

आपमध्ये ३०० कार्यकर्त्यांनी केला पक्षप्रवेश
नागपूर,ता. १३ मे २०२२: आम आदमी पार्टी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका पूर्ण ताकतीने लढणार आहे. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पार्टी सगळ्या जागांवर लढणार आहे. शिक्षण, आरोग्य, पाणी व भ्रष्टाचार हे मुद्दे प्रामुख्याने घेऊन, येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत लोकांपर्यंत जाणार. दिल्ली सरकारचे मॉडेल हे समोर ठेवून महानगरपालिकेच्या धोरणांची रचना हा पक्ष करणार. आम आदमी पार्टीचे ध्येय लोकांच्या मुलभुत गरजांच्या पूर्ततेसाठी संसाधने योग्य पद्धतीने वितरित करने हे आहे. दिल्लीच्या राज्य सरकार सारखे महानगरपालिकेचे मॉडेल नागपूर मध्ये तयार करेल,असे आपचे महाराष्ट्र प्रभारी दिपक सांगला यांनी सांगितले.

आज देशपांडे सभागृहात भव्य पक्षप्रवेश व कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी राज्य संयोजक रंगा राचुरे, राज्य संघटन मंत्री विजय कुंभार, राज्य सचिव धनंजय शिंदे, विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेडे, राज्य कोषाध्यक्ष जगजीत सिंग, विदर्भ संघटन मंत्री नितीन गवळी, विदर्भ सचिव अविनाश श्रीराव यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश व कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी प्रामुख्याने राज्य आयटी प्रमुख अशोक मिश्रा राष्ट्रीय परिषद सदस्य, अमरीश सावरकर, शहर संयोजिका कविता सिंगल, शहर संघटन मंत्री शंकर इंगोले, शहर सचिव भूषण ढाकुलकर, शहर उपाध्यक्ष डॉ जाफरी व राकेश उराडे,ॲड. भोयर, नागपूर ग्रामीण संघटन मंत्री प्रताप गोस्वामी, नागपूर ग्रामीण सचिव ईश्वर गजभिये, युवा राज्य समिती सदस्य कृतल आकरे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी आप मध्ये प्रामुख्याने माजी बीएसपी शहर अध्यक्ष विनोद पाटील यांच्या नेतृत्वात बीएसपी व बीआरएसपी मधील नागपूर शहर व ग्रामीण मधील अनेक पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांनी आप मध्ये पक्ष प्रवेश घेतला.
श्याम बोकडे यांच्या नेतृत्वात शहरातील १५० कार्यकर्त्यांनी आप मध्ये पक्ष प्रवेश घेतला. सामाजिक कार्यकर्ते विकी पेटकर यांच्या नेतृत्वात ५० कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला. माजी काटोल सभापती सुनील वडस्कर व वंचित आघाडी जिल्हा सरचिटणीस किशोर घरत यांनी आप ग्रामीण नागपूर मध्ये पक्ष प्रवेश घेतला. याव्यतिरिक्त नागपूर शहरातील व नागपूर ग्रामीण मधील विभिन्न पक्ष व संघटनेतील अनेक कार्यकर्त्यांनी आप मध्ये प्रवेश घेतला.

आमचे चॅनल subscribe करा