Homeनागपूर मनपामुंढेंचा सकस आहार...चिकन-मटण हाच आहे का दावा?

मुंढेंचा सकस आहार…चिकन-मटण हाच आहे का दावा?

कंत्राटदार विलगीकरणात वृद्ध-चिमुकल्यांना देतात जाड-कच्च्या पोळ्या:मुंढेंच्या मुख्य वैद्यकीय अधिका-यांना दररोज पाहोचतात चिकन-मटणाचे डबे!

मनपा मुख्यालयाचा पाचव्या माळयावर दरवळतो दररोज रात्री चिकन-मटणाचा सुंगध:शासनाचा काेव्हिड पैसा अधिका-यांच्या मटन पार्टीवर!

डॉ.ममता खांडेकर

(Senior Journalist)

नागपूर,ता. १ जून: शनिवारी नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढें यांनी दूपारी ४ वा.फेसबुक लाईव्हद्वारे नागपूरकरांना कोव्हिड संबंधी मनपा करीत असल्याच्या अनेक उपाययोजनांचे चांगलेच ‘ज्ञान’पाझळले मात्र लगेच त्यांचे ज्ञान हे किती तकलादू व उपायोजना किती फसव्या आहेत याविषयी ’सत्ताधीश’चे फोन खणाणखले.विलगीकरणातील १६०० पेक्ष्ा जास्त नागरिकांना विविध ४५ ते ५० स्वयंसेवी संस्थां, सकस व पौष्टिक आहार देत असल्याच्या मुंढेंनी बाता मारल्या त्यावर प्रहार करताना मनपाच्याच कर्मचा-यांमध्ये कुजबुज सुरु झाली,विलगीकरणातील नागरिकांना कंत्राटदार कच्च्या-जाड पोळ्या पुरवतात मात्र हेच कंत्राटदार दररोज रात्री मुंढेंच्या या ‘खास वैद्यकीय करोना योद्धांसाठी’दररोज चिकन-मटणाचे डबे भरु भरुन आणतात. दररोज रात्री ११ वाजेपर्यंत मनपा मुख्यालयाचा पाचवा मजला हा चिकन-मटणाच्या दरवळणा-या सुगंधंानी भारलेला असतो!अशी माहिती समोर आली आहे.

मनपाचे हे खास वैद्यकीय अधिकारी सकाळी उपस्थिती दर्शवतात,दूपारी जाऊन झोपा काढतात,सायंकाळी मात्र ६ नंतर आपल्या विभागात हजर असतात. रात्री ११ पर्यंत हे वैद्यकीय अधिकारी शहरातील कोव्हिड संदर्भात किती ‘गांर्भीयाने’काम करतात हे मुंढे यांनी अचानक भेट देऊन तपासलेच पाहिजे,असा या कर्मचा-यांचा सूर आहे.फेसबुक लाईव्हवर मुंढे तोंड उघडून सांगत होते’विलगीकरणातील १६०० नागरिकांना त्यांच्या आवडीनूसार किवा प्रत्येकाच्या चवीनूसार तिखट,कमी तिखट,गोड जेवण पुरवल्या जाणार नाही,फक्त वरण-भात,भाजी-पोळी पुरविली जात असून सकाळचा नाश्‍ता,दूपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण पुरविले जात आहे’मात्र या जेवणाचा ‘दर्जा’याबाबत आयएएस अधिकारी सांगायला विसरलेत का?असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

महत्वाचे म्हणजे हा सर्व खर्च केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून होत असला तरी रात्री काही कंत्राटदारांमार्फत मात्र मनपा मुख्यालयात आरोग्य विभागाच्या काही वैद्यकीय अधि-यांना जे चिकन-मटणाचे डबे पोहोचवले जात आहेत त्याचे देखील ‘बिल’ याच कंत्राटदारांच्या खात्यात जमा होत असून देखील मुंढे हे फेसबूक लाईव्हवर ‘काटकसरीच्या’ गप्पा झोडत होते,असा संताप त्यांनी व्यक्त केला.

