचवेळी ४० मैदानांवर चालतील. यामध्ये एकूण ९२३७ सामने खेळविण्यात येणार असून ५६० चषक, ७८३० पदक देण्यात येणार असून या क्रीडा महोत्सवाच्या रणसंग्रामात तब्बल ४० हजार खेळाडूंचा सहभाग असणार आहे. विजेत्यांना ९३ लक्ष रुपयांचे रोख पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
हे ही वाचा…..
शुक्रवारी महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात ‘इंडियाज गॉट टॅलेंट’मध्ये सहभागी झालेल्या चमुकडून योगासनाचे प्रात्याक्षिक सादर केले जाईल. याशिवाय योगा, मलखांब आणि लेझीम चे सुद्धा सादरीकरण होईल.
उद्घाटन कार्यक्रमाला शहरातील खेळाडू, क्रीडा संघटक, क्रीडाप्रेमी तसेच नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर श्री. संदीप जोशी यांनी केले आहे.
स्पर्धेचे वेळापत्रक-
सॉफ्टबॉल – १४ ते १६ मे, विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर
योगासन – १४ ते १६ मे, कविवर्य सुरेश भट सभागृह
कबड्डी – १४ ते २० मे, चिटणवीस पार्क
बास्केटबॉल – १४ ते २७ मे, भगवाननगर, गुरूदेव नगर, तिरंगा चौक, बजाज नगर
सायकलिंग – १५ मे, दीक्षाभूमी
बेंच प्रेस पॉवरलिफ्टिंग – १५ व १६ मे, हिंदू मुलींची शाळा, महाल
कॅरम – १५ ते १७ मे, खदान मैदान, हंसापुरी
खो-खो – १५ ते १८ मे, महिला महाविद्यालय, नंदनवन
तिरंदाजी – १६ व १७ मे, तिरपुडे महाविद्यालय
बुद्धिबळ – १७ ते १९ मे, कविवर्य सुरेश भट सभागृह
तलवारबाजी – १७ व १८ मे, पाटीदार भवन, लकडगंज
हॉकी – १७ ते १९ मे, विदर्भ हॉकी असोसिएशन मैदान, अमरावती रोड
कुस्ती – १७ ते १९ मे, लालगंज नाईक तलाव, बांगलादेश
ॲथलेटिक्स – १७ ते २० मे, विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर
बॅडमिंटन – १८ ते २२ मे, सुभेदार हॉल, विद्यापीठ मैदान
हँडबॉल – १९ ते २१ मे, यशवंत स्टेडियम
गर्ल्स बॉक्स क्रिकेट – १९ ते २२ मे, बजाज नगर
व्हॉलिबॉल – १९ ते २२ मे, रेशीमबाग
तायक्वांडो – १९ ते २२ मे, विवेकानंद नगर
टेबल टेनिस – २० ते २२ मे, रामजीवन चौधरी हॉल, महाल
जलतरण – २१ व २२ मे, वैशाली नगर
मॅरेथॉन – २२ मे, यशवंत स्टेडियम
बॉडी बिल्डिंग – २२ मे, रेशीमबाग मैदान
फुटबॉल – २२ ते २६ मे, एनएडीफ डॉ. आंबेडकर स्टेडियम, सुयोग नगर
मलखांब – २३ व २४ मे, न्यू महालक्ष्मी नगर
सेपक टॅकरॉ – २३ व २४ मे, राम नगर
रस्सीखेच – २३ व २४ मे, रेशीमबाग मैदान
ज्यूडो – २३ व २४ मे, ईश्वर देशमुख महाविद्यालय
बॉक्सिंग – २३ ते २५ मे, गांधीबाग उद्यान
टेनिस – २३ ते २५ मे, राम नगर
फुटसल – २३ ते २७ मे, रेशीमबाग मैदान
जिम्नॅस्टिक – २४ व २५ मे, धनवटे नॅशनल कॉलेज, काँग्रेस नगर
रायफल शुटिंग – २५ ते २७ मे, तालुका क्रीडा संकुल, आहुजा नगर
दिव्यांगांसाठी स्पर्धा – २५ ते २७ मे, ईश्वर देशमुख महाविद्यालय मैदान
खासदार क्रीडा महोत्सव वैशिष्ट्ये-
१६ दिवस
३४ खेळ
४० मैदाने
१०६४ संघ
३७६५ ऑफिसियल्स
४०००० खेळाडू
९२३७ सामने
५६० चषक
७८३० पदक
९३ लक्ष रुपये – पुरस्कार राशी

आमचे चॅनल subscribe करा