
कुकरेजा प्रकरण:उद्यापासून जरीपटका पोलिस ठाण्यासमोर भाजपचे आंदोलन
अट्रासिटीचा गुन्हा परत घ्या
नागपूर,ता.२८ फेब्रुवारी २०२२: काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता बाबू खान व त्याच्यासोबत गेलेल्या महिलांची कुकरेजा यांच्यासोबत झालेल्या वादावादी व तोडफोडची परिणिती भाजपचे प्रभाग क्र.१ जरीपटका भागातील नगरसेवक विकी कुकरेजा यांच्यावर अट्रासिटीचा गुन्हा नोंदविण्यात झाली.पोलिसांच्या या कारवाईविरोधात आज भाजपचे नेते शहराध्यक्ष प्रवीण दटके यांच्या नेतृत्वाखाली एकवटले.कुकरेजा यांच्यावरील अट्रासिटीचा लावण्यात आलेला खोटा गुन्हा मागे घ्यावा व ख-या दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी आज सोमवारी प्रेस क्लब येथे भाजपतर्फे पत्र परिषद अायोजित करण्यात आली होती.या वेळी आमचा पोलिस विभागावर पूर्ण विश्वास आहे,पोलिसांवर कोणाचा दबाव आहे हे माहिती असल्याचे दटके हे म्हणाले.याप्रसंगी मंचावर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, माजी आमदार डॉ.मिलिंद माने , विकी कुकरेजा,संजय चौधरी,लीना सोमकुवर आदी उपस्थित होते.
रविवार दि.२७ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता कुकरेजा यांच्या जरीपटका येथील जनसंपर्क कार्यालयात बाबू खान नावाचा गुंड प्रवृत्तीचा नेता हा काही महिला व पुरुषांना सोबत घेऊन आला.समता नगर व हूडको कॉलनीत नगरसेवकाने काम केले नसल्याचा अारोप त्यांनी लावला.याच वेळी चार मुले ही या सर्व घटनेचे मोबाईलमध्ये व्हिडीयोचित्रण करीत होती.कुकरेजा यांच्या कार्यकर्त्यांसोबत झालेल्या वादावादीमुळे कुकरेजा हे कार्यालयात पोहोचले असता बाबू खान याने त्यांनाही मारहाण केली व त्यांचे कपडे फाडले,लीना सोमकुंवर नावाच्या भाजपच्या महिला कार्यकर्तीचा पदर ओढला व तिचे केस धरुन तिला जातीवाचक शिवीगाळ केली,असा आरोप भाजपने लावला आहे.बाबू खान व त्याच्यासोबत आलेल्या महिलांनी कुकरेजा यांच्या कार्यालयाची तोडफोड केली.याविरुद्ध जरीपटका पोलिस ठाण्यात बाबू खान व महिलांविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली.
राज्याचे उर्जामंत्री व उत्तर नागपूरचं प्रतिनिधित्व करणारे आमदार नितीन राऊत यांनी पोलिस आयुक्त तसेच डीसीपी कलवानिया यांना किमान आठ ते दहा वेळा फोन लाऊन दवाब निर्माण केला.मंत्री यांच्या दबावात येऊन कुकरेजा यांच्यावरच अट्रासिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे दटके यांनी सांगितले.मंत्री पुत्र कुणाल राऊत ही स्वत: पोलिस निरीक्षक क्र.२ च्या कक्षात आठ तास ठाण मांडून बसून होते.‘काँग्रेस पक्षाची जय’असे नारे लावत होते.कुणाल राऊत व काँग्रेस समर्थकांनी पोलिस ठाण्यातच नारेबाजी केली.नितीन राऊत हे आपल्या मंत्री पदाचा दुरुपयोग करीत असून त्यांना तात्काळ मंत्री पदावरुन हटवण्यात यावे,अशी मागणी याप्रसंगी दटके यांनी केली.
आम्हाला पोलिस विभागावर विश्वास आहे मात्र त्यांच्यावर मंत्री राऊत यांचा दबाव आहे.त्यांनी कुकरेजा यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला अट्रासिटीचा गुन्हा रद्द करावा,अन्यथा उद्या सकाळी ११ वाजतापासून आम्ही जरीपटका पोलिस ठाण्यासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा दटके यांनी दिला.
