Homeनागपूर न्यूजकोविड-१९ च्या दहा कोटी रुपयांवर दबकी चर्चा!

कोविड-१९ च्या दहा कोटी रुपयांवर दबकी चर्चा!

कोविड-१९ च्या दहा कोटी रुपयांवर दबकी चर्चा!

डॉ.ममता खांडेकर
( Senior Journalist)

नागपूर,ता. २३ जून: शासनाकडून नागपूरातील कोराेनाची महामारी आटोक्यात आणण्यासाठी नागपूर महानगरपालिकेला दहा कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. हा संपूर्ण पैसा आयुक्त यांच्या सहीनिशी खर्च होत आहे. विलगीकरणातील नागरिकांवरील होणार खर्च याशिवाय आयुक्तांनी मनपाच्या पाच रुग्णालयाचे केलेले कायापलट इ.विविध बाबींवर हा पैसा खर्च होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र एकूण दहा कोटींपैकी वास्तवतेत फक्त १ कोटी २७ लाख रुपयेच शासनाचे खर्च झाले असले तरी, आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिका-यांनी आयुक्तांना अंधारात ठेऊन ५ कोटींचे बिल काढल्याची दबकी चर्चा आज सभागृहा बाहेर रंगली.

२० जून च्या सभेत प्रश्‍नोत्तराच्या तासात काँग्रेसचे नगरसेकव हरीश ग्वालबंशी यांनी उपस्थित केलेल्या पहील्याच प्रश्‍नावर के.टी.नगरच्या रुग्णालयाच्या ८६ लाख रुपयांच्या टेंडर चे २४,२४ लाख असे चार तुकडे करण्यात आल्याचा वाद सभेत चांगलाच गाजला.एकाच टेंडचे तुकडे करता येत नसल्याचे नियम दटके यांच्या मागणीवर निगम सचिव यांना वाचून दयावा लागला.आजची अविनाश ठाकरे बोलताना बांधकाम विभागाचे तालेवार या अधिका-याला २० जूनच्या सभेत उत्तर देताना घाम फूटला,ते थरथर कापत होते,असे म्हणाले.जेव्हा आपण काही तरी चूक करतो किवा नियमबाह्य करतो तेव्हा अधिका-यांशी अशी दशा होते,असा आरोप त्यांनी केला. सध्या महापालिका बर्खास्त झाली असून सगळेच निर्णय हे प्रशासकीय अधिकारीच घेत असल्याचे चित्र उमटल्याचा संताप देखील आज सभागृहात व्यक्त करण्यात आला होता.

विलगीकरणातील नागरिकांना जेवण पुरविणा-या कंत्राटदारांकडून मनपा आरोग्य विभागाच्या काही ‘खास‘अधिका-यांनी कंत्राटदारांकडून आपलीही घरे भरुन घेतल्याचे सांगितले जात आहे. आज देखील सभेत आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या ‘वैद्यकीय चमूला’ उद्देशून अनेक नगरसेवकांनी संताप व्यक्त करीत,यातील अनेक अधिकारी हे मनपात दशकानुदशकांपासून नोकरीवर रुजू आहेत. यांचे त्या-त्या पदांवर बढती देखील कश्‍या पद्धतीने झाली,हे देखील सर्वाना ठाऊक असल्याची खोचक टिका करण्यात आली, तरीही आयुक्त मुंढे यांना त्यांच्यावरच विश्‍वास असून मुंढे यांच्या प्रामाणिकपणेवर यामुळे प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत असल्याची खंत देखील काही जणांनी खासगीत व्यक्त केली.

५ कोटींचे गौडबंगाल, कोविड वरील चर्चेदरम्यान उद्या कोणते नगरसेवक उलगडणार याकडेही मनपा कर्मचा-यांचे लक्ष् लागले आहे.आयुक्त यांनी ज्या मनपा रुग्णालयांना ‘उकीरडे’असे संबाेधले होते.त्याच रुग्णालयांच्या प्रमुखाला मुंढेंनी कोविड-१९ ची देखील जवाबदारी दिल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. मनपा रुग्णालयांचे उकीरडे करणारे तेच वैद्यकीय अधिकारी आता मुंढे यांचे ‘खास’ असून त्यांच्यावरच मुंढे यांनी कोविड विरोधी लढण्याची भिस्त ठेवल्यानेच मुंढे हे अडचणीत अाल्याचे सांगितले जात आहे.

Latest बातम्या