Homeनागपूर न्यूजकरोना का मौका है...लृट सके तो लृट!

करोना का मौका है…लृट सके तो लृट!

 रेमडेसिवीरसाठी कुटुंबियांची संमती घेतलीच जात नाही!

शासकीय दरांना खासगी रुग्णालये अद्यापही ही दाखवतात केराची टोपली

नागपूर,ता. २७ सप्टेंबर: केंद्र असो किवा राज्य सरकार यांनी करोनाच्या महामारीच्या काळात खासगी व सरकारी रुग्णालयांसाठी कितीही नियम बनवलेत किवा कितीही दिशानिर्देश जारी केले तरी अनके रुग्णालये व अनेक ‘करोना योद्धे’ डॉक्टरर्स यांना बेजार,लाचार,गरीब,गरजू रुग्णांकडून वारेमाप पैसा लृटण्याची ही‘ सुवर्ण संधीच’ वाटत असल्याची अनेक उदाहरणे दररोज माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत आहे,अशीच आणखी एक तक्रार नागपूरातील ‘आशा’ रुग्णालयाच्या बाबतीत आली असून १३ सप्टेंबर रोजी या रुग्णालयाने सुरक्ष्ा रक्ष् क असणा-या ५८ वर्षीय रुग्णाच्या कुटंबियांकडून एक लाख रुपये आधी अनामत रक्कम म्हणून जमा करुन घेतली यानंतर दोनच दिवसात पुन्हा आणखी पैशांची मागणी केली,मात्र हेच पैसे कुटुंबियांनी उसणवार करुन भरले असल्याने त्यांनी पैसे भरण्यास असमर्थतता व्यक्त करुन रुग्णाला शासकीय रुग्णालयात घेऊन जाण्याची तयारी दाखवली तेव्हा अनामत रक्कम मधून तर या गरीब,गरजू रुग्णाच्या कुटंबियांना रुग्णालयाने पैसे तर परत केलेच नाही उलट दोनच दिवसाचे बिल एक लाख पंधरा हजार रुपये काढून आणखी पंधरा हजार रुपयांची मागणी केली!अश्‍याच तक्रारी शहरातील अनेक खासगी रुग्णालयांकडून येत असल्याने ’करोना का मौका है…लृट सके तो लृट’अशीच स्पर्धा रंगलेली सध्या या नोबेल समजल्या जाणा-या डॉक्टरी पेशात दिसून पडतेय.

१३ सप्टेंबर रोजी रात्री या रुग्णाला १०.३० वा. आशा हॉस्पीटलमध्ये मध्ये भरती करण्यात आले होते. आयसोलेशमनध्ये करण्यात आलेली करोना चाचणी ही निगेटीव्ह आली होती मात्र मनपाच्या कॉटन मार्केट जवळील केंद्रातून केलेल्या चाचणीत हे गृहस्थ पॉझिटीव्ह निघाले. यामुळे त्यांना कुटुंबियांनी ‘आशा’ हॉस्पीटलमध्ये भरती केले.भरती करतानाच या कुटुंबियांकडून एक लाख रुपये अनामत रक्कम जमा करुन घेण्यात आली.विशेष म्हणजे दोनच दिवसांचं बिल या रुग्णालयाने ६० हजार काढले व ४२ हजार रुपयांचे औषध त्यांच्याच फॉर्मसीमधून घेण्यास सांगितले. आर्थिक क्ष् मता संपताच या कुटुुंबियांनी रुग्णाला शासकीय रुग्णालयात घेऊन जाण्याचे आशा रुग्णालयाच्या व्यवस्थापनास कळवले.१३ सप्टेंबर रोजी रात्री १०.३० वा. भरती करण्यात आलेल्या रुग्णाचे १५ सप्टेंबर रोजी रात्री ८ वा.पर्यंतचे बिल या रुग्णालयाने काढले ‘एक लाख पंधरा हजार!’या रुग्णालयाने रुग्णाचे तीन दिवसांचे बिल काढले,हे विशेष! खासगी रुग्णालयांतील ‘घड्याळीचा काटा’ हा दोन दिवस भरती राहीलेल्या रुग्णाची वेळ ही चक्क ’तीन दिवस’दाखवतो,या विषयी देखील माय-बाप सरकारने काही नियम करण्याची गरज आहे…..!