मी हिंदू आहे म्हणून हिंदूत्वाची साद-कुकरेजा
माझ्यावर हल्ला झाला,माझ्या कार्यालयाची तोडफोड झाली,बाबू खान हा नेहमीच प्रभागातील नागरिकांना माझ्याविरुद्ध भडकवण्याचे काम करतो, हे सगळं माझी प्रतिमा खराब करण्यासाठी करतो,तो खंडणीखोर असून हे सगळं थांबवण्यासाठी त्याने पाच लाख रुपयांची मागणी केली हाेती,असा आरोप कुकरेजा यांनी केला.ते माझे खाजगी कार्यालय आहे,काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना काही समस्या असेल तर त्यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यालयात जावे.आम्ही आमच्या प्रभागाचा खूप विकास केला.गडरचे चेंबर तुबंल्याची तक्रार घेऊन तो महिलांना घेऊन माझ्या कार्यालयात आला मात्र अडीच तीन मिनिटातच त्याने माझ्या कार्यालयात तोडफोड सुरु केली,माझा कॉलर पकडला,मला मारहाण केली.आम्ही याची तक्रार द्यायला गेलो तरी चार तास आमची तक्रार पोलिसांनी नोंदवलीच नाही.माझ्यावरील हल्ल्याच्या विराेधात समस्त सिंधी समाज एकवटला,त्यांनी आपापली दूकाने बंद करुन पाेलिस ठाणे गाठले.’मी एक हिंदू नगरसेवक असून एका मुस्लिम युवकाने त्यांच्या कार्यालयात तोडफोड केली’असा संदेश त्यांनी सोशल मिडीयावर तसेच नागरिकांना संबोधित करताना का दिला?या प्रश्नावर बोलताना,मी एक हिंदू नगरसेवक आहे त्यामुळेच मी हिंदू असल्याचे बोललो,असे उत्तर कुकरेजा यांनी दिला.ज्या महिलांनी माझ्यावर जातीवाचक शिविगाळ करण्याचे आरोप केले,त्यांच्या तक्रारीवर माझ्यावर अट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला परंतू त्यांचे जातीचे प्रमाणपत्र घेण्यात आले का?असा सवाल त्यांनी उपस्थित केला.त्या अनुसूचित जातीच्या नसून फक्त आडनाव सारखे असल्याचा आरोप कुकरेजा यांनी केला.माझ्या कार्यालयात सीसीटीव्ही नसल्याचा दावा देखील त्यांनी केला.
आयुक्तांपासून संपूर्ण पोलिस यंत्रणा दबावाखाली-डॉ.मिलिंद माने
कुकरेजा यांचे कार्यकर्ते बाबूू खान व इतरांची बाजू समजून घेत होते मात्र बाबू खानने शिविगाळ सुरु केली.त्याने लीना सोनकूंवर यांच्यासोबत ही असभ्य व्यवहार केला,कार्यालयाची तोडफोड केली,त्याच्याविरुद्ध आम्ही अट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यास आम्ही विसरलो.मात्र याच दरम्यान पालकमंत्री नितीन राऊत यांचे वारंवार फाेन जरीपटका पोलिस ठाण्यात येत होते.पोलिस आयुक्तांपासून तर संपूर्ण पोलिस विभाग हा मंत्री नितीन राऊत यांच्या दबावाखाली काम करीत आहे.मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राऊत यांना मंत्रीमंडळातून निष्काषित करावे,अशी मागणी माने यांनी केली.बाबू खान कुकरेजाच्या विरोधात नेहमीच असले प्रकार करतो,त्यांच्या विषयी व्हिडीयो व्हायरल करतो,माजी नगरसेवक संजय चौधरी याने हे खोटे प्रकार त्याला थांबवण्यास सांगितले असता, फूकट थांबणार नाही पाच लाख रुपये अशी खंडणी बाबू खान याने मागितली असल्याचा आरोप डॉ.माने यांनी केला.

आमचे चॅनल subscribe करा