शहरातील विलगीकेंद्रात असणा-या असंख्य नागरिकांनी सातत्याने जेवणाचा दर्जा,वेळ व अनियमितता याविषयी ओरड केली आहे. प्रसार व प्रचार माध्यमांनी देखील विलगीकरणातील नागरिकांच्या प्रचंड गैरसोयींकडे मनपाचे लक्ष् वेधले तरी देखील मनपाच्या मूजोर आणि धीठ झालेल्या काही वरिष्ठ पदावरील वैद्यकीय अधिका-यांच्या जीवाच्या भरवश्‍यावर हे कंत्राटदार बेफिकीर झाले. विलगीकरणातील लहान लहान चिमूकले,वृद्ध माणसे यांना न चावल्या जाणा-या पोळ्या व बेचव अन्न पुरवित असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

नागपूर शहरातील नागरिक हे मुंढे यांच्या दडपशाहीतील कारभाराला पुरते कंटाळले असून मुंढे यांनी विलगीकरण केंद्रात येऊन कंत्राटदाराकरवी पुरविले जाणारे जेवण घेण्यास सुरवात करावी,अशी ‘उपाययोजना’देखील संतप्त नागरिकांनी सूचवली.गेल्या ३ दिवसात नागपूरतील अनेक नव्या भागात कोरोना बाधित आढळयाने या भागातील देखील शेकडो नागरिकांना उचलून विलगीकरण केंद्रात ‘कोंबण्याचे’ कार्य सुरु असून,नागपूरकर नागरिकांना कोराेनापेक्ष्ाही विलगीकरणाचीच धास्ती बसली असल्याचे तथ्य सामोरे आले आहे.

महापौर तसेच मनपातील सत्ताधारी पक्ष्ाने आता शासनाचा पैसा मनपाच्या कोणत्या वैद्यकीय अधिका-यांच्या दररोजच्या चिकन-मटणावर खर्च होत आहे?याचा शोध घेण्याची मागणी ही या कर्मचा-यांनी केली. ४५ ते ५० स्वयंसेवी संस्थेतील ते नेमके कंत्राटदार कोणकोण आहेत?कोणाच्या खात्या कोट्यावधीची बिले जमा झाली? यांचा शाेध घेऊन ती नावे माध्यमांसमोर तसेच नागपूरच्या २७ लाख जनतेसमोर उघडी करावी,असे आव्हान त्यांनी केले.

२७ लाख जनतेसाठी मुंढेंनी नेमली नेमकी ‘अल्पशिक्ष्तिांची आरोग्य चमू’
मुंढे यांनी २७ लाख नागरिकांचे कोव्हिड पासून संरक्ष् ण करण्यासाठी मनपात जी आराेग्य चमू गठीत केली आहे ती अल्प शिक्ष्ति असून एवढ्या मोठ्या महामारीला सामोरे जाण्यासाठी कोणतीही प्रभावी उपाययोजना सूचवू शकत नसल्याची दबकी चर्चा मनपात रंगली असून मनपात पूर्वी माळीकाम करणारा कर्मचारी पुढे उद्यान विभागाचे अधिक्ष् क झाले यानंतर मुंढे यांनी डायरेक्ट उपायुक्त पदी नेमून त्यांच्यावर कोव्हिड उपाययोजनांचे मार्गदर्शन करण्याची जवाबदारीच सोपवून टाकली याचे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.त्यांच्या ‘मार्गदर्शनात‘नागपूरात कोरोना बाधितांच्या संख्येने ४०० पार पल्ला गाठला असल्याचा विनोद ही मनपात चांगलाच रंगतोय. दूसरे आरोग्य आधिकारी हे देखील डिप्लोमा असून होमियोपॅथीची पदवीप्राप्त आहेत.सध्या मनपात त्यांच्याच आरोग्य विभागात ३ कोरोना बाधित सापडल्याने होम क्वारंटाईन झाले आहेत!अापल्याच वाहन चालकाला वरिष्ठ लिपिक पदावर बढती देऊन शासनाचा पैसा ‘काटकसरीने’खर्च करणा-या मुंढे यांच्यावर आधी देखील माध्यमात चर्चा रंगली होती.सध्या हा वाहन चालक मुंढे यांचा स्वीय सहायक म्हणून मनपाचाच नव्हे तर संपूर्ण ‘नागपूरचाच’कारभार पाहत असल्याचे सांगितले जात आहे.

