Homeनागपूर न्यूजईडीने चार कोटींची मालमत्ता तात्पुरती जप्त केली ३०० कोटींची नव्हे:अनिल देशमुख

ईडीने चार कोटींची मालमत्ता तात्पुरती जप्त केली ३०० कोटींची नव्हे:अनिल देशमुख

Advertisements


प्रसार-प्रचार माध्यमे पसरवितात आहेत गैरसमज

नागपूर,ता. १९ जुलै: सक्तवसुली संचालनालयाने(ईडी)ने माझी ४ कोटींची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे मात्र काही प्रचार व प्रसार माध्यमात माझी ३०० कोटींची मालमत्ता जप्त केल्याची खोटी बातमी प्रसिद्ध करण्यात आली जी सर्वथा चूक असल्याचा खुलासा माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी व्हिडीयोच्या माध्यमातून केला.

ही मालमत्ता २००६ मध्ये माझ्या मुलाने २ कोटी ६७ लाख रुपयात घेतली होती,असे त्यांनी सांगितले.सलील देशमुख यांनी ही मालमत्ता ३०० कोटींची नव्हे तर २ कोटी ६७ लाख रुपयातच घेतली होती मात्र प्रसिद्धी माध्यमे गैरसमज पसरवित असल्याची नाराजी अनिल देखमुख यांनी व्यक्त केली.

यासोबतच मला ईडीचा समन्स आला आहे मात्र त्या विरोधात मी सर्वोच्च न्यायालयात रितसर पिटीशन दाखल केली आहे,सर्वोच्च न्यायालयाचा जो काही निकाल येईल त्याप्रमाणे मी ईडी समोर उपस्थित राहणार असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.
देशमुख यांनी १०० कोटी रुपयांची खंडणी गोळा करण्याचे आदेश दिले होते,असा अारोप माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता.या प्रकरणाचा ‘ईडी’कडून तपास सुरु आहे.त्यामध्ये ईडीने या आधी देशमुख यांचे स्वीय सचिव व स्वीय सहाय्यकांस अटक केली आहे.
त्याखेरीज या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे याची देखील चौकशी सुरु आहे.त्या चौकशीतील माहितीच्या आधारे पुढील कारवाईत ही मालमत्ता जप्त करण्यात आली.

या ४.२१ कोटी रुपयांच्या मालमत्तेत वरळीतील १.५४ कोटी रुपयांच्या फ्लॅटचा समावेश आहे.तसेच रायगड जिल्ह्यातील २.६७ कोटी रुपयांच्या जमिनीचा समावेश आहे.या जमिनी देशमुख यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांच्या नावे असल्याचे सांगितले जाते.

ईडीने सचिन वाझेंच्या केलेल्या चौकशीत काही बारमालकांकडून खंडणी गोळा करण्यात आल्याचे उघड झाले.त्यामध्ये ४.७० कोटी रुपयांची बेहिशोबी राेकड वाझेंनी अनिल देशमुख यांच्या सुपुर्द केल्याची ठोस माहिती पुराव्यानिशी ‘ईडी’ ला मिळाली.

या ४.७० कोटी रुपयांपैकी ४.१८ कोटी रुपयांची रोकड देशमुख यांनी श्री साई शिक्ष् ण संस्थेच्या नावे स्वीकारली.परंतु त्याचा गैरवापर करण्यात आला.त्यामुळेच या ४.७० कोटी रुपयांच्या बदल्यात ४.२० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती.

Latest बातम्या