Homeनागपूर न्यूजदारुची दूकाने सुरु मग जिम का नाही?महापौरांच्या प्रशासनाविरुद्ध दंड-बैठका

दारुची दूकाने सुरु मग जिम का नाही?महापौरांच्या प्रशासनाविरुद्ध दंड-बैठका


राज्य शासनाच्या जिम बंदीच्या निर्णयाविरोधात अनोखे आंदोलन
नागपूर,ता. १९ ऑगस्ट: कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी शरिरात रोग प्रतिकारशक्ती ही उत्तम असणे गरजेचे आहे,असे देशातील तज्ज्ञ मंडळीच सांगतेय मात्र राज्यात रोग प्रतिकार शक्ती वाढवणा-या जिमवरच अद्याप बंदी कायम असून,राज्यातील दारु दूकानांना दोन महिन्यांपासून परवागनी प्राप्त झाली मात्र जिमवर बंदी कायम ठेवण्यामागे काय औचित्य आहे?असा सवाल महापौर संदीप जोशी यांनी उपस्थित केला. शासनाच्या या तुघलकी निर्णयाविरोधात महापौरांनी आज सकाळी ११ वा. संविधान चौकात शहरातील जिमम संचालकांसोबत दंड-बैठका मारुन अनोखे आंदोलन केले.

याप्रसंगी महापौर म्हणाले की,देशात सर्वदूर जिमला परवानगी कधीचीच प्रदान करण्यात आली आहे. फक्त महाराष्ट्र असे एकमेव राज्य आहे जिथे जिम सुरु करण्याबाबत परवानगी प्रदान करण्यात आली नाही,याचं आश्‍चर्य वाटतं. आज दारुची दूकाने सुरु आहेत,शॉपिंग मॉल्स सुरु झाले,एकीकडे जागतिक आरोग्य संघटना सांगते की करोनाशी लढायचे असेल तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवा,ही रोग प्रतिकार शक्ती वाढेल कशी तर व्यायाम करुन.मात्र गेल्या पाच महिन्यांपासून जिमच बंद आहेत. करोना संदर्भात जे काही शासनाचे सुरक्ष्ेसंबंधी निर्देश आहेत त्याचे काटेकाेरपणे पालन केले जाईल,असे आश्‍वासन जिम संचालक देत असल्याने शहरातील जिम हे सुरु झालेच पाहिजे.

जिम सुरु करणे हे शहरातील युवा वर्गासाठी अत्यावश्‍यक बाब आहे,मात्र आताही जर जिम सुरु करण्यासाठी परवानगी मिळणार नसेल तर शहरातील सर्व २२२ जिमचे संचालक,समस्त तरुण वर्ग मी पण त्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरील,असा इशारा महापौरांनी दिला.संपूर्ण देशात जिम सुरु असताना महाराष्ट्र राज्याला जिम सुरु करण्यास नेमकी काय अडचण आहे?एकीकडे औरंगाबाद उच्चन्यायालयाने राज्यातील जिम व्यवसाय हा सुरु झाला पाहिजे,असा निर्णय घेतला असताना लवकरात लवकर राज्यात हा निर्णय लागू झाला पाहिजे.

शहरातील व्यापा-यांनी आज जी बंदची हाक दिली आहे त्याविषयी उद्या २० ऑगस्ट रोजी मनपाच्या होणा-या सर्वसाधारण सभेत निर्णय घेणार असल्याचे ते याप्रसंगी म्हणाले.

जिम सुरु करण्यााबाबत महापौरांनी तीन दिवसांपूर्वी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना देखील पत्र दिले व सकारात्मक निर्णय घेण्याची सूचना केली. मात्र स्थानिक स्तरावर कुठलेही पाऊल उचलण्यात आले नाही. शहरातील जिम मालकांनी महापौरांना काल,जिम सुरु करण्याबाबत निवेदन दिले होते. दारुची दूकाने,केश कर्तनालय व इतर व्यवसाय सुरु झाले आहेत.जिम हा व्यवसाय व्यायामाशी संबंधित असून जिम मालक हे देखील कोविड संबधी शासनाच्या सर्व सूचना काटेकाेरपणे पाळण्यास तयार आहेत,तरी देखील जिम सुरु करण्यास शासनाचा नकार,यावर महापौरांनीही आश्‍चर्य व्यक्त केले.

तीन दिवसांपूर्वीच महापौरांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात जिम मालक हे आंदोलनाचा मार्ग पत्करु शकतात,अशी पूर्वकल्पना दिली होती.परिणामी महापौरांनीच या आंदोलनात सहभागी होत मनपा प्रशासनाच्या दिरंगाईचा निषेध केला. आंदोलनात शहरातील २२२ जिम समोर जिममध्ये वर्कआऊट करणारे ५ जण यांनी सुरक्षित अंतर राखत निर्दशन केले.

Latest बातम्या