

नागपूर,ता.१९ मे: रामेश्वरी रोड येथील पंचशील नाईट मनपा शाळा मानवता शाळेजवळ आज मंगळवार दि. १९ मे रोजी सकाळी ९ वा.पासून कन्टेंनमेंट भाग पार्वती नगर येथील गर्भवती महिलांना कोव्हिड-१९ च्या तपासणी संदर्भात मनपातर्फे बाेलावण्यात आल्याचे सांगितले जात आहे मात्र या ठिकाणी एकाच वेळी दोनशेच्या वर महिला पोहोचल्यामुळे सामाजिक अंतराचा अक्ष् रश:फज्जा उडाल्याचे दृष्य बघायला मिळाले.
तेथील परिस्थिती बघता नागपूर महानगरपालिकातर्फे गर्भवती महिलांची ‘कोरोनामुक्ती’ हा उपक्रम आहे की ‘काेरोनासक्ती’असा प्रश्न या परिसरातील नागरिकांना पडला.
याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी धंतोलीच्या झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री चन्ने यांना फोन केला असता त्या सायंकाळ पासून तर रात्री ९ पर्यंत बैठकीत व्यस्त होत्या.यानंतर त्यांना विचारणा केली असता त्यांनी मेडीकल ऑफिसर(एमओ) डॉ. स्वाती गुप्ता यांच्याकडे विचारणा करा असे सांगून जवाबदारी ढकलली.

डॉ.स्वाती गुप्ता यांना कॉल केला असता, ही तपासणी मानवता शाळेत झाली की मनपाच्या बाबुळखेडा दवाखान्यात,एकूण किती गर्भवतींची आज दिवसभरात तपासणी करण्यात आली?किती वाजता पासून किती वाजेपर्यंत मनपाच्या आरोग्य विभागातर्फे हा उपक्रम राबविण्यात आला? एकसाथ दोनशेच्या वर गर्भवती माता या केंद्रावर का बोलविण्यात आल्या?या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर त्या देणार नसल्याचे त्यांनी सांगितले. आपण वरपर्यंत तक्रार करु शकता असे उर्मट उत्तर देऊन त्यांनी कॉल ठेऊन दिला.
वरिष्ठ आरोग्य अधिकारी डॉ.सवाई यांनी नेहमीप्रमाणेच कॉल रिसिव्ह केलाच नाही.शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना एवढ्या मोठ्या संख्येने कन्टोंन्मेंट भागातील गर्भवती मातांची काेव्हिड-१९ची तपासणी करताना मनपा प्रशासनातर्फेच शासनाच्या सर्व नियमांचा फज्जा उडविण्यात आला असल्याची चर्चा आज दिवसभर या परिसरात होती.
या गर्भवती मातांना मनपाच्या या उपक्रमांमुळे कोरोनाची लागण झाल्यास याला जवाबदार कोण राहणार?असा प्रश्न येथील नागरिक उपस्थित करत आहेत. या प्रभागातील भाजपचे नगरसेवक मनोज गावंडे यांना विचारणा केली असता,असा उपक्रम या भागात राबविण्यात आला असल्याची त्यांनी माहिती दिली.
मनपाच्या आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांनी पार्वती नगर भागातील दहा-दहा गर्भवतींना एक-एक तासांनंतरची वेळ दिली होती मात्र सर्वांनी त्यांना दिलेली निर्धारित वेळ न पाळता एकसाथ केंद्रावर गर्दी केल्याचे सांगितले जात आहे. मनपाचे अारोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी हे गर्भवतींच्या घरी जाऊन देखील ही जोखिमेची तपासणी करु शकले असते असे येथील नागरिकांचे म्हणने होते.
मुंढेंचे १०० बॅड हॉस्पीटलचे मालक असणारे असेही कोरोना योद्धे-
मनपाच्या आरोग्य विभागात अनागोंदी कारभार सुरु असल्याचा संताप अनेक मनपा कर्मचारीच आता व्यक्त करीत आहेत. मुंढे यांच्या नेतृत्वाखाली मनपाच्या आरोग्य विभागातील जे कोरोना योद्धे हे ‘लढताना दिसत’आहेत ते नागपूरकर नागरिकांप्रती फक्त्र औपचारिक लढा देत असल्याचा संताप अनेक नागरिक व्यक्त करीत आहेत. या विभागातील अनेक गलेलठ्ठ पगार घेणारे वैद्यकीय अधिकारी यांचे शहरात १०० बेड्सचे अत्याधूनिक हॉस्पीटल्स, पॅथोलॉजी लॅब्स असून मनपाची नोकरी ही फक्त गलेलठ्ठ पगारासाठी करीत असून त्यांचा सर्व कल हा आपले खाजगी दवाखाने चालविण्याकडेच असल्याचा आरोप गेल्या अनेक वर्षांपासून नागपूरकर नागरिक करीत आहेत.मात्र शिस्तप्रिय आयुक्तांनी याकडे काेरोनाकाळातही डोळेझाक केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.




आमचे चॅनल subscribe करा
