
नागपूर,ता.२ डिसेंबर २०२२: ‘एलजीबीटीक्यू’ (लेस्बियन,गे,बायसेक्सुअल,ट्रांसजेंडर व क्विअर) समुदायातील नागरिकांसाठी विदर्भातले पहिले स्वतंत्र व नि:शुल्क उपचार केंद्र सोमवारी नागपूरात सुरु करण्यात आले.यात समुदायातील पाच हजारांहून अधिक नागरिकांसाठी सर्वसाधारण आजारासह एचआयव्हीसाठीही विनामूल्य वैद्यकीय सल्ला व उपचार मिळणार आहे.

सारथी ट्रस्ट व हमसफर ट्रस्टच्या पुढाकाराने हे क्लिनिक सुरु करण्यात आले असून,ते माेहननगर येथील सारथीच्या कार्यालयालगत अाहे. या क्लिनिकमध्ये डॉक्टर,परिचारिका,समुपदेशक,आहारतज्ज्ञ,प्रयोगशाळा तंत्रज्ञ,कम्यूनिटी मोबलाईजर,कायदेशीर सल्ल्यासाठी वकील आदी स्टाफ नियमित सेवा देणार आहे.एचआयव्हीबाधितांना पौष्टिक आहार सेवा,कायदेशीर मदत,जीवनावश्यक औषधांचा पुरवठा केला जाईल.हे विदर्भातील पहीले एलजीबीटीक्यू प्लस इंटीग्रेटेड एचआयव्ही क्लिनिक आहे.

एलजीबीटीक्यू प्लस वर्गासाठी स्वतंत्र असे कोणतेही उपचार केंद्र नव्हते.या समुदायातील नागरिक शासकीय रुग्णालयात मिळणा-या भेदभावपूर्ण व्यवहारामुळे उपचार टाळत होते.गेल्या अनेक वर्षांपासून या समुदायासाठी स्वतंत्र उपचार केंद्राची मागणी होत होती.राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाकडे देखील सातत्याने ही मागणी केली जात होती.अखेर मुंबईतील एक संस्था आणि हमसफर ट्रस्टच्या मदतीने नागपूरातील ‘सारथी’ ट्रस्टच्या सहकार्याने ‘सहयोग इंटीग्रेटेड एचआयव्ही क्लिनिक’ सुरु होऊ शकले,याचा लाभ विदर्भातील जवळपास पाच हजार नागरिकांना होईल,असे सारथी ट्रस्टचे अध्यक्ष आनंद चंद्राणी यांनी सांगितले तर सारथी ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष निकुंज जोशी यांनी लहान लहान शहरात व ग्रामीण भागात देखील असे उपचार केंद्र सुरु झाले पाहिजे असे सांगितले.
विदर्भातील एलजीबीटीक्यू नागरिकांना या क्लिनिकचा लाभ घेता येईल.या क्लिनिकचे उद् घाटन डॉ.काजल मित्रा व डॉ.मुरुगेश सुब्रमण्यम यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी विद्या कांबळे,मोहनी यांनीही मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सारथी ट्रस्टचे निकुंज जोशी यांनी केले,तर आभार आनंद चंद्राणी यांनी मानले.
अधिक माहिती करीता या क्रमांकावर संपर्क साधावा-
आनंद चंद्राणी-९३२५६३२७९५
निकूंज जोशी- ९९७०६४५८८८

आमचे चॅनल subscribe करा