Homeनागपूर न्यूजतो बोलत होता...हा बोलत नाही!आ.कृष्णा खोपडे यांचा मनपा आयुक्तांना टोला

तो बोलत होता…हा बोलत नाही!आ.कृष्णा खोपडे यांचा मनपा आयुक्तांना टोला

महापौर पदग्रहण सोहळ्यात विकास कामे अडवून ठेवण्याची काढली भडास

नागपूर,ता. ७ जानेवरी: नागपूर महानगरपालिकेच्या इतिहासात नंदलाल आले,टी.चंद्रशेखर आलेत,त्या ही संकटातून मार्ग काढला,मग मागचे आयुक्त आले,त्याही संकटातून बाहेर पडलो,अाता हे आयुक्त आले,मागचे मनपा आयुक्त बोलत होते..हा बोलत ही नाही!असा घणाघाती टोला पूर्व नागपूरचे भाजप आ. कृष्णा खोपडे यांनी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.यांना लगावला. ते आज दि. ७ जानेवरी रोजी मनपा मुख्यालयात आयोजित महापौर पदग्रहण सोहळ्यात बोलत होते.

याप्रसंगी बोलताना जे म्हणाले की हा मनपा आयुक्त न बोलताच आम्हाला मारण्याचा प्रयत्न करतो.तुकाराम मुंढे हा शहरभर मिडीयाला घेऊन घूमत होता,हा तसा घूमत नाही.मात्र हा देखील विकासासाठी एक पैसा ही देत नाही!अश्‍या शब्दात त्यांनी आयुक्त राधाकृष्णन बी.वर भडास काढली.

शहरात चार-चार मंत्री आहेत मात्र २०२० मध्ये त्यांनी या शहराला १ रुपया ही विकासकामांसाठी दिला नाही.मंचावर बसलेले मनपा विरोधी पक्ष् नेते तानाजी वनवे यांना उद्देशून आ.कृष्णा खोपडे म्हणाले की तुम्हीच सांगा तुमच्याच पक्ष्ाचे मंत्री आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे पैसे शहरासाठी दिले ते देखील या सरकारने परत घेतले.

संदीप जोशी जेव्हा महापौर झाले तेव्हाच तुकाराम मुंढे आले.मग करोना आला.परिणामी संदीप जोशी यांचा १३ महिन्यांचा महापौर पदाचा कालावधी कधी आला आणि कधी संपला हे कळले देखील नाही.पण ते खंबीरपणे या संकटातही उभे राहीले.

आमच्यासमोर अनेक संकटे आली त्यातूनही आम्ही पार पडलो,या संकटातून ही नक्कीच पार पडू,नवनिर्वाचित महापौर दयाशंकर तिवारी तसेच उपमहापौर मनीषा धावडे यांच्यापुढे खूप आव्हाने आहेत.ते कीर्तीदायक,तडफदार कारर्कीद गाजवतील यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो.

मंत्र्याच्या नियमबाह्य बैठका!
मी काल मुंबईच्या मंत्रालयात गेलो असता प्रधान सचिवांना मंत्री हे ज्या बैठका घेत आहे त्याला प्रशासकीय मान्यता आहे का?त्या नियमात बसतात का?असा प्रश्‍न विचारला असता त्यांनी मंत्र्यांना अश्‍या बैठका घेता येत नसल्याचे उत्तर मिळाले.यांच्या बैठकांचे मिनिट्स कोण काढतो?त्या मिनिट्सची कॉपी द्या,असे म्हटले असता प्रधान सचिवांचे उत्तर होते,आम्ही अश्‍या नियमबाह्य बैठकांची दखल सुद्धा घेत नाही.कारण त्या बैठकींना विभागाचे अधिकारीच उपस्थित नसतात!

तरी देखील या मंत्र्यांना नागपूर महानगरपालिकेच्या सर्वच विकास कामांची चौकशी करायची असल्याने ते मंत्री बैठकांवर बैठक घेत असल्याचा टोला पालकमंत्री नितीन राऊत यांचे नाव न घेता आ.खोपडे यांनी लगावला.

इतक्या मोठ्या पदावर बसलेला मंत्री,शहराचीच चौकशी बसवतो.कोणी थांबवलं?साईचा ८७ एकरमधील क्रीडा संकूलावर त्यांनी चौकशी बसवली,सिम्बॉयसिस यासारखे जगप्रसिद्ध व नामांकित विद्यापीठ नागपूरात वाठोडा येथे गडकरी यांच्या प्रयत्नामुळे आले मात्र त्याची ही चौकशी त्यांना करायची आहे.पूर्ण शहराचीच चौकशी करा,आम्ही घाबरणार नसल्याचे आ.खोपडे यांनी याप्रसंगी सुनावले.

मात्र या मंत्र्यांनी चौकशीसाठी दोन ओळींचे देखील आदेश पत्र काढले नसल्याचे ते म्हणाले.खोट्या नाट्या बैठका करुन नागपूरकर जनतेला नुसते गुमराह करण्याचे काम हा मंत्री करतोय.स्मार्ट सिटीचे काम देखील त्यांनी थांबविले.ज्यांनी स्वत:नी त्यांच्या कारकीर्दीत महानगरपालिकेच्या अतिशय मोक्याच्या जागेवरील भूखंड सोसायट्यांना विकले ते चौकशीचे पत्र आज जारी करीत आहे?चौकशींचा ससेमारा लावण्यासाठी बैठका घेत आहेत?तुम्ही विकास करु शकत नाही मात्र जी विकास कामे सुरु आहेत ती देखील थांबविण्याचे प्रयत्न करता आहात,खुशाल चौकशी करा आम्ही धीराने कोणत्याही चौकशीला सामोरे जाऊ,असा खणखणीत इशारा आ.खोपडे यांनी आज महापौर पदग्रहण सोहळ्याप्रसंगी बोलताना दिला.

Latest बातम्या