

नागपूर,ता. २७ ऑगस्ट: २८ सप्टेंबर २०२१ रोजी १० वर्षीय बालक आदर्श राकेश मिश्रा याला घरीच सर्पदंश झाला होता,रात्री २.३० वाजता दरम्यान त्यांच्या कुटुंबियांनी त्याला मेडीकलमध्ये आणले,मात्र त्यावेळी कर्तव्यावर असणा-या डॉक्टरने सर्पदंशावर प्रभावी ॲटिव्हेनम इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे सांगितले,परिणामी आदर्शच्या कुटुंबिय त्याला खासगी रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच त्याचा दूर्देवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे मेडीकलमध्ये नेण्यापूर्वी आदर्शला मेयाेमध्ये देखील घेऊन जाण्यात आले हाेते मात्र त्यांनीही उपचारासाठी मेडीकलमध्ये घेऊन जा म्हणून सल्ला दिला,अवघ्या १० वर्षाच्या बालकाचा मृत्यू हा शासकीय वैद्यकीय दिरंगाईमुळे झाला असून संबंधितांवर येत्या ३ दिवसात कारवाई न झाल्यास , संभाजी ब्रिगेड मेडिकल चौकात आमरण उपोषण करणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे महानगर अध्यक्ष् प्रताप पटले यांनी आज पत्रकार भवनात आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी सांगितले.
मेडीकलमध्ये हे इंजेक्शन उपलब्ध असतानासुद्धा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका निष्पाप बालकाचा बळी गेला.८ ऑगस्ट रोजी त्यांच्या कुटुंबियांनी अजनी पोलिस ठाण्यात तक्रार देखील नोंदवली मात्र अद्याप संबंधितांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे व मृत बालकाला न्याय मिळावा तसेच या पुढे मेडीकलमध्ये अश्या घटना घडणार नाही यासाठी संभाजी ब्रिगेडतर्फे आज सक्कदरा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस आयुक्तांकडे अर्ज देण्यात आला.
अर्जात हलगर्जीपणा करणा-या डॉक्टरचे नाव डॉ.भूषण थोरात,अधि.परिचारिका माया चाकणे,वंदना भोयर,लीना राऊत यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
पत्रपरिषदेत संभाजी ब्रिगेडचे उपाध्यक्ष शिरीष गोडे, उपाध्यक्ष अनुप मुरतकर, सचिव अमोल हाडके, प्रवक्ता गोविंद पोलाड, वैभव शिंदे, तेजस पाटील, संकेत महाले, विक्की जवंजाळ ,रविकांत धुपे, अन्सार शेख, सतीश देहाले, हृतिक मावळे, नितीश भांदक्कर, पंकज बादुले, सौरभ बवनगडे तसेच पिडीत आदर्श मिश्रा चे वडील राकेश जी मिश्रा व संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते उपस्थित होते.

आमचे चॅनल subscribe करा