Homeनागपूर न्यूजकर चाेरी प्रकरणाला महामेट्रोचे अधिकारीच जवाबदार:प्रशांत पवार यांचा आरोप

कर चाेरी प्रकरणाला महामेट्रोचे अधिकारीच जवाबदार:प्रशांत पवार यांचा आरोप

Advertisements


जीएसटी कर चोरी प्रकरणात महामेट्रोच्या कंत्राटदाराला अटक

नागपूर,ता २ फेब्रुवारी २०२२ : मुंबई मधील जीएसटी खात्याने नुकतेच जीएसटी कर चोरी प्रकरणी महामेट्रोच्या कंत्राटदाराला अटक केली,प्रथमदर्शी सदर कंत्राटदार कर चोरी प्रकरणात दोषी असल्याचे दिसत असला तरी या कर चोरी प्रकरणाला महामेट्रोचे अधिकारीच दोषी असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते व ‘जय जवान जय किसान’संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी पत्र परिषदेत केला.

याप्रसंगी बोलताना ते म्हणाले,की महामेट्रोचे बांधकाम विविध कंत्राटदारांकडून करण्यात येते.त्यासाठी निविदा काढण्यात येतात.कंत्राटदारांनी काम केल्यावर,त्या कामांचे बिल महामेट्रोला सादर करण्यात येतं.त्या बिलाची तपासणी महामेट्रोचे प्रशासन करीत असतात.बिल पास झाल्यावर त्या बिलाची रक्कम कंत्राटदाराला देण्यात येते.रक्कम देण्या आधी कंत्राटदाराने जीएसटी,भविष्य निर्वाह निधी,इएसआयसी इत्यांदीचा भरणा करुन सदर चाॅलान मेट्रो प्रशासनाला सादर करायचे असते.जीएसटी,इएसआयसी इत्यादी रक्कम सरकारी तिजोरीत जमा झाल्यावरच कंत्राटदारांना रक्कम दिली जाते.जर कंत्राटदाराने शासकीय करांचा भरणा केला नसेल तर,मेट्रो प्रशासनाला असा भरणा करने आवश्‍यक असते.

या सर्व निविदा प्रक्रीयेवरुन कंत्राटदारांने सरकारी करांचा भरणा केला किवा नाही याची पूर्ण माहिती मेट्रो प्रशासनाजवळ असते.असे असताना मेट्रोचे कंत्राटदार जर जीएसटी,भविष्य निर्वाह निधी व इएसआयसी इत्यांदीचा भरणा करीत नसल्यास त्या सर्व प्रकाराला कंत्राटदारांसोबतच मेट्रोचे अधिकारी देखील तितकेच दोषी असल्याचा आरोप पवार यांनी केला.

सर्वात महत्वाची बाब म्हणजे मेट्रो हे कधीही आपल्या कंत्राटदारांच्या बिलांचे भूगतान वेळेवर करीत नाही.कंत्राटदारांकडून कामे तर करुन घेतली जातात,मेट्रोच्या कामात कंत्राटदारांचा पदरातला पैसा तर आधीच खर्च झालेला असतो मात्र कंत्राटदारांचे बिल न देण्यासाठी मेट्रोचे व्यवस्थपकीय संचालक हे नेहमीच आडकाठी आणत असतात.आधीच मेट्रोतील आर्थिक अनियमिततेमुळे मेट्रोचा प्रकल्प हा साढे आठ हजार कोटींवरुन बारा हजार कोटींवर पोहोचला आहे.नागपूर तसेच पुणे मेट्रो प्रकल्पामध्ये सुमारे तीन हजार कोटींचा खर्च वाढला आहे.त्यामुळे मेट्रो ही आर्थिक डबघाईत आली असून मेट्रोने सर्वच कंत्राटदारांची बिले थकवली आहे.

परिणामी कंत्राटदारांजवळ देखील शासनाचा जीएसटी,पीएफ,इएसआयसी या शासकीय करांचा भरणा करण्यासाठी पैसेच नाहीत तरीही फक्त कंत्राटदारांना दोषी ठरवत त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.

