
नागपूर,ता. १० ऑक्टोबर: वादग्रस्त व बहूचर्चित डॉ.प्रवीण गंटावार यांच्या ‘कोलंबिया’ रुग्णालयाला मनपाच्या अग्निशमन विभागातर्फे आग प्रतिबंधक व जीव संरक्ष् क उपायोजना(इमरजेन्सी फायर एक्झीट) नसल्यामुळे २ मार्च २०१५ रोजी नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र डॉ.गंटावार यांचे मनपात‘बहोत उपर तर पहोचे हूये हात’ असल्याने तातडीने त्यांच्या रुग्णालयाला परवानगी मिळावी यासाठी एक विशिष्ट पदाधिकारी यांनी हालचाल केली आणि मार्च २०२० पर्यंत त्यांच्या रुग्णालयाला मनपाच्या अग्निशमन विभागाची परवानगी मिळाल्याचे पत्र २३ जानेवरी २०१७ रोजी जारी करण्यात आले!

अशी परवानगी प्राप्त झाल्यावरही डॉ.गंटावार यांनी आपल्या रुग्णालयात अाग प्रतिबंधक उपाययोजना केलीच नाही याचा पुरावा म्हणजे याच वर्षी पुन्हा मनपाच्या अग्निशमन विभागातर्फे ४ जानेवारी २०२० रोजी जारी करण्यात आलेली दूसरी नोटीस पाठविण्यात आली.विशेष म्हणजे या नोटीसमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजनेच्या अभावासोबतच इमारतीतून धूर निघून जाण्याची देखील व्यवस्था नसल्याने १९ डिसेंबर २०१९ रोजी नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीसवर डॉ.गंटावारतर्फे ९० दिवसांची मुदत मागण्यात आली होती मात्र डॉ.गंटावार यांना ३० दिवसांचा कालावधी देण्यात आला,
आज २०२० चा ऑक्टोबर महिना उजाडला आहे मात्र अद्याप मनपाच्या अग्निशमन विभागातर्फे डॉ.गंटावार यांच्या रुग्णालयावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसून या रुग्णालयात शॉर्ट सर्कीटमुळे आगीची एखादी घटना घडल्यास रुग्ण व कर्मचा-यांच्याचा जीवाला धोका निर्माण होऊ शकतो,परिणामी या अक्ष्म्य चुकीसाठी जेवढे जवाबदार डॉ.प्रवीण गंटावार असतील तेवढीच जवाबदारी महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग स्वीकारेल का?असा सवाल उपस्थित केला जात आहे.
एकीकडे मनपाचा अग्निशमन विभाग हा इमरजेन्सी एक्झीट फायरची उपाययोजना नसल्याचे कारण सांगून सामान्य माणसांच्या फ्लॅट स्कीमच्या ऑनर्सला नोटीस वर नोटीस पाठवण्यास ‘पारंगत’झाला आहे, दुसरीकडे कोलंबिया रुग्णालयासारखे अनेक रुग्णालये,मॉल्स,मोठे असामी यांच्या ईमारतींवर विशेष ‘कृपादृष्टि’ ठेवीत असल्याचे सिद्ध झाले.


सामान्य जनतेच्या कराच्या पैशातून मनपातील संपूर्ण आर्थिक डोलारा चालत असताना याच सामन्य नागरिकांना मनपातील हे विभाग अश्या दुजाभावाची वागणूक देतात.मनपातील काही सत्ताधारी,पदाधिकारी व प्रशासनाचे काही ’लाचखाऊ’ अधिकारी यांच्या अश्या दुटप्पी आणि भ्रष्ट कारभारामुळेच नागपूरकर जनतेचा विश्वास भाजपच्या सत्तेवरुन पार उडाला असल्याची चर्चा ग्राऊंड लेवलवर म्हणूनच ऐकू येते.

आश्चर्य! कोलंबिया रुग्णालयाचे बिल एक लाख ऐंशी हजारवरुन झाले चाळीस हजार!
कोविड-१९ महामारीच्या काळात जनसामान्यांचे खासगी रुग्णालयांनी कसे कंबरडे मोडले आहे याच्या अनेक सुरस कथा माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. कोविड महामारीवर कोणतेही औषधोपचार नाहीत तरी देखील कसायाने ज्याप्रमाणे निर्दयतेने बकरा कापावा तसाच व्यवहार शहरातील अनेक खासगी रुग्णालयांनी रुग्णांसाेबत केला आहे.यात आणखी एका रुग्णालयाची भर पडली ती म्हणजे मनपाचे ‘कू’प्रसिद्ध सहायक आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण गंटावार संचालक असलेल्या धंतोली येथील ‘कोलंबिया’रुग्णालयाची!
कोलंबिया रुग्णालयात ५७ वर्षीय अंजिरा जुमडे या कोविडच्या उपचारासाठी भरती झाल्या होत्या.त्यांना उपचाराचा खर्च म्हणून या रुग्णालयातर्फे १ लाख ८० हजाराचे बिल देण्यात आले.या कुटुंबानी याची तक्रार भारतीय जनता पक्ष्ाच्या एका कार्यकर्त्याकडे रोहित हिमते यांच्याकडे केली. रोहित यांनी याबाबत भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना कळवले.
ही माहिती कळताच दयाशंकर तिवारी यांनी या कुटुंबियांना महानगरपालिकेच्या ऑडिटरतर्फे बिल तपासूण बघण्यास सांगितले मात्र याची कुणकुण लागताच कोलंबियाच्या व्यवस्थापनाने बिलाची रक्कम फक्त ४० हजार रुपयांची केली. त्यात ही रुग्णाकडून डिपॉझिट म्हणून जे आधीच ६० हजार रुपये जमा करुन घेतले होते,त्यामधून ही २० हजाराची रक्कम रुग्णाच्या कुटुंबियांना परत केली!

आमचे चॅनल subscribe करा