दिव्याखाली अंधार-
शनिवारी फेसबूक लाईव्हवर नागपूरकर जनतेशी संवाद साधत असताना मुंढे यांनी त्यांच्या मनपातील करोनायोद्धे यांना लागण झाली नसल्याचे व ते सर्व कर्मचारी व अधिका-यांची काळजी घेत असल्याचा दावा करीत असतानाच दूसरीकडे त्यांच्या नाकाखाली त्यांच्या आरोग्य विभागाच्या कोंडमारा(आरोग्य)विभागाच्या एका चपराश्‍याला कोरोनाची बाधा झाली असल्याचा अहवाल शुक्रवारी समोर आला. मंगळवारी या कर्मचा-याच्या भावाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते.या कर्मचा-याच्या कुटुंबातील १६ जणांचे अहवाल हे पॉझिटीव्ह आल्याचे सांगितले जात असून तरीही गुरुवारी हा कर्मचारी मनपा मुख्यालयात आला. एवढेच नव्हे तर तो पाचव्या माळ्यावरील अनेक विभागात त्याने चांगलीच भटकंती ही केली. कॉमन शौचालयही वापरले!

मंगळवारी कुटुंबातील अनेक माणसे पॉझिटीव्ह निघाले असताना या कर्मचा-याची हिंमत गुरुवारी आरोग्य विभागात येण्याची होते यावर मुंढे आता कारवाई करणार का?असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.फक्त जनतेलाच कोव्हिड विषयी जनजागृतीचे ’कोरडे ज्ञान’सातत्याने गेल्या तीन महिन्यांपासून पाजणारे मुंढे यांनी आपल्या नाकाखालील आरोग्य कर्मचा-यांची कोव्हिड विषयी जागृती का नाही केली?

कॉटन मार्केटमध्ये ७ वा.नंतर एका गरीब भाजी विक्रेत्याने फक्त एका ग्राहकाला थोडेसे आलू-कांदे विकले म्हणून मनपाच्या अतिक्रमण विभागातील कर्मचा-यांनी त्या गरीब भाजी विक्रेत्यावर जबर दंड आकारला,आता मनपाच्या या आरोग्य विभागाच्याच कर्मचा-याने आपल्या निष्क़ाळजी वागण्यााने अनेकांचे आरोग्यच धोक्यात आणले यावर मुंढे आता काय कारवाई करणार?मुंढेंसाठी आपल्या कर्मचारी व अधिका-यांसाठी वेगळा न्याय व नागपूरकर जनतेसाठी दूसरा न्याय हीच का मुंढेंची कठोर शिस्तप्रियता व प्रामाणिकपणा?असा सवाल उपस्थित केला जात आहे.महत्वाचे म्हणजे मार्चच्या दुस-या आठवड्यापासूनच मुंढे यांचा आवाज ‘लाऊडस्पीकर’च्या माध्यमातून संपूर्ण शहरभर फिरत असला तरी शहरात फिरणारे संपूर्ण ‘लाऊडस्पीकर’मुंढे यांनी मनपाच्या आरोग्य विभागात एकदा तरी लावले असते तर….!अशी कोपरखळी मारण्यात आली.

मनपा मुख्यालयात आणखी एक कोरोनाबाधित!चिवडा पार्टी भोवली
आज सोमवारी मनपा मुख्यालयातील पाचव्या माळयावरील आरोग्य विभागातील आणखी एका कर्मचा-याचा अहवाल हा कोरोना पॉझिटीव्ह आला असून येथील कर्मचा-यांच्या मनात यामुळे चांगलीच धास्ती बसली आहे. मनपात आता पॉझिटीव्ह निघणा-या कर्मचा-यांची संख्या ही ३ झाली आहे. शुक्रवारी नाईक तलाव येथील २ पॉझिटीव्ह कर्मचा-यांची नोंद झाली असून आज सकाळी सतरंजीपुरा येथील आरोग्य विभागतील कर्मचारीचा अहवाल ही आज पॉझिटीव्ह आला असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. आज आरोग्य विभागातील १७ ते १८ कर्मचा-यांना विलगीकरण केंद्रात पाठविण्यात आले असल्याची माहिती आहे.