वाचा आणखी बातम्या-धक्कादायक! मेयो रुग्णालयातून बहिणच गायबhttps://sattadheesh.com/?p=8642

चॅरेटेबल रुग्णालयात रुग्णाला लावले ७ रेमडेसिवीरचे इंजेक्शन्स-शासनाचे नियम धाब्यावर-
यानंतर या रुग्णाला डिगडोह येथील एका चॅरेटेबल रुग्णालयात १५ सप्टेंबर रोजी रात्री दाखल करण्यात आले.अद्याप रुग्णाला सुटी मिळाली नसून येत्या एक-दोन दिवसात सुटी मिळेल असे या कुटुंबियांना सांगण्यात आले असले तरी या चॅरेटेबल रुग्णालयात कोविडच्या या रुग्णासाठी तब्बल वेळोवेळी ७ इंजेक्शन्स बाहेरुन आणण्यास सांगितले. रुग्णाच्या एकुलत्या एक मुलीने शहरभर फिरुन ते वेगवेगळ्या औषधी दूकानामंधून प्रत्येकी ५ हजार रु.मध्ये खरेदी केले. याचा अर्थ एवढ्या हलाकीच्या स्थितीत आणखी ३५ हजारांचा भुर्दंड या कुटंबावर पडला.

विशेष म्हणजे रेमडेसिवीरसाठी रुग्णाच्या कुटुंबियांची परवानगी घेणे वैद्यकीय शिक्ष् ण व संशोधन विभागाने बंधनकारक केले आहे.मात्र या कुटुंबियांना याची कोणतीही कल्पना देण्यात आली नाही.

रेमडेसिवीर या इंजेक्शनचा करोना संसर्गाच्या उपचारपद्धतीमध्ये वापर करताना तो मध्यम स्वरुपाची(मॉडरेट) लक्ष् णे असलेल्या रुग्णांसाठी करावा,असे महत्वाचे निर्देश वैद्यकीय शिक्ष् ण व संशोधन विभागाने दिले आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यापूर्वी कुटुंबियांची संमती घेणे बंधनकारक आहे. कुटुंबियांना या यासंदर्भात माहिती नसताना हे इंजेक्शन देण्यात येऊ नये,असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
रेमडेसिवीरचा वापर पर्णूपणे प्रभावी असल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही. मात्र उपचाराच्या प्रायोगिक पद्धतीनुसार हे इंजेक्शन देण्यात येत आहे. केंद्रिय औषध नियामक मंडळ आणि टास्क फोर्सने दिलेल्या निर्देशानुसार करोनारुग्णांच्या उपचारपद्धतीमध्ये या इंजेक्शनचा वापर केला जात आहे,असे मेडीकलचे वैद्यकीय अधिक्ष् क डॉ.अविनाश गावंडे यांनी सांगितले. मात्र काही खासगी रुग्णालयांमध्ये या इंजेक्शनचा वापर सौम्य लक्ष् णे असतानाही खबरदारीचा उपाय म्हणून सर्रास केला जात आहे. यासाठी रुग्णांच्या कुटुंबियांची चांगलीच धावाधाव होत आहे. अचानक रेमडेसिवीरचे दर ही आकाशाला भिडले आहेत.काळ्या बाजारात याची किंमत ९ हजार आणि ११ हजारापर्यंत पोहोचले असल्याचे वृत्त ही प्रसिद्ध झाले आहे. येथे प्रत्येकाला करोनाच्या महामारीच्या काळात रुग्णाला फक्त ’लृटायचेच’आहेत आणि मंत्री-संत्री स्थानिक प्रशासन हे फक्त आणि फक्त वांझोट्या बैठकांमध्येच करोनावर ‘प्रभावी’ उपाययोजना लागू करण्यात गर्क आहेत!

