Homeनागपूर न्यूजआमदार विकास ठाकरे ‘नासुप्र’चे विश्‍वस्त

आमदार विकास ठाकरे ‘नासुप्र’चे विश्‍वस्त

नागपूर,ता. १४ डिसेंबर:  नागपूर सुधार प्रन्यासच्या विशवस्तपदी काँग्रेसचे पश्‍चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.आमदार कोट्यातून शहरात काँग्रेसचे एकमेव आमदार असल्याने ठाकरे यांना संधी मिळणे निश्‍चित होते.नासुप्रमध्ये रखडलेल्या विकासकामांना कशी गती देता येईल,यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

शहरातील समस्या व अविकसित भागांतील नागरिकांच्या असंख्य अडचणींची त्यांना चांगली जाणीव आहे.त्यांच्या नियुक्तीने शहरातील अविकसित भागाच्या अनेक समस्या मार्गी लागतील अशी आशा आता व्यक्त केली जात आहे.

सुधार प्रन्यासने शहरतील बहूतांश ले-आऊट महानगरपालिकेला हस्तांतरित केले असून,शहरालगतच्या भागांच्या सुनियोजित विकासाची जवाबदारी प्रन्यासकडे सोपविण्यात आली आहे,हे विशेष!

Latest बातम्या