मनपाचा जो आरोग्य विभाग २७ लाख नागपूरकर नागरिकांच्या काळजीसाठी मुंढे यांनी नेमला त्याच विभागाला आता कोरोनाची बाधा झाली असल्याने मुंढे यांच्या कर्तव्य दक्ष् तेवर देखील सवाल उपस्थित होत आहेत.कालच दूपारी आरोग्य विभागात दूपारी ‘चिवडा पार्टी’रंगल्याची माहिती आहे,त्यात आज बाधित झालेला कर्मचारी हा सहभागी झाला असल्याचे सांगितले जात आहे.

कंट्रोल रुमचे कर्मचारी दहशतीत!
आज बाधित आलेल्या कर्मचा-याच्या भावाचा मित्र हा कंट्रोल रुममध्ये दूपारच्या शिफ्टमध्ये काम करीत असून त्या भावांना कारोनाची लागण झाल्यावर व त्यांच्या संपर्कात आल्यानंतर देखील कंट्रोल रुममध्ये येऊन काम करीत असल्याने येथील सर्व कर्मचारी दहशतीत आहेत. बोरकर यांना कंट्रोल रुमच्या सर्व कर्मचा-यांनी घरीच राहण्याची विनंती केली मात्र मनपातील मंुढे यांच्या एका ‘खास‘वैद्यकीय अधिका-याशी या कर्मचा-याच्या मित्राची ‘अत्यंतिक जवळीक’असल्याकारणाने बोरकर यांनी येथील कर्मचा-यांच्या सल्ला न जुमानता कामावर रुजू होऊन येथे काम करीत असणा-या तिन्ही शिफ्टमधील कर्मचा-यांचा जीव धोक्यात टाकला असल्याची चर्चा आज मनपात ऐकू आली.

मंुढे साहेबांची थर्मल स्कॅनर मशीन दाखवते एकच तापमान!
आरोग्य विभागाचे तीन कर्मचारी कोरोना बाधित आढळ्याने आजपासून तातडीने(१ जून पासून,नागपूरात कोराेनाचा शिरकाव झाला ११ मार्चपासून हे विशेष!)प्रत्येक कर्मचा-याची थर्मल स्क्रीनिंग केली जात असली तरी प्रत्येक कर्मचा-याच्या तपासणीनंतर २ मिनिटांचा अवधी या मशीनला देणे अत्यावश्‍यक असताना,असे न करण्यात आल्यामुळे प्रत्येक कर्मचा-यांचा‘ एकच’तापमान नोंदवण्याचा विक्रम आज मुंढेंच्या मनपातील आरोग्य विभागात घडला.

सॅनिटायझरचा गंध ही नाही!
शहरातील कोरोनाने मनपा मुख्यालयातील दार ठोठावल्यामुळे येथील कर्मचा-यांना सेनिटायझर व मास्कची अत्यंतिक निकड भासत असली तरी अद्याप तीन महिन्याच्या अवधीत एकदाही मनपा कर्मचा-यांना सेनिटायझर व मास्कचा पुरवठा करण्यात आला नाही. हे सर्व कर्मचारी आपापल्या घरुनच सेनिटायझर घेऊन निघतात. मग शासनाचा कोव्हिड निधी खर्च होतो कूठेय?असा सवाल आता उपस्थित करुन मनपाकडून अद्याप तरी आम्हाला सेनिटायझरचा ‘गंध’ही मिळाला नसल्याची तक्रार माहिती न देण्याच्या अटीवर सूत्रांनी केली. मास्क ही सूती कापडाचे पुरविले गेले असून आम्हीच ते रोज धूतो व वापरत असल्याचे सांगण्यात आले.

विशेष म्हणजे,नागपूरकरांचे, कोव्हिड पासून जीवाचे रक्ष् ण करण्यासाठी अहोरात्र झटणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढं यांना त्यांच्या आरोग्य विभागातील अधिकारी व परिचारीकांना कोव्हिडचे विशेष प्रशिक्ष् ण देण्याची ‘सुबुद्धी’ सूचली ती, मे च्या शेवटच्या आठवड्यात! ११ मार्चपासून शहरात कोरोनाचा शिरकाव झाला,तेव्हा पासून बाधितांनी ४०० पल्ल्याड टप्पा गाठला मात्र गेल्या तीन दिवसांपासून शहरातील एका नामांकित रुग्णालयातर्फे आता कुठे मनपाच्या झोननिहाय दवाखान्याच्या अधिकारी व परिचारीकांना कोव्हिडसंदर्भातील विशेष प्रशिक्ष् ण दिले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Latest बातम्या