Homeनागपूर न्यूजकोर्टातील बयानही पोलीसांनी नाकारले!

कोर्टातील बयानही पोलीसांनी नाकारले!

Advertisements

बनावट स्टँम्प पेपर प्रकरण

न्यायालयाकडून सदर पोलिसांना न्यायालयीन अवमाननेची नोटीस

नागपूर,ता. १६ डिसेंबर २०२१: पोलीस स्टेशन सदर येथील ॲड. सतीश उके यांनी दाखल केलेल्या एका प्रकरणात प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी नागपूर न्यायालयाने, न्यायालयाच्या पुढील तपासाच्या आदेशाचे पालन न केल्याने पोलीस निरीक्षक विनोद चौधरी आणि पोलीस उपनिरीक्षक आर. आर . महिपाळे यांना कोर्ट अवमानना अर्जावर नोटीस जारी करून उत्तर सदर करण्याचे आदेश जारी केले .

दि. ६ एिप्रल २००६ रोजी सतीश उके यांनी धरमदास रामाणी यांनी बनावट स्टॅम्प पेपर तयार करून वापरला याबाबत पोलीस उपायुक्त परी. क्र. २ आणि पोलीस स्टेशन सदर येथे तक्रार नोंदवली होती, त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. परंतु धरमदास रामाणी यांनी त्यांचा साथीदार गुड्डू उर्फ अनिल गयाप्रसाद मिश्रातुषार दलाल यांच्या सोबत मिळून ॲड.. सतीश उके व इतर यांच्या विरुद्ध जिल्हा न्यायालयात खंडणी मागिल्याचा गुन्हा पोलीस स्टेशन सदर नागपूर येथे (अप. क्र. ४६३/२००७ प्रमाणे) दि. ११ डिसेंबर २००७ रोजी दाखल केला .

यात गुड्डू मिश्रा याने तो रामाणी करीता स्टॅम्प पेपर विक्री करतो असे बयान दिले , यावर गुड्डू मिश्रा व तुषार दलाल यांचे Cr.P.C. १६४ चे बयानही पोलिसांनी न्यायालयात नोंदवून घेतले होते . तपासात ही तक्रार खोटी असल्याचे दिसून आल्याने सदर पोलिसांनी “ब फायनल” न्यायालयात दाखल केले .

“ब फायनल” यात गुड्डू मिश्रा व तुषार दलाल यांच्या बयानाच्या आधारे तपास करण्याचे निर्देश मा. न्यायालयाने दिले . बयानाप्रमाणे गुड्डू मिश्रा याचा स्टॅम्प विक्रीचा परवाना याची माहिती ,मुद्रांक जिल्हाधिकारी नागपूर व नागपूर ग्रामीण यांनी मागितली असता, कोणताही परवाना त्यांना दिला नाही असे उत्तर मिळाले. यानंतर या प्रकरणात त्या बाबत कधी तपास करण्यात आला नाही व रामाणी व त्याचे साथीदार यांच्यावर बनावट स्टॅम्प बाबत व खोटी तक्रार दिल्याबाबत ही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

या प्रकरणात ॲड. सतीश उके यांनी दाखल केलेल्या अर्जावर दि. ५ ऑक्टोर २०२० रोजी प्रथम श्रेणी न्याय दंडाकिधारी न्यायालयाने पोलीस स्टेशन सदर नागपूर यांना पुढील तपास करण्याचे आदेश दिले होते.

परंतु सदर पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करता व कसलाही तपास न करता दि. ८ डिसेंबर २०२० रोजी प्रकरण न्यायालयात परत केले. यावर न्यायालयाने त्यांच्यावर दि. ११ जानेवरी २०२१ रोजी कोर्ट अवमानना नोटीस काढली यावर न्यायालयात पीएसआय महिपाळे व पीआय देशमुख यांनी मा. न्यायालयास माफी मागितली आणि तपास करण्यास प्रकरण परत मागून घेतले .

त्यानंतर नवीन पोलीस निरीक्षक विनोद चौधरीउपनिरीक्षक महिपाळे यांनी पुढील तपास न करता व मुळ स्टॅम्प पेपरचा कायदेशीरपणे शोध न घेता आणि बनावट स्टॅम्प पेपरच्या टोळीला वाचवण्या करीता गुड्डू मिश्रा व तुषार दलाल यांचे Cr.P.C. १६४ चे बयानही, जे यापूर्वी पोलिसांनी न्यायालयात नोंदवून घेतले होते ते सुद्धा तपासात नाकारून, न्यायालयात खोटा अहवाल सादर केला .

याप्रमाणे मा. न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणे आणि मा. न्यायालयासच साक्षदारांनी Cr.P.C. १६४ चे बयान न्यायालयात नोंदवले नाही ,असे लिहून खोटे ठरविले.

असे अनेक गैरप्रकार करून न्यायालयाचा अवमान जाणीवपूर्वक केला , याचसोबत बनावट स्टॅम्प टोळीला वाचवण्या करीता खोटा अहवाल सादर करून भा. दं. वी. चे कलम २१७, २१८ ,२१९ आणि १२०-ब प्रमाणे अपराधिक कृत्य केले.

या पार्श्वभूमीवर, त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी ॲड.सतीश उके यांनी न्यायालयात अर्ज सादर केला . यावर आज सुनावणी होऊन मा. न्यायालयाने पोलीस स्टेशन सदरचे पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांना नोटीस काढून उत्तर सादर करण्याचे आदेश दिले.

Latest बातम्या