Homeनागपूर न्यूजनागपूरात आज ४२ बाधितांची भर: रुग्णसंख्या ७८१ वर!

नागपूरात आज ४२ बाधितांची भर: रुग्णसंख्या ७८१ वर!

नागपूर,९ जून: नागपूरात आज मंगळवार दि. ९ जून रोजी ४२ काेरोनाबाधितांची भर पडली असून शहरात आता बाधितांची संख्या ही ७८१ वर पोहोचली आहे. महत्वाचे म्हणजे, मागील तीन महिन्यांपासून शहरात फक्त काही क्ष्ेत्रांपूरतेच मर्यादित असणारा ‘कोरोना’आता चांगलाच ‘विस्तारला’असून दररोज नवनवीन भागात आता ‘काेरोनाचे’अस्तित्व दृष्टिक्ष्ेपात येत आहे.

फक्त गेल्या ५ दिवसात १५४ बाधितांची भर पडली हे विशेष!यात आजच्या ४२ रुग्णांचाही समावेश आहे. आज शिवाजीनगर,मार्टिनगरसारख्या भागात देखील पहील्यांदाज कोरोनाने दस्तक दिली आहे,हे विशेष!

शिवाजी नगर येथील खासगी प्रयोगशाळेत एका युवतीचा अहवाल आज पॉझिटीव्ह आला.गेल्या काही दिवसांपासून तिला न्यूमोनियाची लक्ष् ण होती. या युवतीला मेडीकलमध्ये रात्री उशिरा दाखल करण्यात आले.

मेयोच्या प्रयोगशाळेतून आज ९ रुग्णांचा अहवाल हा पॉझिटीव्ह आला आहे,यात पहिल्यांदाज जरीपटका येथील मार्टिननगर येथे कोरोना बाधिताची नोंद झाली.हिंगणा येथील आणखी एक रुग्ण पॉझिटीव्ह आला.एम्सच्या प्रयोगशाळेतून ३२ रुग्ण पॉझिटीव्ह आढळले.यात नाईक तलाव,बंगलादेश येथील २२ रुग्णांचा समावेश आहे.

नाईक तलाव परिसराची आता शहरातील तिसरा ‘हॉट स्पाट’म्हणून नोंद झाली आहे. मोमिनपुरा व सतरंजीपुरा नंतर नाईक तलाव येथे एकूण ९० बाधितांची संख्या आढळली आहे. विशेष म्हणजे या भागातील एका तरुणाने,प्रशासनाने‘कोरोना’चा ‘लॉक डाऊन’प्रथम टप्प्यात काही अंशी‘अनलॉक’केल्यामुळे,आनंदित होऊन जणू काही ‘कोरोना’संपूर्ण जगातूनच संपुष्टात आला या आनंदात पार्टीचे आयोजन केले. या पार्टीत मोमिनपुरा येथून मटण-चिकण आणण्यात आल्याची माहिती आज दिवसभर व्हायरल होत होती.एका राष्ट्रीय वाहीनीने देखील याची दखल घेतली. या एकमेव युवकाच्या संपर्कात आल्यामुळे त्याचे संपूर्ण कुटुंबातील ६ जण हे कोरोनाबाधित झाले तर त्याच्या एका मित्राच्या कुटुंबातील १३ जण कोरोनाबाधित आढळले!

नाईक तलाव येथील या एकमेव युवकाने एकूण ९० जणांना कोरोचा संसर्ग दिला तर ७०० जण हे विलगीकरण केंद्रात पाहोचले!
गेल्या ५ दिवसात १५० च्या वर रुग्णांची अश्‍याच घटनांमुळे भर पडली असून इतर शहरातून नागपूरात येणा-या नागरिकांमुळे देखील कोरोचा संसर्ग झपाट्याने पसरला. याशिवाय शहरातील अनेक दूकाने व बाजार उघडण्यात आल्यामुळे देखील कोरोना संसर्गाच्या प्रसाराचा वेग वाढला असल्याचे सांगण्यात येत आहे.

५२१ बाधितांची केली कोरोनावर मात-
शहरात बाधितांच्या आकड्याने जरी ७८१ ची संख्या गाठली असली तरी त्यातील ५२१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मेयोमधून ११ तर मेडीकलमधून १७ रुग्णांना आज सुटी देण्यात आली आहे.यात मोमिनपुरा येथील ८,गोळीबार चौकातील ३,नाईक तलाव येथील ५,कोराडी येथील ३ रुग्णांचा समावेश आहे.

Latest बातम्या