Homeब्रेकिंग न्यूजधक्कादायक! नागपूरात ‘एसआरपीएफ’च्या ६ जवानांसह १३ पॉझिटीव्ह!

धक्कादायक! नागपूरात ‘एसआरपीएफ’च्या ६ जवानांसह १३ पॉझिटीव्ह!

रुग्ण संख्या ३८७: आज आणखी १२ कोरोनामुक्त

नागपूर,ता. २० मे: एसआरपीएफच्या ६ जवानांसह नागपूरात आज १३ जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचा अहवाल प्रयोगशाळांमधून प्राप्त झाला आहे. यात ५ महिन्याच्या चिमुकल्याचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे या बालकाच्या आई-वडीलांचा अहवाल हा निगेटीव्ह आला असून चिमुकल्याला मात्र कोरोनाने अलगद विळख्यात घेतले आहे. नागपूर शहरातील हा सर्वात कमी वयाचा कोरोना बाधित ठरला आहे.

नागपूरात आज ६ जवानांसह १३ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे रुग्णसंख्या ही आता ३८७ वर पोहोचली आहे. मात्र आज पुन्हा १२ जण हे काेरोनामुक्त होऊन घरी पोहोचले. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या(मेयो)प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या नमुन्यांपैकी ६ नमुने हे पॉझिटीव्ह आढळले. यात एक गड्डीगोदाम तर ५ गोळीबार चौकातील रुग्ण आहेत. यांचा संपर्क मोमिनुपराच्या मृत कोरोना बाधितांशी आला असल्याचे सांगितले जात आहे.

यातील एका कुटुंबातील ५ महिन्याच्या चिमुकल्याला कोरोनाची लागण ही कामवाली बाईकडून झाली असल्याचे सांगितले जात आहे.विशेष म्हणजे या बालकाचे आई-वडील यांचा अहवाल हा निगेटीव्ह आला आहे. प्रारंभी आई-वडीलांनी अहवालावर संशय घेतला मात्र नंतर संशय निववळा असल्याची माहिती आहे. उर्वरित ५ रुग्णांमध्ये घरकाम करणा-या ३२ वर्षीय महिलेसह ७ वर्षांचा मुलगा,५०.६५ व ७५ वर्षीय पुरुषांचा समावेश आहे.

नागपूर ग्रामीणमध्ये कन्हान,कामठीसोबतच आज कोंढाळीजवळील दुधाळीतही एका चिमुकल्यामुळे कोरोनाचा शिरकाव झाल्याने या भागातील आरोग्य विभागाचे पथक हे सतर्क झाले आहेत.

६ जवान आसपीटीएसमध्ये क्वारंटाईन-
नागपूरात पहिल्यांदाज १६ मे रोजी ३ पोलीस हे कोरोना पॉझिटीव्ह आढळले होते.यामुळे पोलीस विभागात खळबळ माजली होती. बाधित पोलीसांच्या कुटुंबातील व संपर्कात आलेल्या पोलीसांचे नमुने तपासले असता ३० पेक्ष्ा जास्त नमुने हे निगेटीव्ह आले. यामुळे पोलीस प्रशासनाने सुटेकचा नि:श्‍वास टाकलाच होता मात्र आरपीटीएसमध्ये क्वारंटाईनमध्ये असलेल्या एसआरपीएफ जवानांसह इतरांचे ३० च्या वर नमुने नीरीच्या प्रयोगशाळेत तपासले असता आज बुधवार दि. २० मे रोजी यातील ६ जवानांचे नमुने हे पॉझिटीव्ह आले आहेत.

कोंढाळीतील ९ वर्षीय बालिकेला नागपूरात लागण!
कोंढाळीजवळील दुधाळा गावातील ९ वर्षीय बालिका आपल्या कुटुंबासह नागपूरात मामाकडे आली होती. १५ मे रोजी हे कुटुंब आपल्या गावी परतले होते. नागपूर मधून आल्याने तेथील लाेकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करण्यास सांगितले. कुटुंबात कोणालाही लक्ष् णे दिसत नसल्यामुळे डॉक्टरांनी हातावर होम कोरोंटाईनचा शिक्का मारला. १६ तारखेला संबंधित डॉक्टरांना हे कुटुंब नागपूरातील कन्टेंन्मेंट भागातून आले असल्याचे कळताच त्यांनी त्याच दिवशी या कुटुंबाला आमदार निवासात क्वारंटाईन केले. आज त्यांचे नमुने तपासले असता ९ वर्षीय चिमुकलीचा अहवाल हा पॉझिटीव्ह आला तर अद्याप तिच्या आई,वडील,भाऊ व बहीणीचा अहवाल आला नसून उद्या गुरुवार दि.२१ मे रोजी प्राप्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

१२ रुग्ण कोरोनामुक्त-
आज मेयोमधून १ तर मेडीकलमधून ११ रुग्ण हे कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले.यात सतरंजीपुरा येथील ५५ वर्षीय पुरुष तर मोमिनपुरा येथील १०.३० व ३५,६० व ६२ वर्षीय महिला व ९,२०.२२, ३०,६५ वर्षीरु पुरुष आहेत एक ६१ वर्षीय पुरुष हा अमरावतीतील आहे.

उपराजधानीत कोराेनाची आजची स्थिती-
दैनिक संयशित- १५३
दैनिक तपासणी नमुने- ५१९
दैनिग निगेटीव्ह नमुने-५०६
नागपूरातील पॉझिटीव्ह नमुने ३८७
नागपूरातील मृत्यू-७
सुटी झालेले संशयित- २२२७
क्वारंटाईन कक्ष्ात एकूण संशयित- २०१४
बाधित-३८७,सुटी झालेले-३०३,मृत्यू-७

Latest बातम्या