Homeब्रेकिंग न्यूजजनता हीच देशाची नायक: अवंतिका लेकुळवाळे

जनता हीच देशाची नायक: अवंतिका लेकुळवाळे

प्रिआंती इंग्लिश स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज तरोडी( बु) येथे ८० वा स्वातंत्र्य दिन साजरा 

 प्रिआंती इंग्लिश स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज तरोडी( बु) येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

श्री गजानन शिक्षण सेवा संस्थेचे सचिव रमेश लेकुरववाळे यांच्या हस्ते ध्वजारोजण करण्यात आले, कार्यक्रमाला  श्री. गजानन शिक्षण सेवा संस्थेच्या अध्यक्षा.प्रा. अवंतिका लेकुरवाळे ( माजी सभापती, महिला व बालकल्याण समिती जि. प. नागपूर, सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी )शि.पा. संघ कार्यकारिणी समितीचे उपाध्यक्ष रमण राठोड, शि. पा. संघाचे माजी उपाध्यक्ष  सतिश बर्डे, काशिनाथजी खोंडे ,  शंकऱ घुले , कृष्णा चौधरी,  रुखमांगत वाघ आदी उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या प्राचार्या नंदा ठाकरे यांनी केले , यावेळी विध्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत,भाषण , नृत्य  लेझिम, ड्रिल प्रात्यक्षिके , मार्च पास इत्यादी कार्यक्रमाचे उत्कृष्ट सादरिकरण केले .
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा प्रा. अवंतिका लेकुरवाळे यांनी आपल्या भाषणातून भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास व त्याकरिता झालेल्या राष्ट्रीय उठावांवर प्रकाश टाकला. त्यांनी आपल्या भाषणातून ’जण गण मन’ या राष्ट्रगीत मधील ओळीचा भावार्थ समजावून सांगितला. जनता ही देशाची नायक असली पाहिजे. ज्यामध्ये जनतेचं हित आहे भलं आहे भविष्य आहे. प्रत्येक नागरिकांचा अधिकार अबाधित राहणे, देशाच्या गरिमे प्रति सजग राहणे ही स्वातंत्र्याची खरी नीव आहे. आम्हाला ना इंग्रजांचं गुलाम व्हायचं आहे ना मनुस्मृतीचं गुलाम व्हायचं आहे. आम्हाला तर संविधानाचे स्वतंत्र नागरिक व्हायचे आहे असा माेलाचा सल्ला त्यांनी याप्रसंगी दिला.
 जनता ही देशाची भाग्यविधाता आहे असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले .सोबतच संस्थेचे सचिव रामेश लेकुरवाळे यांनी आपल्या भाषणातून विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यावर  प्रकाश टाकला,  आपल्या भाषणातून सर्व धर्म समभावचा संदेश दिला आणि मिळालेलं स्वातंत्र्य किती मोलाचे आहे ,याचे महत्व विध्यार्थ्यांच्या मनावर बिंबविले ,
याप्रसंगी दिनांक २ ऑगस्ट २०२६ रोजी कोराडी नागपूर येथे झालेल्या १८ व्या जिल्हास्तरीय उशू चॅम्पियनशिप (१७ व १४ वर्षे मुलं /मुली ) स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून सुवर्ण रजत व कास्य पदक पटकविलेले विध्यार्थी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यात राहुल पटले ,सारंग ठाकरे ,सम्यक गजभिये ,लोकेश गावंडे ,तन्मय बर्डे ,शुभम गेचूडे ,हर्ष गजपुरे ,अर्चित गडपेले ,रुद्र काळे डॉली खेडकर ,नव्या लेकुरवाळे आदी विध्यार्थ्यांना पदक व प्रमाणपत्र देऊन  व क्रीडा शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन निकिता मोराडे यांनी केले  ,कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
………………….

Latest बातम्या