Homeनागपूर न्यूज‘ऑटाेचालक ते ऑडीमालक’ होण्याचा फॉर्म्यूला बावणकुळेंनी वैदर्भिय तरुणांनाही सांगावा:ज्वाला धोटे

‘ऑटाेचालक ते ऑडीमालक’ होण्याचा फॉर्म्यूला बावणकुळेंनी वैदर्भिय तरुणांनाही सांगावा:ज्वाला धोटे

Advertisements

व्हिीडीयो पाठवण्या ऐवजी माध्यमांसमोर येऊन आरोपांचे खंडण का नाही केले?धोटे यांचा प्रश्‍न

नागपूर,ता.२ फेब्रुवारी २०२२: माजी उर्जामंत्री व एकेकाळी महाराष्ट्राच्या उपराजधानीचे पालकमंत्री राहीलेले जनतेचे पालक व विद्यमान भारतीय जनता पक्षाचे आमदार चंद्रशेखर बावणकुळे हे एकेकाळी ‘ऑटोचालक होते’असे सांगण्यात येते.मात्र आज ते ‘ऑडीमालक’आहेत किंबहूना अनेक ऑडीजचे ऑडीमालक आहेत,ही किमया त्यांनी संपत्तीच्या बाबतीत कशी साधली?याचा फॉर्म्यूला त्यांनी गरीब,मागास,हताश वैदर्भिय तरुणांना देखील द्यावा जेणेकरुन विदर्भाचे बेरोजगार तरुण हे देखील आपले जीवनमान उंचावू शकतील,पोटापाण्याचा प्रश्‍न सोडवू शकतील,अशी सणसणीत चपराक राष्ट्रवादीच्या अर्बन सेलच्या अध्यक्ष व अन्याय निवारण समितीच्या ज्वाला धोटे यांनी पत्रकाद्वारे लगावली आहे.प्रसार माध्यमांमध्ये बावणकुळे यांचे त्यांच्यावरील आरोपांबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यावर त्यांनी आज उपरोक्त प्रतिक्रिया दिली.

बावणकुळे हे पुन्हा आमदार झाल्यापासून अगदी दररोज प्रेस क्लब येथे सकाळी १०.३० वाजताच प्रचार-प्रसार माध्यमांना बाईट्स देत असतात.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना ‘मिस्टर नटवरलाल’ तर कधी ‘वेड्यांच्या इस्पिताळात त्यांना भर्ती करावे’,अशी टिका करण्यास बावणकुळेंना जोम चढतो.मात्र ॲड.सतीश उके यांनी त्यांच्या एका जवळच्या नातेवाईकाला माध्यमांसमोर उपस्थित करुन अनेक गंभीर आरोप बावणकुळे यांच्यावर केले असता,त्यांनी फक्त घरुन दोन मिनिटांचा व्हिडीयो शूट करुन माध्यमांकडे पाठवून देण्यात इतिश्री का मानली?त्यांच्यावरील गंभीर आरोपांचे खंडण ते पत्र परिषद घेऊन देखील करु शकले असते,मात्र पत्रकारांच्या प्रश्‍नांना बगल देण्यासाठीच बावणकुळे यांनी एकतर्फी आपली बाजू मांडली व त्यांना सोयीस्कर असा व्हिीडीयो पाठवून दिला.उके यांनी बाकायदा पत्र परिषद घेऊन त्यांच्या वर पाच हजार कोटींची बेकायदेशीर संपत्ती जमविण्याबाबत आरोप केले होते,मग ऐरवी तेरवी नाना पटोले व आघाडी सरकारवर तोंड सुख घेणारे बावणकुळे यांना एवढ्या गंभीर आरोपांवर प्रेस क्लब का गाठावासा वाटला नाही?असा प्रश्‍न धोटे यांनी केला.

