Homeनागपूर न्यूजनागपूरातही कोव्हिड-१९ साथीचा उद्रेक परमोच्च बिंदू गाठणार!

नागपूरातही कोव्हिड-१९ साथीचा उद्रेक परमोच्च बिंदू गाठणार!

मनपाने केली सहाही रुग्णालयात श्रेणी वर्धीत व्यवस्थापनेसाठी अधिका-यांची जवबादारी निश्‍चित

नागपूर,ता. १७ जून: शहरात पाचव्या लॉक डाऊन शिथिलतेनंतर दररोज कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने मनपाने केंद्राच्या आदेशाप्रमाणे, कोव्हिड-१९ साथीचा उद्रेक परमोच्च बिंदू गाठण्याची शक्यता लक्ष्ात घेता शहरातील मनापाच्या सहाही रुग्णालयात नव्याने श्रेणी वर्धीत रुग्णालयांचे व्यवस्थापन करण्यासाठी वैद्यकीय अधिका-यांची जवाबदारी निश्‍चित केली अाहे. शहरातील कुठलाही रुग्ण वैद्यकीय उपचारापासून वंचीत राहणार नाही,यासाठी हे बदल केले असून आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबत नुकतेच आदेश निर्गमित केले.

भारतात कोरोनाचे संकट हे नोव्हेंबरच्या दुस-या आठवड्यात परमोच्च बिंदूवर पोहोचेल आणि त्यावेळी विलगीकरण तसेच अति दक्ष् ता विभाग,खाटांची तसेच व्हेंटिलेकरची कमतरता भासेल,असा निष्कर्ष भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या(आयसीएमआर)पुढाकाराने करण्यात आलेल्या एका अभ्यासात काढण्यात आला,याच वेळी सार्वजनिक आरोग्य सुविधा यात ८० टक्क्यांनी वाढ केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करणे शक्य होईल,असेही अभ्यासात नमूद केले आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्राच्या सूचनेप्रमाणे नागपूरातही महापालिकेच्या कार्यक्ष्ेत्रातील कोव्हिड व नॉन-कोव्हिड सेवा देण्यासाठी व नव्याने श्रेणीवर्धीत रुग्णालयांच्या व्यवस्थापनेसाठी, प्रशासकीयस्तरावर वैद्यकीय अधिका-यांची जवाबदारी आयुक्तांच्या आदेशान्वये निश्‍चित करण्यात आली आहे.

नागपूरात कोव्हिड-१९ साथीचा उद्रेक परमोच्च बिंदू गाठणार,अशावेळी शहरातील कुठलाही रुग्ण वैद्यकीय उपचारापासून वंचीत राहणार नाही या अनुषंगाने मनपातर्फे उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या डेडीकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर(डीसीएचसी)मध्ये सामान्यत:मध्यम स्वरुपाच्या रुग्णाला वैद्यकीय उपचाराची सोय या रुग्णालयात मिळावी या हेतूने या प्रशासकीय नियुकत्या करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

यात सदर येथील आयुष रुग्णालयात डॉ.अतिक खान,गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालय डॉ.कंचन किंमतकर,पाचपावली स्त्री रुग्णालयात डॉ. संगीता खंडाईत,इमामवाडा येथील आयसोलेशन रुग्णालयात डॉ.मंजू वैद्य,काटोल रोड येथील के.टी.नगर रुग्णालयात डॉ.वर्षा देवस्थळे तसेच धरमपेठ येथील डिंग रुग्णालयात डॉ.भावना सोनकुसळे यांची वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक करण्याचे आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काढले असून या सर्व वैद्यकीय अधिका-यांना त्यांना नेमून दिलेल्या रुग्णालयात कोव्हिड,नॉन-कोव्हिड रुग्णांवर रुग्णालयातर्फे केलेल्या उपचारांचा अहवाल वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना सादर करण्याचे सांगण्यात आले आहे.

उपसंचालकाची पदावनती!
वरील जवाबदा-या निश्‍चित करताना आयुक्तांनी केलेल्या, यामधील एक नियुक्ती ही दिवसभर मनपात चर्चेचा विषय ठरली.एकाचा अपवाद सोडून वरील सर्व वैद्यकीय आरोग्य अधिकारी हे कनिष्ठस्तराचेच अधिकारी होते मात्र यातील एक वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी तर नुकतेच मनपात आरोग्य विभागाच्या उपसंचालकाचे पद भूषविले होते.

मात्र मुंढे हे मनपात आयुक्त पदी रुजू झाले आणि आरोग्य विभागातील अनेकांच्या कर्तृत्वाचे ‘पितळ उघडे पडले!’मनपातील अति.आयुक्तांनी या वैद्यकीय अधिकारी यांना ’उपसंचालक’ पद ‘बहाल’केले होते मात्र मुंढे यांच्या झंझावातासमोर या आरोग्य अधिकारीची सगळी ‘हवाच’निघून गेली. मनपाच्या मुख्य ईमारतीतील प्रशस्त केबिनमधील ‘आनंददायी नोकरी’तसेच दररोज चपराश्‍याचा मिळत असणारा ’कडक सलाम’ला आता या वैद्यकीय अधिकारीला मुकावे लागणार असून एकेकाळी उपसंचालक पद,आरोग्य अधिकारी पद यानंतर डॉ.सवाई यांच्याकडे हे पद गेल्यानंतर पदरी पडलेल्या सहायक वैद्यकीय अधिकारीचे पद नशीबी आले होते, यानंतर अचानक आता मुंढे यांनी त्यांची मुख्यालयातूनच ‘रवानगी’ मनपाच्या एका अतिसामान्य रुग्णालयात एका सामान्य पदावर केल्याने,या आश्‍चर्यकारक ‘पदावनती’वर दिवसभर मनपात खमंग चर्चा रंगली.

Latest बातम्या