
पदवीधर निवडणूक: ११ हजार ५६० मते ठरली अवैध!
पलटली असती बाजी:अनेकांचे मत
नागपूर,ता. ४ डिसेंबर: नागपूर विभागाच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीत काही ’शे’ नव्हे तर चक्क ११ हजार ५६० मते अवैध ठरली,एक लाख ३३ हजार ५३ मतदारांनी मतदानाचा हक्क या निवडणूकीत बजावला. मात्र स्वत:ला पदवीधर व सुशिक्षितांच्या श्रेणीतील समजणा-या काही मतदारांनी मात्र कमालच केली,त्यांच्या अडाणीपणामुळे तब्बल ११ हजार ५६० मते ही अवैध ठरली,याचा अर्थ जवळपास दहा टक्के मत हे बाद झाले,एवढ्ीच मते तर वैध ठरली असती तर….विजयाचे गणितच बदलले असते,असे आता अनेक जाणकार सांगत आहेत.
काल गुरुवार,दि. ३ डिसेंबर रोजी दुपारी ३ वा.पासून मतमाेजणीच्या प्रक्रियेला सुरवात झाली मात्र पहील्या फेरीत तब्बल २ हजार २३४ मते ही अवैध ठरली!यानंतर दुस-या फेरीमध्ये २,५३५ मते अवैध ठरली,तिस-या फेरीअखेर तर सुशिक्षित मतदारांनी कमालच केली,त्यांनी मतदान केलेल्या अवैध मतांची एकूण संख्या ही ७ हजार २२८ पर्यंत पोहोचली, चौथ्या फेरीच्या मतमोजणीचा टप्पा गाठेपर्यंत ही संख्या ९ हजार ६३० पर्यंत पोहोचली.अखेर या संख्येने निवडणूक निकाल घोषित होईपर्यंत या संख्येने ११ हजार ५६० संख्येचा टप्पा गाठला होता!
‘सत्ताधीश‘ने यामागील कारणांचा मागोवा जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता,मतमोजणीतील अनेक गमतीदार बाबी पुढे आल्या. एका पदवीधर महाभागाने तर संपूर्ण बॅलेट पेपरमधून फक्त उमेदवाराच्या नावाची स्लीप फाडली,त्यासमोर आकडा लिहला व मतपेटीत टाकला,उर्वरित बॅलेट पेपर खिशात टाकून निघून गेला!

एकीकडे निवडणूक आयोगाकडून वारंवार पदवीधर मतदानाविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते. मतदारांनी आपल्या पसंदीच्या उमेदवाराच्या पुढे फक्त इंग्रजी,मराठी किवा रोमन लिपीतील ‘१’ही संख्या लिहावी,शब्दामध्ये ‘0ne’ किवा ‘ first’ असे काही लिहू नये, मतदान करताना स्वत:चा पेन वापरु नये,मात्र अनेक उमेदवारांनी या निवडणूकीत स्वत:चा पेन वापरला,याशिवाय ‘एक ‘ही पसंदीची संख्या शब्दामध्ये संख्या लिहली,परिणामी त्यांचे मत बाद ठरले.
एवढंच नव्हे तर काही महाभागांनी दोन उमेदवारांच्या नावाच्या व छायाचित्रा समोरच्या ‘चौकटीत’ संख्या न टाकता दोन उमेदवारांच्या छायाचित्रासमोरील चौकटींच्या मधोमध संख्या टाकली!परिणामी त्यांचे ही मत बाद झालेत.
ईव्हीएम मशीनद्वारे होणा-या मतदानात मतदान झाल्यानंतर ‘बिप’चा आवाज येतो,येथे मात्र त्या कागदी खरड्याच्या आत मतदार काय घोळ घालतोय,हे कर्तव्यावर असणा-या कर्मचा-यांना कळायला मार्गच नसतो!उमेदवारी स्लीपची व्यवस्थित घडी घातली आहे की नाही?संख्या बरोबर लिहली आहे की नाही?उलट-सुलट घडी घालून, कर्तव्य बजावल्याचे समाधान चेह-यावर घेऊन अनेक ‘पदवीधर’निघून गेलेत.
अनेक मतदान केंद्रातील अधिकारी किवा कर्मचारी यांनी मतदारांना ‘मतदान कसे करायचे?हे माहिती आहे ना?’असे विचारले असता,’समजता काय?आम्ही पदवीधर आहोत!‘अशी अतिश्योक्तीही मतदारांनी केल्याची माहिती आहे.मात्र याच ‘पदवीधरांचे’ एकूण ११ हजार ५६० मतेच जेव्हा मतमोजणीतूनच बाद होतात,तेव्हा मात्र अश्या या पदवीधरांपेक्ष्ा गाव-खेड्यातील अडाणी बरे,अशी म्हणायची वेळ येते.

काही मतदारांनी तर अडाणीपणाचा उच्चांक गाठत पसंदीच्या क्रमांकाची एकसाथ तीन संख्या उमेदवाराच्या छायाचित्रासमोर लिहली!उदा.१,२,३ असे एकाच चौकटीच लिहल्यामुळे ती ‘१‘अशी न वाचता ‘१२३‘अशी संख्या ठरली व मतमोजणीतून बाद झाली.
महाराष्ट्रात पदवीधर व शिक्ष् क मतदार संघाच्या ज्या निवडणूका पार पडल्या त्यातील एकमेव धुळे-नंदुरबार वगळता इतर पाचही ठिकाणी अवैध मतांची संख्या ही लक्ष् णीय ठरली,अर्थात धुळे-नंदुरबारच्या निवडणूकीची चर्चा ही देखील ‘वेगळ्या अर्थाने‘चर्चेत राहीली मात्र एवढे करुनही तिथे ४ मते अवैध ठरलीच!एवढा पैशांचा ‘महापूर‘ओतून देखील तेथील ४ पदवीधर ही चुकीची मते टाकतात?यावर आता चांगलाच गमतीचा फड रंगला आहे.
अश्या प्रकारच्या सुशिक्षीतांची मते बघितली तर एवढं शिकून-सवरुनही शेतकामाच्या पात्रतेचेही पदवीधर नाहीत,असा संताप व्यक्त केला जात आहे.
पहील्या पाच फे-यांपर्यंत अवैध मतांची संख्या ही विजयाची आशा बाळगणा-या उमेदवारांच्या काळजाचे ठोके वाढवणारीच होती यानंतर मात्र दुस-या पसंतीच्या क्रमांकाच्या मतमोजणीत एवढ्या चूका पदवीधरांनी केल्या नाहीत,हेच त्यांचे ‘खरे शिक्ष् ण’असंच म्हटल्या जाऊ शकतं.
केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच २९ ता. ला भट सभागृहात भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत माझ्या व अनिल सोले यांच्या निवडणूकीत सर्वात जास्त अवैध मते पडल्याचा रेकॉर्ड आहे,असे सांगून मतदारांना प्रत्येक मताचे महत्व पटवून सांगितले होते मात्र शेवटी मात्र पक्ष् कोणताही असो,एकूण ११ हजार ५६० पदवीधर हे ‘सुशिक्षित अडाणीच’निघाले,असेच आता म्हणावे लागेल.
निवडणूक आयोग तसेच उमेदवारांनीच आता आणखी जागृत होऊन पदवीधर मतदारांना ख-या अर्थाने ‘सुशिक्षित ‘करण्याची वेळ आली आहे,हे मात्र खरे!

आमचे चॅनल subscribe करा