Homeनागपूर न्यूजडाॅ.शीलू गंटावार यांचा पगार नेमका निघतो कूठून?

डाॅ.शीलू गंटावार यांचा पगार नेमका निघतो कूठून?

सहायक अधिक्ष् काने दाखवली सवाई यांच्या पत्राला केराची टोपली!

नागपूर,ता. २८ जुलै: महानगरपालिकेच्या आरोेग्य विभागाचे मुख्य अधिकारी डॉ.सवाई यांनी मनपाच्या आरोग्य विभागातील सहायक अधिक्ष् क गायधने यांना बहूचर्चित डॉ.शीलू गंटावार यांच्याविषयी संपूर्ण माहिती सादर करण्यासाठी पत्र दिले असता गायधने यांनी चक्क डॉ.शीलू गंटावार यांच्याविषयी गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयातून माहिती मागवू शकत नसल्याचे पत्र सादर केले,अशी कुजबुज आज मनपात चर्चिली जात होती.

डॉ.सवाई यांनी आपल्या पत्रात डॉ.शीलू गंटावार यांच्या नोकरीविषयक संपूर्ण बाबींची माहिती मागवली असता, गायधने यांना फक्त मनपा मुख्यालयातील बिलिंग क्लार्ककडून ती फक्त मागवून घेणे क्रमप्राप्त होते. डॉ.शीलू गंटावार यांच्या पगाराची देयके,हजेरी पुस्तिकेतील माहिती,नोकरीचे तास इ.संपूर्ण माहिती ही मनपाच्या मुख्याल्यातील बिलिंग विभागातच उपलब्ध असताना गायधने यांनी चक्क आरोग्य विभागातील सर्वोच्च पदावरील डॉ.सवाई यांनाच माहिती मागवू शकत नसल्याचे पत्र देऊन टोलवले व आपली जवाबदारी बिलिंग विभागाकडे सलटवल्याचे बोलले जात होते.

डॉ.प्रवीण गंटावर व त्यांच्या पत्नी डॉ.शीलू गंटावार यांना अद्यापही मनपातील सेवेतून आयुक्त तुकाराम मुंढे यांनी निलंबित केले नसून मनपातील अनेक अधिकारी अद्यापही या दाम्पत्याच्या विरोधात कोणतीही माहिती सादर करण्यास घाबरत असल्याचेच हे द्योतक आहे.शिस्तप्रिय व कर्तव्यकठोर मंुढे यांचेच ‘सिपाहसलार’ यांची आपल्या कर्तव्याचीप्रतिची निष्ठा यावरुन दृष्टिपथात येते! इतर कोणाची माहिती असती तर संशाेधनाच्या ग्रंथाप्रमाणे शेकडो पाने भरुन डॉ.सवाई यांना त्वरीत माहिती मिळाली असती मात्र ही माहिती डॉ.गंटावार तसेच डॉ.शीलू गंटावार यांच्याविषयीची असल्याने ’प्रशासन’किती ’मुत्सदीपणाने’कार्य करीत आहे,याचे गायधने यांचे डॉ.सवाई यांना दिलेले उत्तर यातून स्पष्ट होते.

सध्या गंटावार दाम्पत्यांचा विषय हा न्यायालयाच्या अधीन आहे. नुकताच या दाम्पत्याला न्यायालयाने अटकपूर्व जामीन देखील नाकारला. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मनपा प्रशासनाला डॉ.शीलू गंटावार यांची नोकरीविषयक संपूर्ण ’कुंडली’न्यायालयात सादर करण्यासाठीच डॉ.सवाईने हा रेकॉर्ड मागविला असल्याची शक्यता आहे.

मात्र डॉ.सवाई यांच्या पत्राला चक्क गायधने यांनी केराची टोपली दाखवून आपली कातडी कश्‍याप्रकारे वाचवली,याची खमंग चर्चा आज मनपात रंगली होती.डॉ.शीलू गंटावार यांची सर्विस बूक ते इंदिरा गांधी रुग्णालयातून मागवून देऊ शकत नसल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. ‘प्रामाणिक’ मुंढे यांचे हे ‘अप्रामाणिक’ अधिकारी यांची वर्तवणूक ,गंटावार विषयीचे अत्यधिक प्रेम,भीती,साटेलोटे याची साक्ष् देतात, आता कर्तव्यकठोर मुंढे या अधिका-यावर काय कारवाई करतील,याकडे मनपा कर्मचा-यांचे लक्ष् लागले आहे.

मनपाच्या प्रत्येक अधिकारी व कर्मचा-याच्या संपूर्ण पगाराचा तपशील हा बिलिंग विभागात नमूद असतो. मात्र गायधने यांनी माहिती मागवून देऊ शकत नसल्याचे पत्र डॉ.सवाई यांना पाठवल्याने डॉ.शीलू गंटावार यांचा पगार नेमका निघतो कूठून?असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

Latest बातम्या