Homeब्रेकिंग न्यूजअंदमानच्या सेल्युलर जेलची भव्य प्रतिकृती तयार

अंदमानच्या सेल्युलर जेलची भव्य प्रतिकृती तयार

Advertisements
स्वा. सावरकर जयंतीनिमित्त त्रिदिवसीय महोत्‍सव उद्या पासून 

नागपूर,ता.२७ मे २०२६: श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्त “अंदमान एक तीर्थक्षेत्र…” या त्रिदिवसीय महोत्सवाचे व्‍हॉलिबॉल मैदान, लक्ष्‍मीनगर, आठ रस्‍ता चौक, नागपूर येथे २८ ते ३० मे दरम्‍यान आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने नागपुरातील हरहुन्नरी कलाकार प्रफुल्ल माटेगांवकर हयांनी अंदमानच्या
ऐतिहासिक सेल्युलर जेलची भव्य  हुबेहुब प्रतिकृती तयार केली आहे आहे.

श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टचे अध्‍यक्ष माजी महापौर संदीप जोशी यांच्‍या संकल्‍पनेतून साकार झालेल्या या महोत्सवात आयोजित त्रिदिवसीय व्‍याख्‍यानमालेचे उद्या, २८ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता उद्घाटन होणार आहे. उद्घाटन सत्रानंतर “स्वा. सावरकर जाणून घेतांना” या विषयावर अमृत वक्ते विवेक घळसासी वक्तव्य करणार आहेत.
शुक्रवारी २९ मे रोजी “हिंदुत्व…” या विषयावर प्रसिद्ध चित्रपट व नाट्य अभिनेते शरद पोंक्षे तर ३० मे रोजी “समाज क्रांतिकारक सावरकर” या विषयावर सुप्रसिद्ध वक्ते आशुतोष अडोणी विचार मांडतील.
सेल्युलर जेलची भव्य प्रतिकृती-

स्‍वा. सावरकर यांच्‍यासह अनेक स्‍वातंत्र्यवीरांनी काळ्या पाण्‍याची शिक्षा भोगली होती, त्‍या ऐतिहासिक सेल्‍युलर जेलची व्‍यवसायाने सिव्‍हील इंजिनीयर असलेले कलाकार प्रफुल्‍ल माटेगावकर यांनी साकारली असून त्यांना आर्किटेक्ट लक्ष्मी पातूरकर, हर्षद भिशीकर, सुदामा इंगळे,  महेश वानखेडे, मनमोहन कुमावत, आदित्य राठोड, सारंग जोशी आणि मनिष नायडू यांचे सहकार्य लाभले आहे. लाईट अँड साऊंड शो च्या माध्‍यमातून नागरिकांना या संबंधी इतिहासाचा, क्रांतिकारकांनी सोसलेल्या वेदनांचा जिवंत अनुभव घेता येणार आहे.लाईट अँड साऊंड शो रोज सायंकाळी ६.३० वा आणि व्याख्याना नंतर पुन्हा होईल.
हा कार्यक्रम नि:शुल्‍क असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संदीप जोशी व आयोजन समितीने केले आहे.
……………………
Advertisements
Advertisements

Latest बातम्या