Homeनागपूर न्यूजगुरुविण नाही दुजा आधार' : प.पू. सद्गुरूदास महाराज

गुरुविण नाही दुजा आधार’ : प.पू. सद्गुरूदास महाराज

गुरुपौर्णिमेनिमित्‍त झाले गुरुपूजन

नागपूर, २३ जुलै: ज्ञानाचा प्रकाश देणारा, योग्‍य वेळी पथदर्शन करणारा गुरू हा ईश्‍वररूपी असतो. तो आपल्‍या भक्‍ताचे रक्षण करत असतो. संकटकाळी गुरु शिष्‍याचा आधार बनतो, असे मत प. पू. सद्गुरूदास महाराजांनी व्‍यक्‍त केले.

गुरुपौणिमेच्‍या मुहूर्तावर पत्रभेट संपादकीय मंडळाच्‍या वतीने ‘आबार एसेछे आषाढ’ आभासी उपक्रम मागील दोन दिवसांपूासून सुरू आहे. या उपक्रमाच्‍या तिस-या दिवशी गुरुपौर्णिमा उत्‍सवाचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी गुरुपूजनाचा कार्यक्रम पार पडला.

सद्गुरूदास महाराज म्‍हणाले, गुरू हे तत्‍व असते. ते कुठल्‍यातरी माध्‍यमातून आपल्‍यासाठी अवतरीत होत असते. त्‍याची काय महती आहे हे गुरूचरित्रात सांगण्‍यात आले आहे.

गुरू किती श्रेष्‍ठ आहेत हे सांगता महाराज म्‍हणाले, गुरुमुळे ईश्‍वरप्राप्‍ती होते. ते भक्‍ताचे रक्षण करतात.गुरू प्रसन्‍न झाले तर ईश्‍वर प्राप्‍त होतो. पण त्‍यासाठी शिष्‍याची तशी उपासना करण्‍याची पात्रता असली पाहिजे.

गुरुपौर्णिमा ही खरे तर व्‍यासपौर्णिमा म्‍हणून ओळखली जाते. यादिवशी चार वेदांचे संपादन करणा-या व्‍यासांनी जसे आपल्‍या ज्ञानाने मानवी जीवन समृद्ध केले तसे गुरू आपले जीवन समृद्ध करतो, असे सद्गुरूदास महाराजांनी सांगितले.

सद्गुरूदास महाराजांच्‍या हस्‍ते ‘गीत विष्‍णुदास’ या गाण्‍याच्‍या संग्रहाचे उद्घाटन करण्‍यात आले. त्‍यातील प. पू. विष्‍णुदास महाराज रचित व स्‍व. पुरूषोत्‍तम सामक यांनी संगीतबद्ध केलेल्‍या दोन रचना अनिरूद्ध जोशी व शरयू दाते यांच्‍या आवाजात सादर करण्‍यात आल्‍या. प्रास्‍ताविक मनिष उद्धव व प्रा. संजय देशकर यांनी केले.
……
आज उपक्रमात-
सायंकाळी ७ वाजता ‘संस्‍कृत साहित्‍याचा समालोचनात्‍मक इतिहास’ विषयावर डॉ. मुग्‍धा कुळकर्णी भाष्‍य व मृदूला कोलारकर या सूर्यपुत्र या पुस्‍तकातील ‘हृदयगत’ या लेखाचे अभिवाचन करतील.
……

Latest बातम्या