

रुग्ण संख्या पोहोचली ४२८ वर: आज १५ रुग्ण सुखरुप घरी
नागपूर,२५ मे: शहरात आज कोराेनामुळे आठव्या रुग्णाचा मृत्यू झाला. मे महिन्यात एकूण ६ रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. मागील सोमवारी १८ मे रोजी काेरोनामुळे ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. आज पुन्हा मोमिनपुरा येथील ५४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.मृत पावलेली महिला कर्करोगाची रुग्ण असून कर्क रोगाची तिसरी स्टेज असल्याचे सांगितले जात आहे. त्यांना काल रात्री मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले होते. आज सकाळी त्यांचा अहवाल हा कोरोना पॉझिटीव्ह आला व आज सकाळीच त्यांचा मृत्यू झाला.
यासोबतच आज लकडगंज पोलीस ठाण्यात कार्यरत असणा-या एका ४० वर्षीय एसआरपीच्या जवानाचा अहवाल हा पॉझिटीव्ह आला तर मोमिनपुरा येथील एका २४ वर्षीय गर्भवती महिलेला देखील कोरोनाचा संसर्ग झाल्याचे अहवालातून सिद्ध झाले. एका हिरवीनगर येथील रुग्णाला कोरोनाची लागण झाली असून तसेच एका सिरसपेठेतील नागरिकाला कोरोनाची लागण झाली असल्याचे सामोरे आले आहे. आज नव्याने पॉझिटीव्ह आढळलेले दोन रुग्ण हे नुकतेच मुंबईहून नागपूरात आले असल्याची माहिती आहे. त्यांना घरातच विलगीकरणात राहण्याचे आदेश देण्यात आले होते. आज एकूण ५ कोरोना बाधितांची संख्या समोर आली.ज्यात एकाचा मृत्यू झाला. आता शहरात कोरोना बाधितांची एकूण संख्या ही ४२८ वर पोहोचली आहे. रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही राज्यातील इतर महानगरांपेक्ष्ा कमी असून आतापर्यंत दगावलेले सर्वच रुग्ण यांना आधीच शारिरीक व्याधी असल्याचे सामोरे आले आहे. विदर्भात मृतकांचा आकडा हा ५३ वर पोहोचला आहे.
आज पॉझिटीव्ह निघालेल्या सिरसपेठेतील रुग्णाला मुंबईहून घेऊन येणा-या रुग्णवाहीका चालक व त्याच्या कुटुंबियांना विलगीकरण कक्ष्ात दाखल करण्यात अाल्याचे सांगितले जात आहे.सिरसपेठेतील जवळपास ३५ संशयितांना आज विलगीकरण केंद्रात घेऊन गेल्याची माहिती आहे.
शहरात आतापर्यंत ३५६ बाधितांनी कोरोनावर मात केली असून सुखरुप घरी पोहोचले आहेत,हे विशेष! केंद्र सरकारच्या नवीन मार्गदर्शक सूचनेप्रमाणे ७,८ व ९ व्या दिवशी बाधितांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्ष् णे न आढळल्यास त्यांना १० व्या दिवशी सुटी देण्यात यावी. केंद्राच्या नव्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे नागपूरत २०० पेक्ष्ा अधिक रुग्णांना सुटी देण्यात आली असून आता घरी जाणा-यांची संख्या ही ३५६ पर्यंत पोहोचली आहे. आज एकूण १५ रुग्णांना सुटी देण्यात आली असून एकूण ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ६४ कारोना बाधितांवर सध्या उपचार सुरु आहे.
ताजनगर परिसर सील-
प्रभाग क्र.२१,हनुमान नगर झोन क्र.३ अंतर्गत येणारा ताजनगर परिसर आज मनपा प्रशासनातर्फे पुढीलप्रमाणे सील करण्यात आला आहे
– उत्तर पश्चिम-पी.एम.चौधरी यांचे घर
-उत्तरेस-रोड
-उत्तर पूर्वेस- त्रिलोक बार ॲण्ड रेस्टॉरेन्ट
-पूर्वेस-मानेवाडा सिमेंट रोड
– दक्ष्णिपूर्वेस- कनिष्क़ा डेव्हलपर्स(दत्त नर्सरी)
दक्ष्णिेस- रोड
दक्ष्णि पश्चिमेस- शुभ किराणा(मो.रफीक यांचे घर)
-पश्चिमेस- रोड
सिरसपेठ भाग सील-
प्रभाग क्र.१,गांधी झोन महाल क्र.६ अंतर्गत या भागात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळ्यामुळे पुढील प्रमाणे हा परिसर सील करण्यात आला आहे-
उत्तरपश्चिमेस-गोंड मोहल्ला कॉर्नर
उत्तर पूर्वेस- फटींग यांचे घर
दक्ष्णि पूर्वेस- पिंपळकर यांचे घर
दक्ष्णि पश्चिमेस- पुनित प्रोव्हीजन,गायधने यांचे घर
शहरातील कोरोनामुळे झालेले मृत्यू-
-५ एप्रिल रोजी सतरंजीपुरा येथील ६८ वर्षीय वृद्धाचा बळी
-२९ एप्रिल रोजी मोमिनपुरा येथील ७० वर्षीय वृद्ध
-५ मे रोजी पार्वतीनगर येथील २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू
-११ मे रोजी पांढराबोडी येथील २९ वर्षीय युवकाचा मृत्यू
-१६ मे रोजी गड्डीगोदाम येथील ६५ वर्षीय वृद्ध
-१७ मे रोजी शांतीनगर येथील ५४ वर्षीय व्यक्ति
-१८ मे रोजी मोमिनपुरा येथील ७० वर्षीय महिला
-२५ मे रोजी मोमिनपुरा येथील ५४ वर्षीय महिला




आमचे चॅनल subscribe करा
