Homeनागपूर न्यूजआता मनपाच्या कार्यकारी अभियंतांवर एफआयआर!

आता मनपाच्या कार्यकारी अभियंतांवर एफआयआर!

स्थायी समिती अध्यक्ष् पिंटू झलके यांचा इशारा

नागपूर,ता. ३ जुलै: जानेवारीपासूनच अनेक विकास कामांचे वर्क ऑर्डर निघाले. मनपाच्या सर्वसाधारण सभेची या कामांना परवानगी देखील प्राप्त झाली.कलम ८६ प्रमाणे परवानगीप्राप्त कामांना थांबवता येत नाही. मात्र प्रशासन सातत्याने आर्थिक अडचणी सांगते. विशेष म्हणजे काम थांबवलेल्या फाईलींवर कोठेही लिखितमध्ये काम थांबविल्याचे नमूद नाही. याशिवाय लेखा अधिकारी यांनी दर महिन्याला स्थायी समितीला आर्थिक अहवाल कळविण्याचे बंधनकारक असताना,स्थायी समितीला हा लेखाजोखाही सादर करण्यात आला नाही. सगळीच कामे सरसकट बंद केली.अायुक्तांचे तोंडी आदेश असले तरी प्रत्येक फाईलवर तसे लिखित असणे बंधनकारक असताना ,मंजूर झालेल्या सर्व विकास कामांना स्थगिती देण्यात आल्यामुळे अधिक्ष् क अभियंता तसेच कार्यकारी अभियंतांवर एफआयआर दाखल करण्यात येईल,असा इशारा स्थायी समिती अध्यक्ष् विजय (पिंटू)झलके यांनी आज शुक्रवार दि. ३ जुलै रोजी मनपा मुख्यालयात घेतलेल्या पत्र परिषदेत दिला.

याप्रसंगी बोलताना पिंटू झलके म्हणाले,की अति.आयुक्तांनीच हा नियम सांगितला आहे, जरी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कामे थांबविण्याचे तोंडी आदेश दिले असले तरी प्रत्येक फाईलवर लेखी स्वरुपात फाईल थांबविण्यात आल्याचे नमूद करणे अत्यावश्‍यक होते. मात्र असे घडले नाही,परिणामी अधिक्ष् क अभियंता व कार्यकारी अभियंतांना आधी शिस्तभंगाची नोटीस पाठवली जाईल,योग्य उत्तर प्राप्त न झाल्यास त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल केली जाईल.कारण मंजूर झालेली कामे थांबविण्यात आली आहे,परिणामी कंत्राटदारांनी आतापर्यंत जी कामे केली त्याचा भुर्दंड त्यांनाच बसतो आहे.उद्या ते ही या विरोधात न्यायालयात जातील.प्रशासनाकडे मात्र यावर कुठलेही उत्तर नाही.

प्रशासनाने यावर परिपत्रक काढावे किवा नोटीस द्यावी,अशी सूचना झलके यांनी केली. लेखा अधिकारी यांना ही येत्या ३ दिवसात स्थायी समितीच्या पटलावर आर्थिक अहवाल ठेवण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय नागपूर सुधार प्रन्यासकडून हस्तांतरित करण्यात आलेल्या ले-आऊट्ससंबंधी कोणतीही आर्थिक देणगी नासुप्रने मनपाला सोपविली नाही.या ले-आउट्सचे शेड्यूल किती,शिल्लक किती यांचा संपूर्ण अहवाल मागविण्यात आला आहे.

डिप्टी सिग्नलच्या रसत्यासंबधी संबधित कंपनीवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहे.नंदग्राम योजनेच्या संदर्भात एडीटीपीचा अहवाल मागवला आहे. यानुसार शहर सर्वेक्ष् ण केले जाईल. स्थळांना चिन्हित केले जाईल.येत्या ८ दिवसात याचाही अहवला मागितला असल्याची माहिती त्यांनी दिली. अनिल गेंडरे यांच्या ओपन चेंबरचे काम अद्याप झाले नाही.नुकतेच यात एक मुलगा पडल्याची माहिती आहे. याविरोधात सहा.आयुक्त व झोन अभियंता यांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे.

अंदाजपत्रकासाठी अत्यावश्‍यक असणारी झोनस्तरावरील माहिती फक्त धंतोली व हुनमानगनर झोन सोडून इतर आठ झोनने सादर केली नाही.येत्या तीन दिवसात झोन आयुक्तांना संपूर्ण माहिती मागितली असल्याचे झलके यांनी सांगितले. याशिवाय आजच्या स्थायी समितीच्या बैठकीत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोथ्थान अभियानाअंतर्गत पश्‍चिम नागपूर विधानसभा क्ष्ेत्रातील प्रभाग क्र. १२ येथील वेटरनरी कॉलेज मागे मानवसेवा नगर येथे रस्त्यांचे डांबरीकरण व फूटपाथच्या कामांसाठी ७१,६८,०१०च्या कार्यराशीस मंजुरी प्रदान करण्यात आली.

याशिवाय अग्निशम विभागातील भंगाराचा विषय होता.काेरोनामुळे लिलाव स्वीकृत करणा-या कंपनीने आता काम करु शकत नाही,असे कळविले असल्यामुळे पुन्हा लिलावाचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवला असल्याची माहिती झलके यांनी पत्र-परिषदेत दिली.

Latest बातम्या