वाचा आणखी बातम्या-मेयो वॉर्डातील शौचालयात वृद्धाचा तीन तास मृतदेह शौचात पडून! https://sattadheesh.com/?p=8623

शहरातील अनेक खासगी रुग्णालय असो किवा चॅरेटेबल रुग्णालये कोणत्याही रुग्णालयात पालकमंत्री किवा मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.यांनी केलेल्या सूचनांप्रमाणे अद्याप शासकीय उपचाराच्या दराची रक्कम किवा खाटांची उपलब्धता दर्शविणारे डॅशबोर्ड लागलेच नाही,मात्र तरी देखील एकाही रुग्णालयावर प्रशासनाने कारवाई केली नाही. हे डॅशर्बार्ड रुग्णालये करोनाचा कहर संपल्यावर…. वसुली थांबल्यानंतरच लावतील का?असाही संताप रुग्णांचे नातेवाईक व्यक्त करीत आहेत.

रेमडेसिवीरमध्ये स्टिरॉईड असून याचा अतिरिक्त वापर हा ऑक्सीजनची गरज नसलेल्या रुग्णांमध्ये करु नये,असे शासनाचे निर्देश आहेत. त्याचा प्रतिकूल परिणाम हा रुग्णांच्या प्रकृतीवर पडतो. रुग्णाला संसर्ग झालेल्या पहील्या दहा दिवसांमध्ये फक्त पाच दिवसांसाठी इंजेक्शनचा डोस देण्यात यावा.दहा दिवसांसाठी हा डोस देण्याची गरज नाही,ही नियमावली रुग्णहिताच्या दृष्टिने गरजेची असल्याचे प्रशासन सांगतंय. हे इंजेक्शन देताना रुग्णाच्या नातेवाईकांची संमती घ्यावी लागेल,असेही स्पष्ट निर्देश आहेत. हे इंजेक्शन दिल्यानंतर काही रुग्णांमध्ये उलट्या होणे,हातपाय थरथरणे,जुलाब,चक्कर येण्यासारखे त्रासही दिसून आले आहेत.त्यामुळे या लक्ष् णांचा विचार करणेही महत्वाचे असताना नागपूरात अनेक खासगी किवा सरकारी रुग्णालयात या रेमडेसिवीर इंजेक्शनचा सर्रास वापर होताना दिसतोय.
अनेक कराेनाचे रुग्ण हे कुटुंबियांशी फोनवर सांगतात,येत्या तीन-चार दिवसात घरी परत येतोय मात्र अचानक त्यांच्या मृत्यूची वार्ताच कुटुंबियांना मिळाली…. करोनावर अद्याप कोणतेही प्रभावी औषध उपलब्ध नसताना अशी कोण-कोणती औषधे या रुग्णालयात रुग्णांना दिली जात आहेत किवा दिली गेली याचा कोणताही उल्लेख रुग्णाच्या डिस्चार्ज पेपरवर नसतात.परिणामी रुग्णाच्या कुटुंबियांना आपल्या फॅमिली डॉक्टरांकडे या औषधांच्या परिणामांबाबत विचारणा करणे ही शक्य होत नाही.

मनपा प्रशासनाने किवा जिल्हा प्रशासनाने करोना संदर्भात अनेक दिशानिर्देश जारी केलेत त्यात रुग्णाला त्याच्या डिस्चार्ज पेपरवर त्याच्यावर काेण-कोणत्या औषधांचा ’प्रयोग’करण्यात आला,याचाही स्पष्ट उल्लेख असावा,अशी मागणी आता केली जात आहे.
या मुलीला लाखो रुपये ‘लृटमारी करणा-यांना’ देऊन आता आपले बाबा सुखरुप घरी यावे फक्त एवढीच फक्त आशा आहे!

Latest बातम्या