Homeराजकारणउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सेवाग्राम आश्रमला भेट

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सेवाग्राम आश्रमला भेट

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

वर्धा, दि.२ ऑक्टोबर (जिमाका) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५३ व्या जयंतीनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्धा येथील महात्मा गांधी यांचे वास्तव्य राहिलेल्या सेवाग्राम आश्रमला भेट दिली.

यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील, खासदार रामदास तडस, आमदार सर्वश्री रामदास आंबटकर, डॉ. पंकज भोयर, समीर कुणावार, दादाराव केचे, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टीआरएन प्रभू, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्यासह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनीही बापूकुटीला भेट देऊन महात्मा गांधीच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले.

यावेळी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या वतीने उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे सूतमाळ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर बापूकुटीला भेट देत प्रार्थना करुन महात्मा गांधीच्या स्मृतींना त्यांनी अभिवादन केले.

राणे व केंद्रीय राज्यमंत्री भानु प्रताप सिंग वर्मा यांचीही सेवाग्राम आश्रमला भेट-

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५३ व्या जयंतीनिमित्त केंद्रीय लघु आणि मध्यम मंत्री नारायण राणे यांनी आज वर्धा येथील महात्मा गांधी यांचे वास्तव्य राहिलेल्या सेवाग्राम आश्रमला भेट दिली.

यावेळी केंद्रीय लघु आणि मध्यम राज्य मंत्री भानु प्रताप सिंग वर्मा, आमदार दादाराव केचे, आमदार समीर कुणावार, आमदार पंकज भोयर, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टीआरएन प्रभू, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्यासह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनीही बापूकुटीला भेट देऊन महात्मा गांधीच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले.

यावेळी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या वतीने केंद्रीय मंत्री राणे यांचे सूतमाळ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर बापूकुटीला भेट देत अखंड सूत कताईचे पाहणी केली.

Advertisements

Latest बातम्या