Homeनागपूर न्यूजआमदार भांगडिया प्रकरणी न्यायालयाची अवमानना नोटीस

आमदार भांगडिया प्रकरणी न्यायालयाची अवमानना नोटीस

Advertisements

न्यायालयाच्या आदेशानंतरही सक्करदरा व इमामवाडा पोलीस स्टेशनमध्ये आ.भांगडिया विरोधात गुन्हयाची नोंद नाही

नागपूर,ता. ६ जानेवारी: प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी विशेष न्यायालयाने गेल्या महिन्यात २८ डिसेंबर २०२० रोजी चिमूरचे भारतीय जनता पक्ष्ाचे आमदार कीर्तीकूमार भांगडिया यांच्या विरोधात सक्करदरा तसेच इमामवाडा पोलीस ठाण्यात नागपूर सुधार प्रन्यासच्या बेघरांसाठी असलेल्या घरकूल योजनेतील तीन सदनिका लाटल्या प्रकरणी गुन्हा दखल करण्याचे आदेश दिले होते मात्र अद्याप या दोन्ही पोलीस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल झाला नसल्याने आज न्यायालयाने या दोन्ही पोलीस ठाण्यावर न्यायालयीन अवमाननाची नोटीस बजावली.

आ.भांगडियाविरुद्ध तक्रारदाते ॲड.तरुण परमार यांनी न्यायालयात दाद मागितली होती.मागील सुनावणीत न्या.व्ही.एम. देशमुख यांनी कागदोपत्री पुराव्यांच्या आधारावर सक्कादरा तसेच इमामवाडा पोलीस ठाण्याला आ.कीर्तीकूमार भांगडियाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते मात्र दहा दिवसांचा कालावधी उलटून गेल्यावरही आ.भांगडियाविरुद्ध या दोन्ही पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

याकडे लक्ष् वेधण्यासाठी ॲड.तरुण परमार यांनी न्यायालयात धाव घेत न्यायालय अवमाननाचे प्रकरण दाखल केले. या वेळी तक्रारदात्यातर्फे ॲड.सतीश उके तसेच अॅड. वैभव जगताप यांनी बाजू मांडली. यावर न्यायालयाने सक्करदरा व इमानवाडा पोलीस ठाणे यांना आ. भांगडिया प्रकरणात न्यायालयीन अवमाननेच्या प्रकरणात उत्तर दाखल करण्याचे अाज निर्देश दिले.या प्रकरणावर पुढील सुनावणी आता ८ जानेवरी २०२१ रोजी होणार आहे.

नागपूर सुधार प्रन्यासच्या घरकूलातील तीन सदनिका खोट्या शपथपत्रांच्या आधारे लाटल्याप्रकरणी आ.कीर्तीकूमार भांगडिया यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या प्रथमश्रेणी न्यायदंडाधिका-यांनी दिलेल्या आदेशला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने देखील नकार दिला होता.ॲड.तरुण परमार यांच्या तक्रारीवरुन आ.बंटी भांगडिया यांच्याविरुद्ध इमामवाडा आणि सक्करदरा पोलिस ठाण्यात भांदविच्या कलम १९९,२०० आणि ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्याचा आदेश प्रथम श्रेणी न्यायदंडाधिका-यांनी दिला होता.

पोलीस ठाण्यात सामान्य माणसांच्या तक्ररीची दखल घेतली जात नाही अशी प्रतिमा असताना न्यायालयाच्या अादेशांची देखील नागपूरातील पोलीस ठाणे दखल घेत नसल्याबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.विशेषत: गृहमंत्री अनिल देशमुख हे नागपूरचे असताना त्यांच्याच शहरात त्यांच्या गृहखात्याच्या अखत्यारित येणा-या पोलीस ठाण्याकडून न्यायालयाच्या अवमानानाचे प्रकरण घडत अाहे,याबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

Latest बातम्या