Homeनागपूर न्यूजखाजगी ऐजेंसीऐवजी शासकीय सुरक्षा मंडळाच्या रक्ष् कांना या पुढे नोकरी: मुंढे

खाजगी ऐजेंसीऐवजी शासकीय सुरक्षा मंडळाच्या रक्ष् कांना या पुढे नोकरी: मुंढे

’जय जवान जय किसान’संघटनेच्या आंदोलनाला यश: ३३ रक्ष् कांना घेतले पुन्हा कर्तव्यावर

नागपूर,ता. १२ ऑगस्ट: महापालिकेत तैतान असलेल्या सुरक्षा रक्ष् कांना खाजगी एजंसी अर्धेच वेतन देते व त्यांचे पराकोटीचे आर्थिक शोषण करते,अशी तक्रार ‘जय जवान जय किसान’संघटनेने मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्दशनास आणून दिल्यानंतर मुंढे यांनी राज्य शासनाच्या सुरक्षा मंडळातर्फेच या पुढे सुरक्षा रक्ष् क नेमण्यात येईल,असे जाहीर केले. तसेच नोकरीतून काढून टाकलेल्या ३३ रक्ष् कांना कामावर परत घेतले.

पालिकेतील तिन्ही खाजगी एजंसी सुरक्षा रक्ष् कांच्या नावावर पूर्ण वेतन त्यांच्या खात्यावर जमा करीत होती. त्यानंतर अर्धी रक्कम त्यांच्याकडून रोखीने परत घेत होती. यास विरोध करणा-यांना नोकरीतून देखील काढले जात होते. गेल्या २० वर्षांपासून तिन्ही एजंसींचा हा अमानवीय धंदा सुरु आहे.

जय जवान जय किसान’संघटनेतर्फे याची तक्रार १३ जुलैला आयुक्त मुंढे यांच्याकडे केली होती.

या विरोधात ‘जय जवान जय किसानसंघटनेचे अध्यक्ष् प्रशांत पवार यांनी आवाज उठवला. सर्व सुरक्षा रक्ष् कांना कामावर न घेतल्यास,सुरक्षा रक्ष् कांच्या कुटुंबियांसह महापालिकेच्या आवारात आमरण उपोषण करण्यात येईल,असा इशारा त्यांनी दिला होता.
त्याप्रमाणे प्रशांत पवार,राष्ट्रवादीचे गट नेते दुनेश्‍वर पेठे,जय जवान जय किसान संघटनेचे अरुण वनकर यांच्या नेतृत्वात सुरक्षा रक्ष् क दुपारी साढे बारा वाजता मनपात धडकले.त्यांनी जोरदार घोषणाबाजीला सुरवात केली. पोलीसांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला असता काही काळ तनावाची स्थिती निर्माण झाली. त्यानंतर आयुक्तांनी शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले. ३३ सुरक्षा रक्ष् कांना नोकरीमध्ये परत घेण्यात आले.
सुरक्षा रक्ष् कांचे आर्थिक शोषण होऊ नये याकरिता राज्य सरकारच्या सुरक्षा मंडळातर्फे या पुढे सुरक्षा रक्ष् क नेमण्यात येईल,असे जाहिर केले.सुरक्ष्ा रक्ष् कांचे भविष्या निर्वाह निधी तसेच इएसआयसाठी न्यायालयात दाद मागावी असेही आयुक्तांनी सुचना केली. तसेच कामात हयगय करणा-या सुरक्षा रक्ष् कांना काळ्या यादीत टाकले जाईल,अशी ताकीद देखील आयुक्तांनी दिली.
आंदोलनामध्ये ’जय जवान जय किसान’संघटनेचे मिलिंद महादेवकर,मंगेश सुरावार, रवींद्र इटकेलवार,गणेश साबने, कृष्णराव खंडाळे,अभिनव फटींग आदी सहभागी झाले होते.

Latest बातम्या