Homeनागपूर न्यूजऑस्कर सांस्कृतिक संगीत कलावंत अकादमीने दिले आठवले यांना निवेदन

ऑस्कर सांस्कृतिक संगीत कलावंत अकादमीने दिले आठवले यांना निवेदन

Advertisements
Advertisements

राज्यातील कलावंताना मिळावी आर्थिक मदत

नागपूर, १३ डिसेंबर: जागतिक महामारी कोविड-१९ च्या संक्रमणाच्या काळात महाराष्ट्र राज्यातील सर्व मंच कलाकारांवर मोठे आर्थिक संकट ओढवले .तब्बल ६ महिन्यांच्या ठाणबंदीमुळे राज्यातील सर्व कार्यक्रमांवर बंदी होती,यामुळे नागपूरसह अनेक शहरातील कलावंतांसमोर गंभीर आर्थिक संकट कासेळले.

असे असले तरी नागपूरसह अनेक शहरातील कलावंतांनी या संकटाचा धीराने सामना केला.भविष्यात पुन्हा असे संकट ओढवल्यास याचा सामना करण्यासाठी नागपूरात ‘ऑस्कर सांस्कृति संगीत कलावंत अकादमीची ’ स्थापना करण्यात आली.

आज सामाजिक व न्याय मंत्री रामदास आठवले यांचे नागपूर शहरात आगमन झाले त्यानिमित्त आज समाज कल्याण कार्यालयात आठवले यांची भेट घेऊन महाराष्ट्र राज्यातील सर्व कलावंतांना आर्थिक मदत मिळावी यासाठी आॅस्कर संघटनेच्या पदाधिकारींनी त्यांना निवेदन सोपवले.

कलावंतांच्या परिस्थितीची जाणीव ठेऊन आठवले यांनी लवकरच आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन शिष्टमंडळाला दिले.

 

निवदेन सादर करणा-या शिष्टमंडळात ऑस्कर संघटनेचे अध्यक्ष पी. कुमार, उपाध्यक्ष प्रशांत खडसे, कोषाध्यक्ष संदीप मेश्राम, सचिव रिनेश जाणे, राजु गजभिये, संगीता गावंडे, मा. पंकजभाऊ मेश्राम, प्रणय कुथे, रोशन उके, सुनील रामटेके आदी यांची उपस्थिती होती.
….

Latest बातम्या