या आधी देखील ‘ग्रेट वॉल’ कपंनीने जीएसटी,पीएफ व इएसआयसीचा भरणा केला नाही मात्र तरी देखील नागपूर मेट्रोतर्फे ग्रेट वॉल कपंनीला बिलांची रक्कम देण्यात आली.ही बदमाशी ज्यांचे ’कमिशन’ पोहोचले त्यांची रक्कम अदा व जे कमिशन देऊ शकले नाहीत त्यांची बिले थकीत,अशी असल्याचा घणाघाती आरोप प्रशांत पवार यांनी केला.कंत्राटदारांची बिले रिलिज करण्यासाठी पंधरा कोटींची मागणी करण्यात आली असल्याचा धक्कादायक आरोप याप्रसंगी पवार यांनी महामेट्रोच्या अधिका-यांवर केला.

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रृजेश दीक्षीत व मेट्रोच्या अधिका-यांच्या संगमताने हा प्रकार सुरु असून हा त्वरित थांबवावा,नागपूरच्या जीएसटी विभागाने मेट्रोच्या सर्व आर्थिक बाबींची तपासणी करावी अशी मागणी पवार यांनी केली.

महामेट्रो प्रशासनाने,कंत्राटदारांनी कर चूकवून सुद्धा इनपूट टॅक्स क्लेम केला असल्यामुळे या कर चोरीसाठी ब्रृजेश दीक्षीत यांनाच अटक झाली पाहिजे,अशी मागणी पवार यांनी केली.

‘जय जवान जय किसान’संघटना नागपूरच्या जीएसटी,पीएफ तसेच इएसआयसी विभागाला देखील याबाबत तक्रार करणार असून सखोल चौकशीची मागणी करणार असल्याचे प्रशांत पवार यांनी सांगितले.

रेतीच्या राॅयल्टी हव्यात तर मॅटलची लॉयल्टी देत नाही तोपर्यंत पेमेंट होत नाही.महामेट्रोने देखील त्याच्या स्टेशन्सची रॉयल्टी दिली नाही,किती चोरीची गिट्टी,रेती वापरली?कर चोरी करुन स्टेशन्स बांधले,कमिशन दीक्षीत यांना गेले का?असा सवाल त्यांनी केला.आम्ही सीबीआयकडे या महामेट्रोच्या संपूर्ण घोटाळ्याची तक्रार केली,यावर सीबीआय आम्हालाच कागदपत्रे आणून द्या,असे फर्मान सोडते,आम्ही महामेट्रोच्या कार्यालयात कागदपत्रे चोरायला जायचे का?अशी बोचरी टिका प्रशांत पवार यांनी केली.नुकतेच डब्ल्यूसीएलमधील पाच हजार रुपयांची लाच घेताना सीबीआयने एका अधिका-याल अटक केली,येथे तर अडीच हजार कोटींचा घोटाळा झाला आहे,सीबीआय महामेट्रोच्या अधिका-यांवर का नाही धाड घालत?आता काय आम्ही परदेशातील ‘एनआय’या चौकशी संस्थेला नागपूरातील महामेट्रोचा आर्थिक घोटाळा तपासायला या,अशी साद घालायची का?

माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे हे दररोज भ्रष्टाचाराच्या नावाने शिमगा करतात,त्यांच्याच शहरातील महामेट्रोच्या कार्यालयात ते का येत नाहीत?येथील भ्रष्टाचार त्यांना बघावासा वाटत नाही?यावर बोलावसे वाटत नाही?

भाजप नेते किरीट सोमैय्या यांना तर पाच वेळा अाव्हान करुन ही झाले,ते अख्ख्या महाराष्ट्रात तीनशे आणि पाचशे कोटींचा भ्रष्टाचार शोधत बसतात,उपराजधानीत तर हजारो काेटींचा भ्रष्टाचार होत आहे,भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळातील कोल वॉशरीजचा महाभयंकर घोटाळा देखील त्यांना याच उपराजधानीत मिळेल,त्यांनी यावं व आम्हाला भेटावे,असे आव्हान याप्रसंगी पवार यांनी सोमैय्यांना दिले.

महामेट्रोत तर चीफ व्हिजिलेंस डायरेक्टर एक अकाऊंट ऑफिसरलाच बनवून टाकण्यात आले आहे. दीडशे ते दोनशे कोटींचा कर घोटाळा महामेट्रोत झाला असल्याचा आरोप यावेळी प्रशांत पवार यांनी केला.

पत्र परिषदेला संघटनेचे कायदेशीर सल्लागार विजयकुमार शिंदे,अरुण वनकर,मिलिंद महादेवकर,रविंद्र इटकेलवार,माहिती अधिकार कार्यकर्ते नायडू,माजी नगरसेवक राजेश माटे आदी उपस्थित होते.

Latest बातम्या