Homeनागपूर न्यूजआतातरी मुंढेंनी कामाची पद्धत बदलावी: प्रवीण दटके

आतातरी मुंढेंनी कामाची पद्धत बदलावी: प्रवीण दटके

कायद्याचा ‘स्मार्ट’ विजय

नागपूर,ता. १० जुलै: खोट्या गोष्टी वरवर आकर्षक वाटतात, विजय मात्र नेहमी सत्याचाच होतो. नियम आणि कायद्यांचा होतो हे आज झालेल्या स्मार्ट सिटीच्या बैठकीत स्पष्ट झाले अशी प्रतिक्रिया भाजपचे अध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांनी व्यक्त केली. आतातरी शहराच्या विकासासाठी मुंढेंनी कामाची पध्दत बदलावी’ अशी अपेक्षा दटके यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले की, ‘आयुक्त तुकाराम मुंढे सीईओ नाहीत, ते खोटं बोलत आहेत हे आम्ही वारंवार सांगत होतो. ते आज स्पष्ट झाले. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एका अधिकाऱ्याची पाठराखण न करता, नियमांची संगत केली. गैरसरकारी दोन संचालकांनी देखील कायद्याचीच बाजू घेतली. त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. मुंढे यांनी या पुढे संयमाने आणि समन्वयाने वागावे. स्थानिक स्वराज्य संस्थेचा गाडा हा लोकनियुक्त सदस्यांच्या सोबतीने हाकावा लागतो हे सुध्दा समजून घ्यावे.

आम्ही कुठल्या अधिकाऱ्याच्या विरोधात नाही, त्यांच्या कार्यपध्दतीच्या विरोधात आहोत.  महापौर संदीप जोशी आणि त्यांच्या टीमने अन्यायाविरुद्ध लढा दिला आणि त्यात ते यशस्वी झाले त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे असेही दटके म्हणाले

Latest बातम्या