याचाच अर्थ त्यांच्याकडे ॲड.उके यांच्या आरोपांविषयी उत्तर नव्हते त्यामुळे ते ‘ सेफ गेम ’ खेळले.बाजू ही मांडली जाते आणि अडचणीत आणनारे प्रश्‍न ही टाळता आले. एकेकाळी उपराजधानीचे पालकमंत्री असणा-या जनतेच्या आमदारांना हे शोभत नाही,अशी घणाघाती टिका ज्वाला धोटे यांनी केली.

बावणकुळे यांनी आरोप करणारे सूरज तातोडे यांच्या भावाचे वक्तव्य माध्यमांकडे पाठवले,तातोडे यांना अर्धांगवायूचा झटका आला असल्याने ते वेडे झाले आहेत,काहीही बोलतात,असे बावणकुळे सांगतात.मात्र असा तोंडी आरोप करण्या ऐवजी सूरज तातोडे यांचा ते वेडे असल्याचे शासकीय मेडीकल प्रमाणपत्र माध्यमांसमोर का सादर केले नाही?घरुन व्हिडीयो पाठवण्यायपेक्षा उघड्या छातीने,ताठ मानेने,अगदी दररोज प्रेस क्लब गाठता तसे सूरज तातोडे वेडा असल्याचे प्रमाणपत्र घेऊन माध्यमकर्मींसमोर का आला नाहीत?उद्या सूरज तातोडे यांनीच बावणकुळेंवर त्यांना वेडे ठरविण्यात आल्याबद्दल मानहानिचा दावा ठोकावा,असे देखील आव्हान धोटे यांनी केले.

आरोप करणा-याच्या भावाल पुढे का करता?तुम्ही स्वत: पुढे का आला नाहीत?तुमच्याच कुटुंबात एकोपा नाही,एक भाऊ गंभीर आरोप करतो,त्याच्याच सख्खा भाऊ त्याला वेडा ठरवतो,आधी कुटुंब कलह तर मिटवा मग जनतेचे आणि ओबीसींचे प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रेस क्लब गाठा,असे धोटे यांनी ठणकावले.

कालच्याच अर्थसंकल्पात देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशात ८० लाख रोजगार निर्माण करणार असल्याचे आश्‍वासन संसदेत दिले.तुम्ही देखील ’ऑटोचालक ते ऑडीमालक’होण्याचा फॉर्म्यूला विदर्भाच्या तरुणांना सांगूनच द्या किंवा तुम्ही तुमचा उमेदवारी अर्ज भरताना कोट्यावधींच्या जमीनी आणि संपत्ती ज्या तुम्हाला वारसा हक्काने प्राप्त झाल्या आहेत,राजा-महाराजाप्रमाणे बक्षीस मिळाल्या आहेत,त्याचा तरी किमान फॉर्म्यूला वैदर्भिय तरुणाना सांगा!

वैदर्भियांच्या पाठीत खंजिर खूपसणारी तुमच्या पक्षाची संस्कृती आहे.सत्तेत आलो तर वेगळा विदर्भ करु,असे खोटे आश्‍वासन तुमच्या पक्षाने वैदर्भिय जनतेला दिले,सत्तेत आल्यानंतर तुमचेच केंद्रिय मंत्री गडकरी साहेब सांगतात,जाहीरनाम्यात सांगितलं ते सगळं खरं थोडी ना असतं?याचा अर्थ ते फक्त छापण्यापूरतीच असतं,जाहीरनाम्यातील आश्‍वासने पाळायची नसतात हे तुमचे केंद्रिय मंत्री राजरोसपणे सांगतात तरी देखील तुमच्या नजरेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मिस्टर नटवरलाल आहेत,वेड्यांच्या इस्पिताळात भर्ती होण्याच्या लायकीचे आहेत!

उके यांच्यावर मानहानिचा दावा ठोकण्यापूर्वी बावणकुळे यांनी माध्यमांसमोर येऊन आधी त्यांच्यावरील गंभीर आरोपांबाबत खुलासा करावा,असे आव्हान ज्वाला धोटे यांनी केले.

Latest बातम्या