
नागपूरात कारोना बाधितांची संख्या पोहोचली ४४६ वर
नागपूर,२७ मे: बुधवार दि. २७ मे रोजी नागपूरात बाधितांची संख्या ही अाणखी १३ संख्येने वाढली.यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला.आता नागपूरात कारोना बाधितांची संख्या ही ४४६ वर पोहोचली असून कोरोना बाधित मृतांची संख्या ही ९ वर पोहोचली आहे.
चौथ्या टप्प्यातील लाॅक डाऊन अशंत:शिथिल झाल्यानंतर बाहेरुन शहरात येणारे यांची देखील संख्या वाढली आहे. खाजगी वाहनांनी नागपूरात येणा-यांची संख्या ही लक्ष् णीय आहे. मुंबईवरुन आलेल्या दाेन महिला या काल कोरोना बाधित आढळया होत्या.आज यात आणखी तिघांची भर पडली.
सतरंजीपुरा येथील ७१ वर्षीय वृद्धेचा मृत्यू आज कोरोनाने झाला. गेल्या काही दिवसांपासून या महिलेची प्रकृती ही खालावलेली होती. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते.मंगळवारी रात्री त्यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र घरीच तिचा मृत्यू झाला होता.रेड झोनमधील असल्यामुळे तिचा नमुना तपाासणीसाठी पाठविण्यात आला होता. आज सकाळी हा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला.
सतरंजीपुरा वसाहतीतील हा दूसरा मृत्यू आहे. पहीला मृत्यू ६८ वर्षीय वृद्धाचा ५ एप्रिल रोजी झाला होता. या वृद्धाच्या मृत्यूनंतर १०० च्या जवळपास नागरिकांना संपर्कातून कोरोना झाल्याचे अहवालाने सिद्ध झाले. १७०० च्या वर या भागातील संशयितांना शहरातील विविध विलगीकरण कक्ष्ात ठेवण्यात आले . आता या वृद्धेचा घरीच मृत्यू झाला असल्याने पुन्हा या वसाहतीतील लोकांना विलगीकरण कक्ष्ात नेण्याची प्रक्रिया मनपा प्रशासनातर्फे सुरु करण्यात आल्याची माहिती आहे.
आज बुधवारी नाईक तलाव,बांगलादेश,मोमीनपुरा,सतरंजीपुरा,कामठी,सावनेर,हावरापेठ व हंसापुरी या भागात ही पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद झाली.गेल्या अडीच महिन्यात शहरातील एकूण ४५ वसाहतींमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले.यात मोमीनपुरा व सतरंजीपुरा या भागात सर्वाधिक बाधितांची संख्या आढळली.मात्र आता लॉक डाऊनमधील शिथिलतेमुळे,समुह संपर्कातून शहरात कोरोना बाधितांचा शिरकाव शहरातील नवनवीन वस्त्यांमध्ये होऊ लागल्याचे दिसून येत आहे.
येत्या काळात शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढत जाणार असल्याचा हा निर्दशांक आहे.नाईक तलाव तसेच बांगलादेश वसाहत या अतिशय गजबजलेल्या व दाट वसाहती असून या भागात आज कोरोना बाधित रुग्ण आढळल्यामुळे मनपा प्रशासनाची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. मोमीनपुरा येथील ३ रुग्णांचा अहवाल हा आज पॉझिटीव्ह आला आहे,यातील एक रुग्ण गर्भवती महिला आहे. कामठीत ३ तर सावनेरमध्ये १ पॉझिटीव्ह रुग्ण आढळला. सतरंजीपुरा येथे आज एक मृत्यू तर एक पॉझिटीव्ह रुग्णाची नोंद झाली.
अख्खे कुटुंबिय पॉझिटीव्ह-
मुंबईहून कामठी येथे आपल्या घरी परतलेले पती,पत्नी व त्यांच्या ४ वर्षाच्या मुलाचे नमुने हे एम्सच्या चाचणीत आज पॉझिटीव्ह आढळले. कामठीत आता पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ही ५ झाली आहे. याशिवाय सावनेरमध्ये पहीला कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण ही मुंबईहून परतला आहे. मेयोच्या प्रयोगशाळेत त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आढळता.
उपराजधानीत कोरोनाची आजची स्थिती-
दैनिक संशयित- १३४
दैनिक तपासणी नमुने- १७९
दैनिक निगेटीव्ह नमुने-१६६
नागपूरातील पॉझिटीव्ह नमुने-४४६
नागपूरातील मृत्यू संख्या- ९
डिस्चार्ज केलेले पॉझिटीव्ह रुग्ण-३५६
डिस्जार्च केलेले संशयित रुग्ण- २५३३
विलगीकरण कक्ष्ात एकूण संशयित- १६८७
बाधित-४४६,बरे झालेले-३५६,मृत्यू-९




आमचे चॅनल subscribe करा
